पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

👉धनाजी जाधव यांची वंशावळ पुढीलप्रमाणे



👉अनिरुद्ध

👉प्रतिबाहु

👉सुबाहुआजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳


🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇


*२८ जून १६५३

👉दृढप्रहर (द्वारकेहून चंद्रादित्यपूर/चांदोर ला राजधानी आणली)(८६०-८८०)

👉स्युनचंद्र १ (श्रीनगर/सिन्नर नगर वसवून दजैतेथे राज्य स्थापले)(८८०-९००)

👉धडीयप्पा १

👉भिल्लम १

👉श्रीराज

👉वद्दीग १ (९५०-९७०)

👉धडीयप्पा २ (९७०-९७५)

👉भिल्लम २ (९७५-१००५)

👉वेसुगी १

👉अर्जुन

👉भिल्लम ३ (१०२०-१०४५)

👉वद्दीग २

👉वेसुगी २

👉भिल्लम ४

👉स्युनचंद्र २

👉सिंघण १

👉मल्लूगी

👉भिल्लम ५ (स्वतंत्र देवगिरी राजधानी वसविले व सार्वभौमत्व घोषित केले)(११८५-११९३)

👉जैत्रपाल १ (काकतीयांशी लढताना युद्धात मारले गेले)(११९३-१२००)

👉सिंघण २ (सम्राट उपाधी घेतली)(१२००-१२४६)

👉जैत्रपाल २ (वडिलांच्या हयातीत मृत्यू)

👉कृष्णदेव (आजोबांचा उत्तराधिकारी झाला)(१२४६-१२६१)

👉रामचंद्रदेव (खिळजीचे मांडलीकत्व पत्करले)(१२७०-१३११)

👉शंकरदेव ( खिळजीकडून पराभव )(१३११-१३१८)

👉गोविंददेव (जाधव आडनाव सुरू केले व बहमणींकडून जहागिरी मिळविली)(१३१८-१३८०)

👉ठाकुरजी (१३८०-१४२९)

👉भूकनदेव/भूतजी (१४२९-१५००)

👉अचलकरण (१५००-१५४०)

👉विठ्ठलदेव (१५४०-१५७०)

👉लक्ष्मणदेव / लखुजी जाधवराव (स्वबळावर निजमशाहीस दौलताबाद जिंकून देऊन १२००० मनसब मिळविली , काही काळ मोघळाईत गेले व परत निजामशाहीत आल्यावर दौलताबाद येथे दरबारात हत्या)(१५७०-१६२९)

दौलाताबदे निजाम च्या सुलताना च्या दर्शनाला लखुजी जाधवराव त्यांच्या तीन मुला सह म्हणजे अचलोजी, राघोजी आणि यशवंतरावगेले., हे तिघे सुलताना समोर उभे होते. मुजरे झाले व सुलतान भर दरबार मधून उठून निघून गेला आधीच कट ठरला होता तलवारी उपसल्या गेल्या . काहीच अर्थ , प्रतिकार करण्याची पूर्ण संधि सुद्धा लाभली नाही आणि सुलतानी दरबार चार जाधवांच्या इमानदार रक्ताने धुवून निघाला होता.आई जवळ राहिलेला बहद्दुर्जी तेवढा वाचला होता. 

धनाजी जाधव हे जिजाबाईंचे जवळचे नातलग.सख्ख्या भाऊ अचलोजीचा नअचलोजी चा मुलगा संताजी जो कानाकगिरीच्या युद्धात मारला गेला.त्या संताजी जाधव याचे पुत्र  शंभूसिंग आणि शंभूसिंग चा मुलगा म्हणजे धनाजी जाधव. 

अचलोजी (पित्यासह हत्या)

संताजी (राजमाता जिजाऊंनी आपल्याबरोबर पुण्यास आणले , कनकगिरीच्या युद्धात मृत्यू)

शंभूसिंह (शिवरायांच्या सेवेत विशाळगडाच्या लढाईत मारले गेले)


पुर्ण नाव :-

!! सरसेनापती धनाजीराव शंभुसिँह जाधवराव !! 



 धनाजीराव हे राजेलखुजीराव यांचे द्वितिय पुञ राजेअचलोजी यांचे पणतु होत. परंतु यांची शाखा यांचे आजोबा स्रजनसिँह/संताजी यांच्यापासुन राजमाता जिजाऊ साहेबासोबतच होती. 

