कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...
राजे राष्ट्रकूट उर्फ ,राठोड उर्फ घाटगे/ घाडगे राजवंशाचा कुलाचार
-----------------
--------------नितीन घाडगे
@..............✍️
सार्वभौम सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे राष्ट्रकूट याचे वंशज राठोड यांना घाटगे 'किताब मिळाला घाटगे अर्थात घाडगे कुळातील तसेच पडनावाने राहणाऱ्या इतर सर्व वंशजांसाठी त्यांचा कुलाचार अथवा वंशजांसाठीची मंगल कार्यात उपयुक्त असलेली आवश्यक माहिती खाली दिली आहे.....
👉 टीप :
कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...
👉 कुळ - राजे राष्ट्रकूट वंशज असणारी सूर्यवंश असणारी शाखा अपभ्रंश होऊन राठोड उर्फ घाटगे घाडगे
👉 गोत्र - कश्यप
👉 देवक - मूळ देवक सूर्यफुल/ कागल भागामध्ये घाटगे साळुंखीपंख लावतात.
👉 विशेष सूचना :कागलकर हे मूळचे मलवडी (खटाव)मूळ पुरुष कमराज घाटगे याच्यावंशज शाखा आहे परंतु कोणत्या तरी कारणाने साळुंखीपंख वापरतात .परंतु घाटगे कुळ सूर्यवंशाचे असून देवक:-सूर्यफुल आहे.तर काही भागात पाचपालवी सुद्धा देवक म्हणून सांगितली जाते पुरोहित याच्या कडून. कारण देवक माहित नसेल तर बऱ्याच लोकांना कॉमन असे अनेक कुळात पुरोहित देवक सागतात.
👉 गुरू गोत्र :- वशीष्ट
👉 मूळ पुरुष :-राणा हाडा राठोड हे लष्करी परंपरेने महाराष्ट्रात सातारा भागात आले याचे पुत्र कामराज हे घाटगे कुळाचे मूळ पुरुष आहेत .
👉 घाटगे नाव कस मिळाले :-कामराज राणा हाडा राठोड यांनी बहामनी संस्थापक बादशाह हसन गंगू बहामनी याच्याकडून बेदरच्या दरबारात घाटगे किताब मिळावला.
👉 घाटगे पदवीच आडनाव :-कामराज राठोड हाडा हाडीया उर्फ घाटगे याना ६पुत्र होते.त्यांना घाटगे किताब आडनाव म्हणून परंपरागत लावण्यास सुरवात केली परंपरागत वंशजानी कायम केले .
👉 कुळदेवी/कुलस्वामिनी-पार्वती देवीचे आवतार 1)जोगेश्वरी 2)तुळजाभवानी.(तुळजापूर) 👉सहकुलस्वामिनी :-जानाई उर्फ जाणूबाई निवखन ता .पाटण जि .सातारा .महालक्ष्मी (कोल्हापूर)
👉काही देवीच्या वेगवेगळ्या भागात उपासना
राजापूर बुध, निमसोड घाडगे, ना जाणूबाई आहे
ललगुन घाडगे ना चौडेश्वरी
डिस्कल घाडगे ना वज्रेश्वरी
मोळकर.घाडगे ना जोगेश्वरी🙏👆
👉 कुलदेव -कुळदैवत :-महादेव व महादेवाचे अवतार
१) खंडोबा - पाली ता .कराड जि .सातारा.मलवडी माण सातारा. जेजुरी पुणे.
२) चंद्रसेन - किल्लेवसंतगड
ता. कराड , जि. सातारा
३) घाटगे घराणे काही लोक
ज्योतिबा- कोल्हापूर सुद्धा
कुलदैवत मानतात.
४) भैरवनाथ कुलदेवता काही घाटगे कुटूंबात मानली जाते.
५) त्यामुळे चंद्रसेन आणि खंडेराया, जोतिबा, भैरवनाथ.
हे राजेघाटगे घाडगे यांचे कुलदैवत आहेत.काही भागात अजून वेगवेगळ्या दैवताची उपासना असावी.
खटाव भागात नागनाथ मंदिर आहे.नागनाथ देवांची घाटगे मंडळी उपासना पूजा करतात.
👉 वेद - यजुर्वेद
👉 मंत्र - गायत्री
👉 वंश - १) सूर्यवंश (रघुवंश-रामाचा वंश) 👉 वंश :-सुर्यवंश 👉 राजाचे नावं :प्रभाकर वर्मा 👉 वेद:-यजुर्वेद 👉 कूळमंत्र:-गायत्री मंत्र. 👉 वारू :-ध्वजस्थबी सूर्य 👉 निशाण:पांढरा 👉 सिंहासन आणि चिन्ह: - दोन रंग(लाल व पांढरा) 👉 घोडा: - पांढरा, फ्लॅगपॉलवर चंद्र 👉 विजयशस्त्र:खडा 👉 सिंहासन साम्राज्य:-दिल्ली अयोध्या (उत्तरप्रदेशात),बुंदी संस्थान,खटाव देश (मुळं पुरुष कामराज राजेघाटगे) हाडा उर्फ हाडीया राठोड हे खुप पराक्रमी होते .यांची ठिकाण जयपूर , मेवाड़ , उदयपुर , कर्णावती , कुरुक्षेत्र चितोड बुदि या प्रामुख्याने भागात हाडा राठोड होते .हे मुळचे बुदि संस्थान येथील होते .हे उच्च कुलीन राठोड कुलीन राठोड घराणे होते .यांनी घाटगे पदवी मिळवली 👉 कूळ निशाण :-सूर्य 👉 कुळ देवता: - प्रभाकर उर्फ सूर्य
©®लेखक :-नितीन घाडगे
संपर्क :-8888494588
मलवडी हे खटाव तालुक्यातील नाही.
ReplyDeleteमलवडी हे ता.माण म्हणजे (दहिवडी) मद्धे येते. मोळ,बुध,डिसकळ, ललगुन, राजापूर,निमसोड, हे खटाव तालुक्यात येतात. माझ्या मते मुळ मलवडी संस्थान राजे घाडगे आहेत.
मलवडी वरून विस्तार झाला आहे त्यामुळे मी तस लिहलं आहे
ReplyDeleteउत्तम माहिती. धन्यवाद. 🙂🙏
ReplyDeleteखटाव डाळमोडी मधील घाडगे सुद्धा याच वंशातले आहेत का
ReplyDeleteराजाचे नावं - प्रभाकर वर्मा कि प्रभाकरवर्धन आहे
ReplyDelete