६ आॅक्टोबर १६७४छत्रपती शिवराय कल्याणमार्गे "पाली" येथे दाखल झाले.आणि येथूनच रामनगरचा काही भाग जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
६ आॅक्टोबर १६७४
छत्रपती शिवराय कल्याणमार्गे "पाली" येथे दाखल झाले.
आणि येथूनच रामनगरचा काही भाग जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
६ आॅक्टोबर १६७६
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
"छत्रपती शिवराय" दक्षिणेतील मोहीमेसाठी आज किल्ले रायगडवरून निघाले.
आजच्या दिवशी दसरा होता.
राजाभिषेक सोहळ्यानंतर प्रथमच महाराजांनी एवढ्या मोठ्या मोहीमेसाठी सिमोल्लंघन केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
६ ऑक्टोबर १६८६
सण १६८५ नंतर इंग्रजानी आपली दुटप्पी वागणूक बदलत छत्रपती शंभूराजेंशी मैत्री ठेवण्याचे धोरण ठेवले होते. मुघलांशी बिघडलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर लंडनहून सुरतकर आणि मुंबईकर यांना शंभूराजेंशी मैत्री राखण्यास सांगण्यात आले होते तसेच त्यांना तोफखाना आणि दारुगोळाही पुरवण्यास कळवले होते. याच दरम्यान सिद्दीच्या हालचाली पूर्वीप्रमाणेच सुरू होत्या. १६८६ साली सिद्दीने केलेल्या लुटीने चेऊल प्रांतातील रहिवासी परागंदा झाले होते व मुलुख ओस पडला होता. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात सिद्दीने मराठ्यांचे काही किल्ले घेतले. त्यातील एका गडावरील तोफ मुंबईहून दुसरीकडे नेण्यासाठी त्याने मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरकडे हाऊसर्स, २ कॅप्टन आणि दोन मोठे ठोकळे मागितले होते. पण शंभूराजेंशी बदललेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरने त्याला परवानगी दिली नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
६ ऑक्टोबर १७७६
दिनांक ६ ऑक्टोबर १७७६ रोजी पांडुरंग पटवर्धनराव फौजेसह मिरजेहून हैदरवर (धारवाड वर) स्वारीवर निघाले. त्यास कृष्णराव पानसे, शिवराम मामा घोरपडे, गुत्तिकर, निळकंठ राव शिंदे, नरगुंदीचे देसाई हे सरदार वाटेत मिळाले. ही सर्व मराठी फौज प्रांतात आलीसे पहाताच हैदरअल्लीच्या लोकांनी धारवाडचा वेढा उठऊन ते पळून बंकापुरास गेले. फक्त तीन हजार कन्नडिगे धारवाडच्या रानात मराठ्यांना त्रास देण्याकरिता लपून राहिले. डिसेंबर महात मराठ्यांनी धारवाड प्रांतातील सर्व ठाणी घेतली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
६ ऑक्टोबर १८५८
"क्रांतीवीर नानासाहेब यांचे निधन"
शके १७८० च्या भाद्रपद व. १४, रोजी सत्तावनच्या स्वातंत्र्ययुद्धांत चमकणारे 'बंडवाले' नानासाहेब पेशवे यांचा मृत्यु झाला. सन १८५७ च्या डिसेंबरांत कानपूरची लढाई होऊन बंडवाल्यांचा पराभव झाला. आणि नानासाहेबांस लखनौच्या बेगमेच्या आश्रयाने रहावे लागले. नंतर
तेथून ही पेशवे मंडळींना नेपाळांत जाण्याचा प्रसंग आला. या कष्टदायक प्रवासांत त्यांचे फारच हाल झाले. इंग्रजांना शरण जाण्यास नाना तयार नव्हते. "पुणे व सातारा ही जहागिरी परत मिळाल्याशिवाय शस्त्रे खाली ठेवणार नाही. हिंदुस्थानचे राज्य गिळंकृत करून उलट मलाच बंडखोर ठरविण्याचा आधिकार इंग्रजांना काय आहे?" अशी धमक अजूनहि त्यांच्या अंगी होती. पण नानासाहेब प्रकृतीने फार 'हैराण झाले होते. एके दिवशी मनास अति वाईट वाटून त्यांनी कालीमातेला आपल्या करांगुलीचा होम, केला. आणि अभीष्टसिद्धयर्थ प्रार्थना केली. जंगलांतील हवेमुळे नानासाहेबांस दोषी ताप येऊ लागला; व अखेर भाद्रपद व. १४ रोजी वनवास भोगीत असताच देवखरी येथील रानांत एका निर्झराच्या काठी नानासाहेब हिवतापाने मृत्यु पावले...! नानासाहेबा संबंधी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिले आहे : नाना म्हणजे हिंदभूचा साक्षात क्रोधच, नाना म्हणजे या भूमीचा नरसिंहमंत्रच. जणु काही या एका गुणामुळेच, ज्याचे बल भीमासारखे आहे, ज्याच्या डोक्यावर मुकुट शोभतो आहे, ज्याचे तेजस्वी नी तल्लख डोळे, दुखावलेल्या स्वाभिमानामुळे आरक्त झाले आहेत, ज्याच्या कमरेला तीन लाख रुपये किंमतीची म्यानांतून बाहेर पडण्यास आसुसलेली तरवार लटकत आहे आणि ज्याचा सबंध देह क्रोधाने, आणि स्वराज्य नि स्वधर्म यांचा सूड घेण्याच्या तीन आकांक्षेने खदिरांगार झाला आहे, त्या नानाची भव्य नि आकर्षक मूर्ति आपल्या डोळ्यांपुढे उभी राहते." नानासाहेब पेशव्यांनी क्रांतिकारकांना मिळून बरीच मोठी कामगिरी केली, परंतु दुर्दैवाने त्यांना यश आले नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment