३१ ऑक्टोबर १६८३छत्रपती संभाजीराजे गोव्यानजीक म्हणजेच "किल्ले फोंडा" सीमेवर दाखल झाले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ ऑक्टोबर १६२४
थोरले महाराज "शहाजीराजे" यांचे बंधू शरीफजीराजे हे भातवडीच्या लढाईदरम्यान धारातिर्थी पडले.
इतिहासामध्ये ‘भातवडीचं युद्ध’ म्हणून एक लढाई प्रसिद्ध आहे. ३१ ऑक्टोबर १६२४ रोजी ही लढाई लढली गेल्याची नोंद आहे. अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही मुळापासून नष्ट करण्यासाठी भारतभरातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. पण ते तितकेसे सोपे नव्हते, कारण निजामशाहीकडे शहाजी राजे आणि शरीफजी राजे हे भोसले घराण्यातील २ पराक्रमी योद्धे होते. तलवारी भिडल्या आणि निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे आणि शरीफजीराजे निजामाचा वजीर मलिक अंबरच्या साथीने भल्या मोठ्या शत्रू पक्षांच्या सेनेला कापत सुटले. अशक्य वाटणाऱ्या या युद्धात शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला, पण त्यांना आपले बंधू शरीफजी राजे यांना मात्र गमवावे लागले.
जर शरीफजी राजे जास्त काळ जगले असते, तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये अजून काही पराक्रमी गाथांची नोंद नक्की झाली असती ! 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ ऑक्टोबर १६७९
छत्रपती संभाजी राजे व दिलेरखान यांची विजापूरला मोर्चे बांधणी. छत्रपती शिवाजी महाराज व मोरोपंत पिंगळे पंतप्रधान पेशवे विजापूरजवळ कुमक घेऊन पोहोचले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ ऑक्टोबर १६८३
छत्रपती संभाजीराजे गोव्यानजीक म्हणजेच "किल्ले फोंडा" सीमेवर दाखल झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ ऑक्टोबर १७७३
रघुनाथराव पेशवेपदी
छत्रपती रामराजे महाराजांनी पेशवाईची वस्त्रे रघुनाथरावांसाठी त्यांचे पुत्र अमृतरावांच्या हाती सुपूर्त केली. छत्रपतींना नमस्कार करून अमृतराव साताऱ्यात जास्त दिवस न थांबता पुण्याला येण्यास निघाले. रघुनाथरावांना साताऱ्यातल्या या साऱ्या घडामोडी समजत होत्याच. ऑक्टोबरच्या अखेरीस अमृतराव पुण्याच्या जवळ आले असता रघुनाथरावांनी त्यांना थेट आळेगावास जाण्याचा निरोप पाठवला. रघुनाथरावांना पेशवेपदाची सूत्र मिळण्यात पुण्यातले लोक कदाचित आडकाठी आणतील म्हणून त्यांनी आळेगावला जाऊन दि. ३१ ऑक्टोबर १७७३ रोजी स्वतःच वस्त्र धारण केली आणि नंतर पुण्यात परतले. परंतु बारभाईंच्या कारस्थानामुळे त्यांचे पेशवेपद वर्षभरच टिकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ आॅक्टोबर १८७५
सरदार वल्लभभाई पटेल जयंती
स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न (मरणोत्तर – १९९१) (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४