११ सप्टेंबर १७५१सिंहगड किल्ल्याच्या दारूगोळ्याच्या कोठारावर ११ सप्टेंबर १७५१ रोजी वीज पडून गडावर मोठा स्फोट झाला होता. ज्यामुळे गडावरील अनेक इमारतींना हानी पोहोचली होती. ज्याच्या दुरुस्तीसाठी ८७०० रुपये खर्च पडल्याचीही नोंद आहे

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ सप्टेंबर १६५७
मुघल शाहजादा मोहंमद अकबर याचा जन्म
सहावा मुघल बादशहा औरंगजेबाला एकुण पाच मुले होती. त्यातील चौथ्या क्रमांकाचा मुलगा मोहंमद अकबर हा त्याचा सर्वांत लाडका होता. याचे एक प्रमुख कारण म्हणजे म्हणजे ११ सप्टेंबर १६५७ या दिवशी अकबराच्या जन्मानंतर सुमारे एक महिन्यात त्याची आई दिलरासबानुचा मृत्यु झाला होता. तिच्यापासुन १६५३ मधे मोहंमद आझम हा सुद्धा पुत्र औरंगजेबाला होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ सप्टेंबर १६७९
दर्यासारंग दौलतखान कुमक घेउन इंग्रजांबरोबरच्या लढाईसाठी माईनाक भंडारीच्या मदतीला खांदेरी येथे पोचला. इंग्रजांची 'हंटर', 'रिवेंज' आणि इतर ३ लढाउ जहाजे खांदेरीला वेढा टाकून उभी होती. दौलतखानाने इंग्रज अधिकारी 'केग्विन'चा पाडाव केला, माईनाक भंडारीला रसद पोचती केली आणि 'नागाव'ला पुन्हा रसद घेण्यासाठी परत गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ सप्टेंबर १७४१
पोर्तुगीजांनी बार्देश घेतल्यावर सावंताच्या कुडाळ परगण्यावर चाल करण्याची योजना पोर्तुगीजांनी आखली
होती. त्याचा सुगावा जयराम सावंत याला लागताच त्याने पेशव्यांकडे धाव घेतली. पुणे दरबाराने पोर्तुगीजांना बार्देशच्यापुढे चाल न करण्याचा इशारा दिल्याने त्यांना चढाई थांबवावी लागली. दि. ११ सप्टेंबर १७४१ रोजी सावंत आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये तह होऊन सावंताना बराच प्रदेश गमवावा लागला. त्यात खोर्जुवे आणि पनाळे ही दोन बेटे व मये आणि आराबा या गावातील शेतजमिनींचा अंतर्भाव होत होता. त्या शिवाय पीर्ण हा गाव जो सावंताना पोर्तुगीजांकडून मिळाला होता, तोही त्याना पोर्तुगीजाना परत करावा लागला. वरील प्रदेश घालविण्याखेरीज दरसाल एक हजार अश्रफींची खंडणी देण्याचे सावंताना कबूल करावे लागले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ सप्टेंबर १७५१
सिंहगड किल्ल्याच्या दारूगोळ्याच्या कोठारावर ११ सप्टेंबर १७५१ रोजी वीज पडून गडावर मोठा स्फोट झाला होता. ज्यामुळे गडावरील अनेक इमारतींना हानी पोहोचली होती. ज्याच्या दुरुस्तीसाठी ८७०० रुपये खर्च पडल्याचीही नोंद आहे. पुढे याच इमारतीत ब्रिटिशांनी काही काळ चर्चही थाटले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ सप्टेंबर १७९०
रजपुतांचा कायमचा निकाल लावण्यासाठी महादजींची ११ सप्टेंबर १७९० रोजी राठोडांशी मातबर लढाई झाली. लढाईचे समयी मराठे फौज राठोडवर चालून गेली. राठोडानी फार प्रतिकार केला. पण मराठ्यांच्या चढाईपुढे त्यांचा टिकाव न लागता राठोडाचे फौजेचा बीमोड होऊन राठोड पळून गेले. मराठ्यास यश प्राप्ती झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ सप्टेंबर १९६५
भारत पाक युद्ध
भारतीय सैन्याने लाहोरजवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...

पानिपत आणि रहिमतपूरकर माने