 


👉धनाजींचा जन्म स. १६५० च्या सुमारास झाला.

जन्म = इ स १६४९-५० च्या सुमारास राजगड  येथे


 हे प्रथम प्रतापराव गुजराच्या हाताखालीं होते. उंबराणीच्या लढाईत तो प्रथम पुढें आला. 

👉पुढें 1674धनाजी हे हंबीरराव मोहिते यांंच्या हाताखालीं गेले.

या दोन्ही सेनानी चा प्रभाव धनाजी जाधव याच्या मध्ये दिसून येतो. 

 विजापूरचा सेनापति अबदुलकरीम याशीं झालेल्या नेसरीच्या लढाईत यांनी विशेष शौर्य दाखविल्यामुळें यांंस बढती देण्यांत आली (फेब्रु.) सावनूरच्या लढाईंत यांनी हुसेनखान मायणा याचा पुरा मोड केला तेव्हां शिवाजी महाराज यांनी याची तारीफ केली 1679

👉संभाजी महाराजांना विरंगती झाल्यावर आतां पुढें काय करावें हें ठरविण्याकरितां जी मुख्य मुख्य मराठे मंडळी रायगडावर जमली त्यांत धनाजी जाधव होते. त्यांंनें सातार्‍यास सर्जाखानाचा पराभव केला.

👉पुढें 1690धनाजी छत्रपती राजाराम महाराजांबरोबर जिंजीस गेले. तेथें त्यांंनें इस्मायलमकाचा पराभव केला, यावेळीं सरनौबत महादजी नाईक पानसंबळ याच्या मृत्यूचें वर्तमान समजल्यामुळें संताजी घोरपडे यांंस सेनापति नेमण्यांत येऊन त्याच्याबरोबर धनाजींंस जयसिंगराव ही पदवी देऊन महाराष्‍ट्रांत पाठविण्यांत आलें 1690

👉महाराष्‍ट्रांत  1692सालीं संताजींंच्या वांईकडील व गोदेच्या उत्तरतीरींच्या मोहिमांत बरोबर धनाजी होते. धनाजींंच्या सैन्यांत संताजीच्या इतकी चांगली शिस्त नव्हती पण ते आपल्या लोकांनां अधिक प्रिय होते. इकडे धनाजींंनें अमात्य व सचिव यांच्याबरोबर पन्हाळा घेतला होता. 

👉धनाजी हे संताजी घोरपडयांंबरोबर महाराष्‍ट्रांतून पुन्हां कर्नाटकांत आल्यावर (१६९३) पुढील वर्षें ते संताजींंबरोबरच होते.  


👉झुल्फिकारखानाची कर्नाटकांत झटापट चालू होती. त्यावेळीं व त्यानंतर धनाजींंनें कर्नाटकांत व महाराष्‍ट्रांत सर्व बाजूस आपली फौज पसरून मोंगलाशीं चाललेल्या युद्धांत बरेच नांवाजण्यासारखे पराक्रम केले (१७०३-०५) त्यामुळें औरंगझेब फार चिडला परंतु, त्याच्यानें मराठयांचा पुरा पराभव होईना.

👉औरंगझेब महाराष्‍ट्रांतील किल्ले घेण्यांत गुंतला होता. तेव्हां धनाजींंनें आपलीं बायकामुलें वाघिणगिरें येथें आणून ठेविलीं होतीं. इ. स. १७०५-०७ च्या सुमारास औरंगझेबानें तेथील गढीस वेढा दिला, तेव्हां धनाजी मोंगलांच्या सैन्याभोंवतीं घिरटया घालून त्यांनां त्रास देत होते. 

👉धनाजी व संताजी याचा मोंगलांच्या शिपायांस इतका धाक बसला होता कीं, ते आलेले दृष्‍टीस पडतांच ते पळावयास लागत. अशी एक आख्यायिका आहे कीं, आपल्या पडछायेस पाहून दचकून जेव्हां घोडा पाणी पीत नसे तेव्हां मोंगल स्वार 'तुला पाण्यांत धनाजी दिसतो कीं काय?' असें घोडयास विचारीत. 


