३० सप्टेंबर १६७७छत्रपती शिवरायांनी मद्रास इंग्रज गव्हर्नरकडे तोफा व इंजिनिअर्सची मागणी केली
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० सप्टेंबर १६५९ स्वराज्यावर चालून आलेला आदीलशाही सरदार "अफझलखान" याने १२ मावळ मधील रोहीड खोरेचे वतनदार आणि स्वराज्याशी कायम एकनिष्ठ असणारे "कान्होजी जेधे" त्यांचे सुपुत्र व छत्रपती शिवरायांचे बालमित्र "बाजी जेधे" यांना स्वराज्यविरोधी जाण्यासाठी पत्र पाठविले. पण "बाजी जेधे" यांनी ते धुडकावून लावले आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मुजरा करावयास हजर झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० सप्टेंबर १६६४ १६६४-६५ वर्षाच्या मध्यान्हात औरंगजेबाचा अनेक वर्षाचा स्वराज्यावरील क्रोध चालून आला. हा क्रोध, कधीकाळचे जयपुरचे राजे मिर्झाराजे जयसिंग ह्या सरदाराच्या रूपाने चालून आला. धूर्त राजकारणी, चाणाक्ष मुत्सद्दी, महापराक्रमी आणि बुद्धिने तल्लख असलेल्या मिर्झाराजांचे हे गुणविशेष मात्र परकियांच्या पुढे झुकत होते, आणि हेच शल्य इतिहासात त्यांच्यावर दिसते. अर्थात त्यांना यात कसलाही कमीपणा वाटत नसे. तर असे हे मिर्झाराजे दख्खन मोहिमेकरीता ३० सप्टेंबर १६६४ रोजी मुक्रर झाले. दिल्ली दरबारातील मोठ्या-मोठ्या सरदारांसह दिलेरखा...