१२ नोव्हेंबर १६५९छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६६७ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सरहद्द पोर्तुगीज प्रदेशाला भिडली होती. त्यावेळचा पोर्तुगीज विजरई कोंदी दि सांव्हिसेंती हा फारच धर्मान्ध होता. त्याने बारदेश मधील चार हजार हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले होते. आणि इतर हिंदू लोकांना २ महिन्याच्या आत बारदेश व गोवा सोडून जाण्यास सांगितले. शिवाय पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेलेले कोकणातील देसाई त्यांच्या मदतीने स्वराज्यातील प्रदेशावर धाडी घालत असत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी बारदेशवर ५ हजार पायदळ व १ हजार घोडदळ घेऊन मोहीम काढली. १० नोव्हेंबर पासून सलग तीन दिवस महाराजांच्या सैन्याने या भागात धुमाकूळ घालत अनेक धर्मान्ध पोर्तुगीजाना ठार केले. या मोहिमेत महाराजांनी पोर्तुगीज व कोकणातील फितूर देसायांना कायमचा धडा शिकवला. महाराजानी या मोहिमेत १३०० कैदी पकडले. शिवाय त्यांना यातून १५० लक्ष होनांची लुटही मिळाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६८३ किल्ले फोंड्यावर प्रचंड...