👉 मोंगलांच्या छावणींतून शाहूराजांची सुटका होऊन ते महाराष्‍ट्रांत आले, तेव्हां ताराबाईंंकडून धनाजी जाधवांंची त्याच्यावर रवानगी झाली होती. परंतु धनाजींंनें शाहू हा तोतया नसून खरा आहे असें ओळखून ते त्याला मिळाले. पुढें शाहूराजे गादीवर बसले 

👉तेव्हां त्यानें धनाजींंस सेनापतीच्या जागीं कायम नेलें, व त्याच्याकडे कांहीं जिल्ह्यांचा वसूल गोळा करण्याचें काम दिलें (१७०८). धनाजी हे अखेरपर्यंत कोल्हापूरच्या विरुद्ध शाहूकडेच राहिले. कोल्हापूरकर मात्र त्यांंना फोडण्याचा प्रयत्‍न करीत होते.

👉पुढल्या वर्षीं धनाजी हे कोल्हापूरकरावरील रांगण्याच्या मोहिमेवरून परत येत असतां वारणा नदीच्या कांठीं वडगांव येथें मरण पावले (मे १७१०). त्यांंना कित्येक दिवसांपूर्वीं झालेली एक जखम पुन्हां वाहूं लागल्यामुळें ते बरेच दिवसपर्यंत आजारी होते. या आजारांत त्यांंनें वसुलाच्या कामाकरितां बाळाजी विश्वनाथ यांंची नेमणूक केली होती.



👉छत्रपती राजाराम महाराजाच्या कारकिर्दित धनाजीराव व संताजी घोरपडे यानी स्वराज्य वाचवुन मोगलावर मराठ्यांची वचक बसवली त्या अतुलनिय पराक्रमास तोड नाही.त्यामुळेच राजाराम महाराजानी त्यांचा पराक्रम पाहुन दोन गावे मौजे पाडळी व मौजे बोरगाव (बारामती) इनाम दिले व ती गावे वंशपरंपरागत म्हणुन ईनाम दिले.तसेच खुद्द धनाजीरावानी पिराजी बीन चंडोजी,नरसोजी बीन जयताजी व महादजी बीन आबाजी यादव देशमुख परगणे व तर्फ उंब्रज व तारगाव परगणे मजकुर याजकडुन 5 गावचे (नागठाणे,अतीत,इंदोली,कसबे पाली व हिँगनोळे) देशमुखी वतन 2700 रुपयास खरेदी केले.राजाराम महाराजानी 1000 रुपये नजराणा घेऊन 5 गावचे देशमुखीचे वतनाबद्दल वंशपरंपरागत दुमालपञ करुन दिले.याशिवाय राजाराम महाराज वारल्यानंतर पिराजी बीन चंडोजी ,पदाजी बीन आबाजी व गिरजोजी बीन मुधोजी यादव देशमुख परगणे कराड याजकडुन 138 गावची देशमुखी खरेदी करुन घेतली,त्याबद्दल सरकारात नजराणा 5000 रुपये भरुन देशमुखीबद्दल कबुलायत करुन घेतली.धनाजीराव यांच्या अधिकाराखाली राजाराम महाराजाच्या निधनानंतर मुलकी व लष्करी ही 2ही सेवा होत्या परंतु यानी या स्वराज्याकरिता एवढी मोठी कामगिरी करुन 10-15 लाखाचा मुलुख तोडुन घेण्याऐवजी स्वार्थत्याग करुन फक्त 2 गावे इनाम घेतली व 138 गावे स्वतःच्या कमाईवर विकत घेतली.म्हणजे खरोखरच छञपती शिवराय महाराजांच्या विचाराच्या मुशीतुन घडलेले मावळेच. 


👉सावनुरची लढाई = यावेळी यांचे वय 20 ते 25 दरम्यान होते.स्वतंत्रपणे लढाई देण्याचा त्यांचा पहिलाच प्रसंग होता.या लढाईत हंबीरराव मोहिते,धनाजीराव व संताजी घोरपडे यानी विजापुरकराची लंगडेतोड करुन विजय मिळवला.यात धनाजीराव यांच्या हालचाली विद्युतवेगाच्या होत्या. एवढ्या वयात एवढे मोठे जबाबदारीचे कार्य केल्यानंतर धनाजीराव आण्णाजी रंगनाथ मालेकर सोबत शिवरायाना भेटण्याकरिता रायगडावर गेले असता शिवरायानी त्यांची प्रशंसा केली व म्हणाले,"ही मनुष्य प्रतिस्रुष्टी निर्माण करतील.आम्ही येथे नसता बादशहाशी स्पर्धा करुन मुलुख घेऊन गर्वरहित केला.आम्हाशी बोलण्यास त्यास ऊरुज न राहिला,यांचे उतराई कोठे व्हावे? असो.आमच्या साह्यार्थ हे देवलोकाहुन मनुष्य रुपी निर्माण झाले असेच वाटते.जाधवराव 25 ते 30 हजार मुसलमान फौजेशी लढाई 6 ते 7 हजार माणसानिशी कशी केली?" 


