Posts

Showing posts from June, 2026

२४ जून १६७०बारा मावळाची सुरुवात जिथून होते त्या रोहिडे खोर्‍यातील "रोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड" मराठ्यांनी जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ जून १५६४ गोंडवानाची महाराणी राणी दुर्गावतीचे बलिदान मोगल सम्राट अकबर संपूर्ण हिंदुस्थानात आपली सत्ता वाढवू पाहत होता. त्यावेळच्या सर्व राजा-महाराजांना त्याने, एकतर मोगल साम्राज्याचे सेवक व्हा किंवा युद्धाला तयार रहा असा प्रस्ताव पाठवला होता, ज्यामध्ये बरेच राजपूत मोगलांचा हा प्रस्ताव स्वीकारून मोगलांचे  मांडलिकत्व पत्करले होते. या प्रस्तावाला धुडकावून लावणारी मंडळी सुद्धा होती ज्यामध्ये आपणास महाराणा प्रताप ये नाव माहीतच आहे. परंतु या मध्ये एक महाराणी होती जिने त्याचा हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि मोगलांशी लढली. या राणीचे नाव आहे "महाराणी दुर्गावती" !! १५४२ साली तिचे लग्न दलपत शाहशी झाला. दलपत शाह गोंड (गढ़मंडला) राजा संग्राम शाह यांचे ज्येष्ठ पुत्र होते. लग्ना नंतर फक्त चार वर्षातच दलपत शाह मरण पावला आणि राज्यकारभार दुर्गावती राणीकडे आला.  ती गोंड (गोंडवाना) राज्याची पहिली राणी झाली, अकबराच्या दबावाला बळी न पडता तीने लढा दिला आणि त्यात तीने स्वतचा जीव दिला. गोंडवाना राज्यावर मोगल सम्राट अकरबरा शिवाय बाज बहाद्दरन...

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* *१९ जून इ.स.१६२६*

*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*  *१९ जून इ.स.१६२६* बहामनी शासकाच्या वजीर निजाम मलिक अंबर याच्या काळात धोडप किल्ला नगरच्या निजामशहाकडे होता. निजामशाही नष्ट करण्यासाठी आलेल्या मुघलांच्या सरदार अलीवर्दीखानाने निजामच्या किल्लेदाराला १ लाख रुपयाच्या मनसबीची लालूच दाखवून १९ जून १६२६ मध्ये किल्ला ताब्यात घेतला आणि त्याने थोडी फार पुनर्बांधणी व डागडूजी करुन किल्ला भक्कम केला. किल्ल्यावर अलीवर्दीखानाने पर्शियन भाषेत कोरलेला शिलालेख वाचावयास किंवा पहायला मिळतो. *१९ जुन इ.स.१६३६* शहाजहान बादशहाचा गुलाम अलीवर्दीखान तुर्कमान याने १४ किल्ले ४ महिन्यात काबीज केले. इ.स.१६३५ शहाजहान बादशहाने दक्षिणेत स्वारी केली. त्याने बागलाण- नाशिककडील किल्ले घेण्यासाठी शाहिस्तेखानाच्या नेतृत्वाखाली अलावर्दीखान यांस नेमले. अलावर्दीखान याने त्या भागातील सर्व किल्ले राजे शहाजीराजे यांच्या लोकांकडून घेतले. त्यासंबंधीचा शिलालेख धोडप किल्ल्यात आहे. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे:- शहाजहान बादशहाचा क्षुद्रतम गुलाम अलावर्दीखान तुर्कमान याने धोडपचा किल्ला व इतर १४ किल्ले अवघ्या ४ महिन्यांत काबीज केले. चांदवड, अंतराळ, (इंद...