*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*
*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*
**********************************
*२६ एप्रिल इ.स.१६७५*
मराठा फौजेने कारवारवर हल्ला केला. फोंडा काबीज होताच महाराजांनी त्वरेने हालचाल करून कारवार प्रांत जिंकून घेतला. ३ हजार मराठी घोडदळ व काही पायदळ एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात शिवेश्वर किल्ल्याला वेढा घालून बसले.
*२६ एप्रिल इ.स.१६८०*
(वैशाख शुद्ध अष्टमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार सोमवार)
संपूर्ण देश छत्रपती संभाजी महाराजांचा झाला.
छत्रपती संभाजी महाराजांनी संपूर्ण प्रदेशावर अंमल बसवून आपले सुभेदार रावजी पंडितांकरवी हुकूम जारी केला की, सर्वांनी किल्ले पन्हाळ्यास येऊनहिशेब द्यावेत. किल्ले रायगडावर जाण्याआधीचे राजकारण करण्यास व आपले बस्तान व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली.
*२६ एप्रिल इ.स.१६८४*
(वैशाख शुद्ध सप्तमी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार शनिवार)
छत्रपती संभाजी महाराज बिरवाडीच्या किल्ल्यावर मुक्कामी.
१६६१ मध्ये सिद्दीकडून दंडाराजापुरी जिंकल्यावर बिरवाडीचा किल्ला बांधला.
छत्रपती संभाजीराजे व इंग्रज यांच्यातील तहाच्या अटी ;-
केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा.
त्याप्रमाणे २६ एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स, राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांकडे पाठवले.
"वकिलाने तुमचा मनोदय सांगितला त्याच्या बरोबर आम्ही आमची मान्यता पाठवली.
तुमचा मनोदय तुम्ही तपशीलवार लिहून पाठवला त्या तहाच्या अटींना आम्ही संमती पाठवली आहे ती मिळेलच, तरी तुम्ही या अटींचे परिपालन करावे.
आम्हीही त्या पाळू आमच्या वचनावर विश्वास ठेवून वागावे, दिवसेदिवस आमच्या मैत्रीचे संबंध दृढ होत जातील असे करावे.
कॅप्टन गॅरीने सिद्दीशी तुमचे वितुष्ट आले आहे असे आम्हांला सांगितले त्याला काढून लावण्यासाठी आम्ही सहाय्य करावे अशी तुमची अपेक्षा आहे तरी सिद्दी आमचा शत्रू आणि तुम्ही आमचे मित्र म्हणून सर्वतोपरी सहाय्य करणे आम्हास आवश्यक आहे.
तुमचा मित्र तो आमचा मित्र, तुमचा शत्रू तो आमचा शत्रू हे जाणून तुमच्यापरीने तुम्ही सिद्दीचा नाश करण्याचा प्रयत्न करावा आम्हीही तसेच करत आहोत.
तुमच्या शत्रूचा नाश करणे तुम्हाला सोपे जावे म्हणून आम्ही तुम्हास सर्वतोपरीने मदत करु, आपली मैत्री वृध्दिंगत होवो, अधिक काय लिहणे."
यावेळी इंग्रज व संभाजी महाराज यांच्यात जो तह झाला त्यापैकी आरमाराविषयक कलम असे होते.
वादळामुळे किंवा अन्य उत्पातामुळे जर एखादे जहाज गुराब, जहाज किंवा होडी माझ्या राज्यांतील बंदरात लागली तर ती जप्त करुन सरकार जमा होऊ नये हा रिवाज ख्रिश्चन लोकांच्या बाबतीत रुढ असेल तर ती सवलत इंग्रजांसही देण्यात येईल."
मराठ्यांच्या अधीपत्या खाली असलेल्या जिंजी आणि मद्रास या प्रदेशात वखार बांधण्याची परवानगी.
करार / तहातील प्रमुख अटी:
१) वखारीची उंची, लांबी आणि रुंदी हि नियोजित प्रमाणानुसारच असावी
२) गुलाम खरेदी आणि विक्री यावर बंदी.
३) बालकामगार
४) आयात व निर्यात यावर जकात.
५) धर्मांतर बंदी.
*२६ एप्रिल इ.स.१६८५*
अहमदनगरहून प्रयाण!
औरंगजेब बादशहाचे तंबू अहमदनगरहून हलविण्यात आले.
*२६ एप्रिल इ.स.१७४०*
२० एप्रिल रोजी श्रीमंत बाजीराव पेशव्यांची तब्येत अतिशय बिघडली. दि. २३ एप्रिलपासून रावेरखेडी व आसपास अनेक दाने व धर्मकृत्ये।करण्यास सुरुवात केली होती. दि. २६ एप्रिल रोजी काशिबाई (बाजीराव पेशव्यांच्या पत्नी) आपले पुत्र जनार्दन आणि महादजीपंत पुरंदांसोबत रावेरखेडीला पोहोचल्या. याच दिवशी पहाटे बाजीराव बेशुद्धावस्थेत गेले. काशिबाईंना तर आपल्या पराक्रमी पतीला असे अंथरूणावर पाहून बळच
गेल्यागत झाले. त्यांनी जवळच्याच रामेश्वराच्या मंदिरात ब्राह्मणांना मृत्युंजय जपासाठी बसायला सांगितले. अहोरात्र मृत्युंजयाचा घोष चालू होता. परंतु, त्याने बाजीरावांच्या प्रकृतीत काहीही फरक पडला नाही.
*२६ एप्रिल इ.स.१७५१*
छत्रपती राजाराम महाराजांच्या तृतीय पत्नी राजसबाइंचे निधन
राजाराम महाराजांना जानकीबाई,ताराबाई,राजसबाई व अहल्याबाई अशा चार भार्या होत्या.राजसबाई हि कागलकर घाटगे घराण्यातील असून छत्रपती संभाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर इ.स.१६८७ साली तिचा आपले धाकटे बंधू राजाराम यांजबरोबर विवाह लावून दिला.
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
Comments
Post a Comment