३१ ऑक्टोबर १६८३छत्रपती संभाजीराजे गोव्यानजीक म्हणजेच "किल्ले फोंडा" सीमेवर दाखल झाले.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ ऑक्टोबर १६२४ थोरले महाराज "शहाजीराजे" यांचे बंधू शरीफजीराजे हे भातवडीच्या लढाईदरम्यान धारातिर्थी पडले. इतिहासामध्ये ‘भातवडीचं युद्ध’ म्हणून एक लढाई प्रसिद्ध आहे. ३१ ऑक्टोबर १६२४ रोजी ही लढाई लढली गेल्याची नोंद आहे. अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही मुळापासून नष्ट करण्यासाठी भारतभरातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. पण ते तितकेसे सोपे नव्हते, कारण निजामशाहीकडे शहाजी राजे आणि शरीफजी राजे हे भोसले घराण्यातील २ पराक्रमी योद्धे होते. तलवारी भिडल्या आणि निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे आणि शरीफजीराजे निजामाचा वजीर मलिक अंबरच्या साथीने भल्या मोठ्या शत्रू पक्षांच्या सेनेला कापत सुटले. अशक्य वाटणाऱ्या या युद्धात शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला, पण त्यांना आपले बंधू शरीफजी राजे यांना मात्र गमवावे लागले. जर शरीफजी राजे जास्त काळ जगले असते, तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये अजून काही पराक्रमी गाथांची नोंद नक्की झाली असती ! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ ऑक्टोबर १६७९ छत्रपती संभाजी राजे व दिलेरखान यांची विजापूरला मोर्चे बांधणी