👉धनाजीराव यानी शिवराय महाराज,संभाजी महाराज,राजाराम महाराज व शाहु महाराज या प्रत्येक छत्रपतीँच्या अधिकाराखाली अतुलनीय पराक्रम करुन खरोखरच या स्वराज्यासाठीच जन्मले आहेत हे सार्थ करुन दाखवले. धनाजीराव यांच्या म्रुत्युनंतर देखिल त्यांच्या वंशजानी या स्वराज्यासाठी प्राणपणाला लावला परंतु पेशव्यानी मात्र त्यांच्या वंशजाना स्वराज्य सोडण्यास भाग पाडले....



👉धनाजींं जाधव राव याची पत्नी  गोपिकाबाई ही सती गेली.

👉 धनाजींंस दोन बायका होत्या.

👉 पहिलीस संताजी 

👉 दुसरीस चंद्रसेन आणि शंभुसिंह असे पुत्र होते. पैकीं चंद्रसेन हा पुढें सेनापति झाला.


👉पुञ = संताजीराव,चंद्रसेनराव शंभुसिँह. आणि  पतंगराव 


👉 शिवाजी महाराजांच्या तालमींत तयार झालेला धनाजी हा शाहूच्या कारकीर्दीत शेवटचाच पुरुष होय.

👉 धनाजी हे सत्तेच्या जोरावर लोकांचे वतनी हक्क दडपण्यास कमी करीत नसे हें गसूर व कर्‍हाडच्या देशमुखीच्या तत्कालीन तंटयावरून दिसून येतें.

👉चंद्रसेन जाधव:- हा धनाजीचा मुलगा. धनाजी आजारी असतांना बाळाजी विश्वनाथ हे त्यांंचा कुल कारभार पाहूं लागले, तेव्हां त्याच्या मनांत बाळाजींंविषयीं मत्सर उत्पन्न झाला. वास्तविक चंद्रसेनाचा ओढा ताराबाईंंकडे होता व तो आंतून तिला (शाहूराजांच्या विरुद्ध) फितूरहि झाला होता. धनाजींंच्या मरणानंतर चंद्रसेनाकडे सेनापतित्व आलें. इ. स. १७१३ मध्यें मोगलाईंतून चौथ, सरदेशमुखी व घांसदाणा हे हक्क वसूल करण्याकरितां चंद्रसेनाची योजना झाली होती. या प्रसंगीं वरील हक्कांपैकीं सरदेशमुखी गोळा करण्याकरितां चंद्रसेनाबरोबर बाळाजी विश्वनाथांंची नेमणूक झाली असल्यामुळें बाळाजींंविषयीं चंद्रसेनाचा द्वेषाग्नि अधिकच भडकला. त्यानें क्षुल्लक कारणावरून (हरणाचा तंटा) कुरापत काढून बाळाजींंचा पाठलाग केला व (शाहूराजांंच्या आज्ञेवरून) त्यास पांडवगडामघ्घें आश्रय मिळाला असतां चंद्रसेनानें त्या किल्ल्यास वेढा दिला, व बाळाजींंस आपल्या हवालीं करण्याविषयीं शाहूराजां जवळ उर्मटपणानें मागणी केली. शाहूराजांनें हैबतराव निंबाळकरास जाधवाचें पारिपत्य करण्यास पाठविलें. निंबाळकरानें जेऊरजवळ चंद्रसेनाचा पराभव केला; तेव्हां तो उघडपणें कोल्हापूरकर संभाजीराजांकडे गेला; परंतु पुढें लवकरच दक्षिणेंत निजामउल्मुल्क आल्यावर त्यानें निजामाच्या पदरीं चाकरी धरली व शाहूराजांचा पाडाव करण्याची खटपट चालविली. बेदरच्या पूर्वेस २५ मैलांवर भालकी येथें बरीच मोठी जहागीर निजामानें जाधवास देऊन त्यास आपल्या पदरीं ठेविलें. मराठेशाहीस निजाम यापुढें त्रास देई तो याच्याच बळावर. चंद्रसेनास शाहूनें वळवून घेतलें असतें तर निजामाच्या कायमचा त्रास मिटला असता. इ. स. १७१६ मध्यें सय्यदबंधु हुसेन अल्लीखान याचा दिवाण महकबसिंह, खंडेराव दाभाडे यांच्या दरम्यान अहमदनगराजवळ जी लढाई झाली तींत चंद्रसेन मोंगलांकडून लढत होता.

