पानिपत आणि रहिमतपूरकर माने

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

ऑगस्ट 1726 मध्ये सरदार तुळाजी माने व त्यांच्या सोबतीला असलेलं बरेच मानेंचे पुरुष व भुईंजकर सरदार रायाजी जाधवराव यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी संताजी बिन तुळाजी माने यांचे दत्तकविधान केले. त्यानंतर संताजी माने हे चौथाईचा कारभार पाहू लागले.

👉 संताजी माने यांना दोन मुले झाली.
1)थोरले सुल्तानजी माने व
2)धाकटे सुभानजी माने.

         मराठ्यांच्या उत्तर मोहिमेसाठी इ.स 1759-60-61 (पानिपत) संताजी माने यांनी आपले धाकटे चिरंजीव सरदार सुभानजी माने यांना स्वतःच्या हुजरतीतील स्वार देऊन त्यांची रवानगी केली.

👉 यावेळी सरदार सुभानजी माने यांच्याबरोबर
 1.सरदार फत्तेसिंह माने,
 2.सरदार विठोजी माने,
 3.सरदार दत्ताजी माने ही मंडळी सुद्धा आपापले स्वार घेऊन मोहिमेत सामील झाले होते.

    👉 पानिपतच्या पराभवानंतर सर्व बचावलेले सरदार रहिमतपूर ला परत आले.
👉 परंतु सरदार फत्तेसिंह माने यांनी माळव्यात राहण्याचा निर्णय घेतला.

👉स्वतंत्रवृत्ती हे बहुधा माने मंडळींच्या रक्ताचे वैशिष्ट्यच त्याला सरदार फत्तेसिंह माने हे काही अपवाद न्हवतेंच.
  👉दौलतराव शिंदे व महादजी शिंदे यांच्या बायांचे वाद हे काही मराठा सरदारांना नवे न्हवतें.

त्यावेळी बायांनी रहिमतपूर येथील साप गावात येऊन सुल्तानजी माने पाटील यांच्या जवळ मदत मागून सरदार लखुजी लाड यांचे चिरंजीव सरदार आवजी लाड यांना सरदार फत्तेसिंह माने यांच्या सोबतीला घेऊन पेशवा मुलखात धुडगूस घालण्याची विनंती केली जी रहिमतपूरकर मान्यांनी पूर्ण केली होती.

  👉 इ.स 1802 ते जुलै 1805 या काळा पर्यंत रहिमतपूर कर मान्यांनी भीमा व कृष्णा नदी दरम्यानच्या पेशवे, पंतप्रतिनिधी यांच्या मुलखात धुडगूस घालून ठेवला होता.
 👉सरदार पुरंदरे, सरदार नाईक, सरदार मालोजी घोरपडे, पेशवा फौजेचा रहमतपुर सरदार माने यांनी पराभव केला होता

    रहिमतपूर मान्यांनी इ स 1802 साली सरदार पुरंदरे, सरदार नाईक, सरदार मालोजी घोरपडे व पेशवा यांच्या एकत्रित फौजेचा बारामती येथे झालेल्या लढाईत दारुण पराभव केला व पेशव्यंचे जरीपटक्याचे निशाण काबीज केले.

  👉 इ.स 1803 मध्ये रहिमतपूरकर सरदार माने ( फत्तेसिंह,सुल्तानजी, सुभानजी,विठोजी,महादजी इ.)
जे की भरपूर अनुभवी व बऱ्यापैकी वयाच्या सत्तरीत असलेले मंडळी होते व त्यांच्या सोबत सरदार यशवंतराव होळकर यांच्या एकत्रित फौजांनी पेशवे व शिंदे यांच्या एकत्रित फौजांची हडपसर - घोरपडीच्या युद्धात दारुण पराभव केला व शनिवार वाडा रहिमतपूरकर माने व होळकर यांच्या फौजांनी ताब्यात घेतला आणि पेशवा बदलीच्या हालचाली सुरू केल्या तेव्हा सातारच्या छत्रपतींकडून पेशवा वस्त्र आणण्याची जबाबदार रहिमतपूर मान्यांनी घेतली. सरदार फत्तेसिंह माने ,सरदार सुभानजी माने हे अजिंक्यतारा किल्यापाशील करंजे गावात ठिय्या टाकून बसले अखेर छत्रपतींची समजूत काढल्यानंतर छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे मानेंच्या ताब्यात दिली होती.


    पेशव्याचे कारभारी बालाजी कुंजीर यांनी शेवटी होळकर इंदोरला निघून गेल्यानंतर रहिमतपूरकर माने व पेशवा यांची संधी घडवून आणली.परंतु मान्यांनी त्यांच्या स्वतंत्र व दंगेखोर स्वभावामुळे पेशवे,पंतप्रतिनिधी, पटवर्धन, पुरंदरे या ब्राम्हण मंडळीन बरोबर विचारांचे मतभेद राहील्याने मान्यांनी या सगळ्यांच्या मुलखात धुडगूस घालून ठेवला.रहिमतपूर कर मान्यांनी भाळवणीची चौंडेश्वरी पळवून आणून रहिमतपूर येथे स्थापन केली व देवीची सेवा केली.
         

         पुढे इ. स .1805 रहिमतपूर कर माने सरदार यांनी पंढरपूर येथे पोचल्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर पंढरपूर देवस्थानाला 1 हत्ती व 1 घोडा दान केला असे उल्लेख आहेत.

         त्यानंतर पेशवा, पटवर्धन, पंतप्रतिनिधी, रास्ते या ब्राह्मण सरदारांनी एकत्र येऊन जुलै 1805 मध्ये पंढरपूर नजीक रहिमतपूरकर माने व त्यांच्या 10000 च्या फौजेवर हल्ला केला. यावेळी लढाईतून पळून न जाता सर्व मान्यांच्या सरदारांनी शत्रूशी लढता लढता धारातीर्थी पडले व आपल्या स्वाभिमानाला जागे राहिले.


👉धारातीर्थी पडलेले सरदार -
 सरदार फत्तेसिंग माने,
 सरदार सुभानजी माने व त्यांच्ये सर्व पुतणे,
 सरदार विठोजी माने व त्यांची सर्व मुलगे,
 सरदार धोंडजी माने इ.

        या लढाईनंतर लगेचच पेशवा, पंतप्रतिनिधी, पटवर्धन सैन्याने रहिमतपूर वरती हल्ला करून संपूर्ण रहिमतपूर लुटून नेले.रहिमतपुरातील मान्यांचे सर्व म्हणजे 7 ही चिरेबंदी वाडे फोडून ,खणून लुटून नेले. ज्या वाड्यांचे अवशेष आजही पाहायला मिळतात.

👉पुढे इ.स. 1817-18 मध्ये पेशवा बाजीराव 2 याने सरदार माने घातपात करतील या भीतीने आपला रहिमतपूर चा तळ रातोरात हलवून तो वाठार या गावी नेला असे उल्लेख मिळतात.

👉 लेखन & माहिती संकलक
 नितीन घाडगे.
👉संदर्भ - 1. ग्रँड डफ,
           2. पेशवे दफ्टर,
           3. सरदारांच्या बखरी,
           4. पेशवेकालीन पत्रव्यवहार इ.
संजय देशमुख कामनगावकर हो. पण बखर हाच शब्द आहे माने आणि गोपाळरावांच्या पुस्तकात.
           5. सरसेनापती संताजी घोरपडे लेखक बाळासाहेब माने.या पुस्तकातून.


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४