आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ एप्रिल १६४५*
हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला रायरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली.
सह्याद्रीतील प्राचीन रायरेश्वर मंदिराला शिवाजी छत्रपतींमुळे अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आपली स्वराज्याची संकल्पना त्याची दूरदृष्टी काही मोजक्या परंतु विश्वासू आणि जिवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते आणि सोनोपंत डबीर अशा बारा मावळातील सवंगडी यांच्या समोर मांडली. त्या दिवसापासून सुरुवात झाली इतिहासातील काही सोनोरी क्षणांना, पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात एकजूट होऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेला. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ एप्रिल १६८०*
राजापूरच्या इंग्रजांनी आपल्या आपल्या वरीष्ठास पत्रे लिहून कळवले कि, छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व राज्यसूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ठीकठिकाणच्या सुभेदारास व हवालदारास त्याने आपल्यापाशी बोलावले आहे. कित्येकास कैदखान्यात घालून कित्येकास बडतर्फ केले आहे. महाराजांच्या मृत्युनंतर २४ दिवसातला हा प्रकार आहे. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ एप्रिल १६८०*
संभाजीराजेंनी पन्हाळा किल्ल्यावरून राजकारभारास सुरूवात केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ एप्रिल १६९७*
राजाराम महाराज यांच्या संदर्भातील फ्रेंच वृत्तपत्रातील बातमी -
"राम राजा (छत्रपती राजाराम महाराज ) विरुद्धचा वेढा अजूनही चालू आहे परंतु मुघल सैनिकांमध्ये वेढ्याबाबत कोणतीही उत्सुकता नाही आणि मुघल  सेनापती वेढ्याचे काम मुदामच नीट करत नाहीयेत असे वाटते  आहे."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ एप्रिल १८५८*
वीर बाबुराव सेडमाके - १८५७ च्या उठावातील गोंडवनाचा तेज:पुंज क्रांतीसूर्य  
क्रिश्टनने नागपूरहून लेफ्टनंट जॉन नटल यांच्या नेतृत्वाखाली पायदळाची अजून एक तुकडी मागवून घेतली. नव्याने प्राप्त झालेली ही कुमक सोबतीला घेऊन ब्रिटिश फौज २७ एप्रिल १८५८ रोजी बामनपेट येथे बाबुराव सेडमाकेच्या सैन्याशी भिडली. दोघा सैन्यात पुन्हा एकदा जोरदार झुंज झाली. परंतु ह्या खेपेससुद्धा बाबुरावच्या सैन्याने कुरघोडी करीत ब्रिटिश सैन्यास पराभूत केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७  एप्रिल १९०९*
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांची जयंती
अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यांसाठी श्री. तुकडोजी महाराजांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४