इ. स. १७२० मध्यें निजामउल्मुल्क हा मोंगल बादशहापासून स्वतंत्र होण्याच्या उद्देशानें दक्षिणेंत आला तेव्हां चंद्रसेन जाधव त्याच्या सैन्यास जाऊन मिळाला. बाळापुरच्या लढाईंतहि चंद्रसेन निजामाकडून लढला. स. १७२५ त तर चंद्रसेनानेंच निजामास शाहूविरुद्ध उठविलें होतें.

👉इ. स. १७२७-२८ मध्यें निजाम व बाजीराव यांच्यामध्यें जें युद्ध झालें, त्यांत चंद्रसेन लढत होता. त्यानेंच संभाजीस शाहूराजांकडे राज्याचा हिस्सा मागण्यास चिथविलें होतें. त्यानें १७३९ सालीं संभाजीचा पक्ष घेऊन बीडकडे धुमाकूळ घातला. हा १७५१ सालीं मरण पावला.

👉रामचंद्र जाधव:- हा चंद्रसेनाचा मुलगा. इ. स. १५५६ त हैद्राबादचा नबाब सलाबतजंग यानें रामचंद्र जाधव व रावरंभा निंबाळकर यांनां बुशीच्या पाठलागार्थ त्याच्या मागोमाग पाठविलें होतें परंतु बुशी आपलें फारसें नुकसान न होऊं देतां हैद्राबादेस जाऊन पोंचला. यानंतर बुशीनें याला आपल्याकडे वळवून घेतल्यामुळें यानें मच्छलीपट्टणाहून बुशीच्या मदतीस हैद्राबादेस जी कुमक येत होती तिला मुळींच अडथळा केला नाहीं.

👉स. १७५६ च्या अखेरीस बुशी आपल्या पूर्वकिनार्‍यावरील जहागिरीकडे निघून गेल्यावर, बुशीकडे जी कुमक आली होती, तिला अडविण्याच्या कामीं रामचंद्र जाधवानें जी हयगय केली, तिजबद्दल त्याचें पारिपत्य करण्यासाठीं, सलाबत जंगानें त्याजवर स्वारी करून, त्याची बहुतेक जहागीर त्याजकडून काढून घेतली. बाह्यत: मात्र, रामचंद्र जाधवानें कराराप्रमाणें चाकरीस ठेवावयास पाहिजे तेवढी फौज ठेविली नाहीं, असें या स्वारीचें कारण दाखविण्यांत आलें होतें. उदागीरच्या लढाईंत हा निजामाकडेच होता. स. १७६१ मध्यें निजामअल्लीनें गोदावरीतीरीं असलेल्या कायगांव टोकें नांवाच्या गांवातील हिंदु देवळें उध्वस्त केल्यावरून, रामचंद्र जाधव मोंगलांनां सोडून मराठयांच्या पक्षास मिळाला.

👉इ. स. १७६२ त राघोबादादानें याला सेनापतीचीं वस्त्रें दिलीं. परंतु सेनापति या नात्यानें गुजराथप्रांतहि आपल्या ताब्यांत देण्यांत येईल अशी जी यास आशा होती, ती सफळ न झाल्यानें हा लवकरच पुढें पुन्हां निजामअल्लींकडे गेला. रामचंद्र हा स. १७६९ त निजामकडून मारला गेला. त्याचा पुत्र खाशेराव ह्यास भालकीची जहागीर मिळाली होती.





👉म्रुत्यु = २७ जुन १७०८

👉वंशज शाखा माळेगाव बुद्रुक मांडवे व बोरगाव 

*टीप*:-

*ही माहिती जाधव वंशविस्तार मधून घेतली आहे*

पुस्तकात दिलेली वंशावळ खलील प्रमाणे 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४