साताऱ्यावर एक सुंदर कविता, कोणी लिहिली माहित नाही मात्र सातारा जिल्ह्याचे थोडक्या शब्दांत सुंदर वर्णन केले आहे...
साताऱ्यावर एक सुंदर कविता, कोणी लिहिली माहित नाही मात्र सातारा जिल्ह्याचे थोडक्या शब्दांत सुंदर वर्णन केले आहे...
पृथ्वीवरील एक तारा
नाव त्याचे सातारा,
मावळतीला अजिंक्यतारा
उगवतीला कृष्णा माय ,
कोयनेची कोयना माय
जणू दुधावरची साय,
महाबळेश्वर पाचगणी
थंड शितल दोघी जणी,
राजधानी ही मराठ्यांची
शिव प्रभूंच्या वास्तव्याची,
कास पठार अती सुंदर
जणू स्वर्गातली ती बाग,
धोम उरमोडी उत्तर मांड
चाफळचा प्रभु श्री राम,
सज्जनगड असे धाम
शिखर शिंगणापूरात शंभु,
नागेवाडी ची शाकंभरी
गोंदवलेकर सेवागिरी
यमाई मुधाई भवानी,
सिद्धनाथ खंडोबा नागोबा
कळसुबाई आणि काळुबाई,
पालीचा यळकोट खंडोबा
वाईचा ढोल्या गणपती,
गडांचा गड प्रतापगड
वसंतगड महिमानगड,
उंच धबधबा ठोसेघर
पवनचक्याचं आगर,
देशसेवेत औवल आमुचा
शुरांचा जिल्हा सातारा,
रांगडी भाषा सातारा
कणव बंधुता सातारा,
स्त्रियांचा आदर सातारा
प्रिती संगम सातारा,
डोंगर द-या सातारा
हिरवागार सातारा,
बागाईत शेती सातारा
धुपती गुरं सातारा,
दुष्काळ पडे नित्य असा
मानदेश सुद्धा सातारा,
देशाची शान सातारा
मराठी बाणा सातारा,
स्वातंत्य लढ्यात अग्रेसर
अभिमान आमुचा सातारा...
Comments
Post a Comment