२९ सप्टेंबर १६८९सरसेनापती श्रीमंत हरजीराजे परसोजी राजेमहाडिक स्मृतीदिन
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२९ सप्टेंबर १६३५
स्वतः शहाजहान बादशहा थोरले महाराज साहेब फर्जद शहाजीराजेंचा बीमोड करण्यासाठी निघाला आणि तडक दौलताबादेस आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२९ सप्टेंबर १६८२
मुंबईकर इंग्रजांचे सुरतकरांना पत्र
छत्रपती संभाजीराजेंच्या भीतीने मुंबईकर इंग्रज सिद्दीला मुंबईत आश्रय देत नव्हते पण सुरतकर इंग्रजांच्या दडपणामुळे ९ मे १६८२ ला त्यांना सिद्दीला मुंबईत प्रवेश देणे भाग पडले. सिद्दी कासम मुंबईत आल्याचे समजताच मराठ्यांनीही आपली ४० गलबते खांदेरीवर पाठवली. तरीही सिद्दीने ऑगस्ट अखेरीस नागोठणे येथे जाऊन मराठी मुलखात लूटमार केली व बऱ्याच लोकांची नाके कापली आणि एका हवालदाराला पकडून नेले. तरीही सुरतकर मुंबईकरांना सिद्दीला १० हजार रुपयांचा सर्व प्रकारचा माल आणि त्यांच्या कुटुंबांना मुंबईत आसरा द्यायला सांगत होते. सिद्दीला मदत करण्याच्या सुरतकर इंग्रजांच्या या धोरणाबद्दल नापसंती व्यक्त करत मुंबईकरांनी लिहिले की,
"मागील वेळेप्रमाणेच याही वेळी सिद्दीचे लोक राहिल्याने अन्नाचे दुर्भिक्ष वाढेल, दृष्ट लोकांना आसरा देऊन त्यांच्याशी सामोपचाराने वागणे कठीण आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२९ सप्टेंबर १६८९
सरसेनापती श्रीमंत हरजीराजे परसोजी राजेमहाडिक स्मृतीदिन
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२९ सप्टेंबर १७२७
सुलतानजी नाईक निंबाळकर निजामाला जाऊन मिळाल्यानंतर त्यांचा भाऊ सिधोजी नाईक निंबाळकर यांची सरलष्कर म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी नेमणूक केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२९ सप्टेंबर १७४६
दक्षिणेकडची परिस्थिती, आणि त्यातही निजामादी लोकांची एकंदर कार्यपद्धती पाहता तिथली बरीचशी लोकं वैतागली होती, आणि स्वतंत्र होण्याची इच्छा व्यक्त करत होती. दि. २९ सप्टेंबर १७४६ रोजी पेशव्यांचा हस्तक नागो राम हा कर्नाटकातून अब्दुलमाजीदखानाच्या गोटातून लिहितो की या प्रांतात कोणीच धनी नाही. तेव्हा पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडून हा प्रदेश जिंकण्यासाठी परवानगी घ्यावी आणि हे सगळं आपलंसं करावं. यापुढे नागो राम जे लिहितो ते महत्वाचं आहे, "येथे चर्चाही लोक करितात की हा प्रांत पंतप्रधानांनी केल्यास या प्रांताचे प्राक्तन उघडेल ऐसी सर्वांस आशा आहे".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment