Posts

किल्ले सरसगड 🚩**ता.सुधागड जि.रायगड*

Image
*🚩 किल्ले सरसगड 🚩* *ता.सुधागड जि.रायगड* *रायगड जिल्ह्यातील पाली या गावाच्या पूर्वेस "सरसगड किल्ला" आहे.* 🚩🚩🚩 या किल्ल्याच्या पूर्वेला १०-१२ कि.मी. वर सुधागड हा किल्ला आहे. धनगड, कोरीगड, तेलबैला, खंडाळा घाट, नागफणी, जांभूळपाडा, अंबा नदी, गरम पाण्याची कुंडे असणारे उन्हेरे गाव असा मुलूख या गडावरून दिसतो. किल्ल्याच्या पाथ्याला असलेल्या पाली गावात प्रसिद्ध अष्टविनायक गणपती बल्लाळेश्वराचे भव्य मंदिर आहे. सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा किल्ला रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुक्यामधे आहे.🪴🪴 *🚩 इतिहास:-* इ.स. १३४६ मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद ( निजामशाहीचा संस्थापक) कोकणात उतरला. त्या वेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सुरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले.नंतर हे किल्ले आदिलशाहीत दाखल झाले.🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदाना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागडच्या देखभालीसाठी पाच हजार होन आणि सरसगडासाठी दोन हजार होन दिले. पुढे भोर संस्थानात या किल्ल्य

श्री मोरया गोसावींच्या परम भक्तीमुळेच त्यांचे नाव श्री गणेशाबरोबर जोडले गेले व संपूर्ण जगात जयघोष सुरु झाला ....

🌹 *चिंचवडचे श्री मोरया गोसावी* म्हणजेच आपले गणपती बापा मोरया मधले *मोरया* 🌹 श्री मोरया गोसावी महाराज हे १४ व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची आराधना केली. अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते. ते संत एकनाथ महाराज यांचे समकालीन होते. त्यांनी पुण्यातील चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली.  असे म्हटले जाते की,गणपतीने मोरयास असा सक्षात्कार करून दिला की "मी (गणपती) तुझ्या पूजे करीता चिंचवड येथे प्रकट होणार आहे.मोरया गोसावी महाराज यांना कऱ्हा नदीच्या पात्रात तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती (मंगलमूर्ती) प्राप्त झाली.त्यानंतर मोरया गोसावी महाराज मोरगावहून चिंचवड येथे जाऊन स्थायिक झाले.तेथे त्यांनी गणपती मंदीर उभारले व त्यात कर्हेत प्राप्त झालेल्या गणेशमुर्तीची (मंगलमूर्तीची ) स्थापना केली काही कळाने मोरया गोसावी महाराजांनी संजीवन समाधी घेतली. श्री मोरयांना चिंतामणी नावाचा मुलगा होता,तो गणेशावतार होता. चिंचवड येथील मोरया गोसावी महाराजांची समाधी आणि त्यांनी ऊ

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ एप्रिल १६६१* छत्रपती शिवरायांनी कोकणातील आताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील “प्रचीतगड उर्फ उचीतगड” जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ एप्रिल १६७९* छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदृष्टीचे धोरण व त्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज माहीत आहेत ते गड, कोट बांधणारे म्हणून.. पण स्वराज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी देसाई, देशमुख यांना तटबंदी असलेले वाडे बांधून द्यायचे नाहीत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण होते. या धोरणाची स्वराज्यात किती काटेकोर अंमलबजावणी केली जात होती त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बंकापूरचा देशाधिकारी बाबाजी शिवदेव याला धाडलेले खालील आज्ञापत्र. या आज्ञापत्रात "सांउसीचा कोट देखील पाया पाडून टाकणे" असे फर्माविले आहे. कर्नाटकातील तत्कालीन कुंदगोळ परगण्यात मौजे सांउशी हा गाव येत होता. हा गाव केंचणगौडा देसाई यास इनाम होता. महाराजांनी त्याचे इनाम चालू ठेवले मात्र गाव त्याच्या ताब्यात देण्याअगोदर सांउसी गावची तटबंदी पायासकट पाडावी अशी आज्ञा केली. सदर पत्राची आताच्या कालगणनेप

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ एप्रिल १६४५* हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला रायरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली. सह्याद्रीतील प्राचीन रायरेश्वर मंदिराला शिवाजी छत्रपतींमुळे अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आपली स्वराज्याची संकल्पना त्याची दूरदृष्टी काही मोजक्या परंतु विश्वासू आणि जिवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते आणि सोनोपंत डबीर अशा बारा मावळातील सवंगडी यांच्या समोर मांडली. त्या दिवसापासून सुरुवात झाली इतिहासातील काही सोनोरी क्षणांना, पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात एकजूट होऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ एप्रिल १६८०* राजापूरच्या इंग्रजांनी आपल्या आपल्या वरीष्ठास पत्रे लिहून कळवले कि, छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व राज्यसूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ठीकठिकाणच्या सुभेदारास व हवालदारास त्याने आपल्यापाशी बोला

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष* ********************************** *२६ एप्रिल इ.स.१६७५* मराठा फौजेने कारवारवर हल्ला केला. फोंडा काबीज होताच महाराजांनी त्वरेने हालचाल करून कारवार प्रांत जिंकून घेतला. ३ हजार मराठी घोडदळ व काही पायदळ एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात शिवेश्वर किल्ल्याला वेढा घालून बसले.  *२६ एप्रिल इ.स.१६८०* (वैशाख शुद्ध अष्टमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार सोमवार) संपूर्ण देश छत्रपती संभाजी महाराजांचा झाला.              छत्रपती संभाजी महाराजांनी संपूर्ण प्रदेशावर अंमल बसवून आपले सुभेदार रावजी पंडितांकरवी हुकूम जारी केला की, सर्वांनी किल्ले पन्हाळ्यास येऊनहिशेब द्यावेत. किल्ले रायगडावर जाण्याआधीचे राजकारण करण्यास व आपले बस्तान व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली. *२६ एप्रिल इ.स.१६८४* (वैशाख शुद्ध सप्तमी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार शनिवार) छत्रपती संभाजी महाराज बिरवाडीच्या किल्ल्यावर मुक्कामी. १६६१ मध्ये सिद्दीकडून दंडाराजापुरी जिंकल्यावर बिरवाडीचा किल्ला बांधला. छत्रपती संभाजीराजे व इंग्रज यांच्यातील तहाच्या अटी ;- केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला संभाजी महाराज

शिराळा किल्ला सांगली जिल्हा किल्ला ब्लॉग नंबर 8

शिराळा किल्ला शिराळा हे गाव सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. या गावास बत्तीस शिराळा किंवा ३२ शिराळा या नावांनीही ओळखले जाते. शिराळा तालुक्यात प्रमुख दोन किल्ले आहेत शिराळा आणि प्रचीतगड. आढळतो. इथे असणारे अंबामातेचे मंदिर, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुतीचे मंदिर, गोरक्षनाथानी इथे केलेले वास्तव्य, इथे असणारी पुरातन मंदिरे, या गावात महाराजांच्या काळात गोळा होत असलेल्या ३२ गावांच्या महसुलामुळे या गावाला पडलेले नाव म्हणजेच बत्तीस शिराळा. छत्रपती संभाजी महाराजांना गणोजी शिर्के आणि मुकर्रबखान यांनी पकडले तेव्हा शिराळ्यात त्यांचा एक मुक्काम पडला होता. तेव्हा शिराळा गावच्या इनामदार आणि किल्ल्याचे किल्लेदार तुलाजी देशमुख आणि गावाचे दीक्षित यांनी त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला होता; पण त्यात ते अयशस्वी झाले.

किल्ले बागणी सांगली किल्ले ब्लॉग नंबर 7

बागणी किल्ला वाळवा तालुक्यातील बागणी भुईकोट किल्ला उल्लेखनीय आहे, येथे पीरचा दर्गा असून मोठा उरूस भरतो. वारणाकाठचे बागणी हे तीनशे वर्षापूर्वीचे नावाजलेले आणि गजबजलेले गाव होते, त्यावेळची येथे एक मोठी बाजारपेठ होती. शिवाय या जागेला ऐतिहासिकदृष्ट्याही महत्व होते. तेथे संभाजी महाराजांच्या काळाआधीपासून एक भुईकोट किल्ला होता. तो किल्ला आजही गावातील एक प्रमुख स्थान म्हणून ओळखला जातो. आज किल्ल्याची तटबंदी आणि भग्न वास्तू शिवाय पाह्ण्यासारखे काही शिल्लक नाही.बागणी हे गाव अडकित्ते तयार करण्याच्या परंपरागत उद्योगासाठी प्रसिद्घ आहे. कवठेएकंद येथील श्री सिद्धराम मंदिर पाहण्यासारखे आहे. विजयादशमीच्या दिवशी येथे फार मोठ्या प्रमाणावर शोभेचे दारूकाम होते.