Posts

Showing posts from July, 2026

व्यंकोजी/एकोजीराजे भोसले •••

••• व्यंकोजी/एकोजीराजे भोसले ••• शहाजी राजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जहागिरीचा हक्क त्यांचा मुलगा व्यंकोजी यांस प्राप्त झाला. शहाजी राजांचा थोरला मुलगा संभाजी शहाजी राजांबरोबर कर्नाटकातच होता. परंतु संभाजीचा मृत्यु कनकगिरीच्या युद्धात झाला, त्यामुळे जहागिरीची सूत्रे स्वाभाविकपणे व्यंकोजीराजांकडे आली. व्यंकोजी हे शहाजीराजांची दुसरी पत्नी तुकाबाई हिचे पुत्र होते. व्यंकोजीराजांच्या जन्मतिथी बद्दल फार थोडी माहिती उपलब्ध आहे. तंजावर च्या बृहदीश्वर मंदिरातील शिलालेखात शिवजन्माची साल १६२९ मानले आहे मात्र शिलालेखात तारखा व इ.स. च्या बाबतीत बऱ्याच चुका आहे. त्यामुळे शिवजन्माची साल ही चुकलेले आहे. व्यंकोजी हे शिवाजी महाराजांचे कनिष्ठ बंधू होते, त्यामुळे व्यंकोजीचे जन्मसाल 1629 हे मानता येत नाही. देवीसिंग चौहाण मात्र शके १५५२ माघ फाल्गुन मध्ये व्यंकोजी राजांचा जन्म झाला असे मानतात. याचा अर्थ शिवजन्मानंतर लवकरच व्यंकोजी राजांचा जन्म झाला असावा. थोरल्या संभाजी राजांच्या मृत्यूनंतर शहाजीराजांनी व्यंकोजींवर कर्नाटकातील जहागिरीची जबाबदारी सोपविली. व्यंकोजीराजांनी आपल्या जहागिरीचा कारभार सांभाळला त्या...

१८ जुलै १६७२साल्हेर गड मोहीमछत्रपती शिवरायांनी मोगलांचा पराभव करून "नाशिक" स्वराज्यात आणले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ जुलै १६६६ हस्ब -उल- हुक्म प्रमाणे महाराजांनी मागीतलेले ६६००० रू. कुमार रामसिंगा कडून मिळाले. या आधी महाराजांनी अनेक अर्ज बादशहाकडे केले होते. मला जाऊ द्या, मी माझे किल्ले भांडून जिंकून बादशहास देतो. बादशहा अर्ज नकारत होता १८ जुलै च्या पत्रात अर्जाचा पुनर्विचार करण्यास रामसिंगास सांगत आहेत. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ जुलै १६७२ साल्हेर गड मोहीम छत्रपती शिवरायांनी ठाकुरजी उर्फ पतंगराव जाधवरावांचा (जाधवरावांचा नसून मोगलांचा) पराभव करून "नाशिक" स्वराज्यात आणले. इ.स.१६७२ साल्हेर गड मोहिमेसमयी दक्षिणेत  मोगल सुभेदार बहादुरखान हा होता व नाशिकचा ठाणेदार हे जाधवरावांच्या थोरल्या शाखेचै ठाकुरजी उर्फ पतंगराव जाधवराव हे लखुजीरावाचे जेष्ठ पुत्र दत्ताजीराव यांचे द्वितीय चिरंजिव हे होते व सिद्दी हीलाल हे वणी दींडोरीचे ठाणेदार होते... छत्रपती शिवरायांच्या सैन्याचा या मोहिमैत ठाकुरजी जाधवराव व सिद्दी हीलाल यांनी पाहिजे तसा प्रतिकार केला नाही.. कारण हे दोघे शिवरायांशी संधान बांधुन होते... याकारणे ठाकुरजी आणी हीलाल यांचा सरसुभेदार बहादुरख...

१४ जुलै १६७४"बहादूरखान कोकलताश" याच्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. राजाभिषेकानंतर प्रथमच १ कोटींची एवढी प्रचंड लूट मराठ्यांनी रायगडावर जमा केली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १४ जुलै १६५९ सोनोपंत डबीर दिल्लीहुन स्वराज्यात परत त्यासुमारास स्वराज्यावर अफजलखानाचे संकट घोंघावत होते. महाराज नुकतेच जावळीला आले होते. इस १६५७ मधे शिवाजीराजांनी मुघलांच्या ताब्यातील जुन्नरवर अचानक हल्ला करून औरंगजेबाला धक्का दिला होता खरा मात्र, त्याविरुद्ध काही तोडगा काढण्याआधीच औरंगजेबाला सत्तासंघर्षासाठी दिल्लीच्या दिशेने जावे लागले.  भाऊ आणि इतर प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढुन व बाप शहाजहानला कैदेत टाकुन निश्चिंत होऊन औरंगजेब ५ जून १६५९ रोजी थाटामाटात दिल्लीच्या गादीवर बसला. त्याप्रसंगी राजकारणाचा भाग म्हणून महाराजांतर्फे नजराणा घेऊन सोनोपंत दिल्ली दरबारात उपस्थित होते. त्यांनी तो औरंगजेबाला पेश केला त्याबदल्यात औरंगजेबानेही महाराजांना देण्यासाठी पोशाख व फर्मान सोनोपंतांना दिले. फर्मानात 'इकडील लोभ आपणावर पूर्ण आहे असे जाणून असावे' असे नमूद होते.  अफजलखानाचे प्रचंड संकट आले असताना किमान मुघलांच्या आघाडीवर शांतता होती हे तस बरच झाल मात्र, ही केवळ तात्पुरती व वरवरची गोडीगुलाबी होती हे पुढच्या काही महिन्यांतच सिद्ध झाल...