आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२८ एप्रिल १६६१*
छत्रपती शिवरायांनी कोकणातील आताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील “प्रचीतगड उर्फ उचीतगड” जिंकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२८ एप्रिल १६७९*
छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदृष्टीचे धोरण व त्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी
आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज माहीत आहेत ते गड, कोट बांधणारे म्हणून.. पण स्वराज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी देसाई, देशमुख यांना तटबंदी असलेले वाडे बांधून द्यायचे नाहीत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण होते. या धोरणाची स्वराज्यात किती काटेकोर अंमलबजावणी केली जात होती त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बंकापूरचा देशाधिकारी बाबाजी शिवदेव याला धाडलेले खालील आज्ञापत्र. या आज्ञापत्रात "सांउसीचा कोट देखील पाया पाडून टाकणे" असे फर्माविले आहे. कर्नाटकातील तत्कालीन कुंदगोळ परगण्यात मौजे सांउशी हा गाव येत होता. हा गाव केंचणगौडा देसाई यास इनाम होता. महाराजांनी त्याचे इनाम चालू ठेवले मात्र गाव त्याच्या ताब्यात देण्याअगोदर सांउसी गावची तटबंदी पायासकट पाडावी अशी आज्ञा केली. सदर पत्राची आताच्या कालगणनेप्रमाणे तारीख २८ एप्रिल सन १६७९ येते. पत्रावर राज्याभिषेक शक ५, सिध्दार्थी नाम संवत्सर, वैशाख बहुल त्रयोदशी, सोमवार अशा तारखेची नोंद करण्यात आली आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२८ एप्रिल १६८०*
मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल पाठवलेले पत्र.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बाहेर पडलेली अर्थातच फुटलेली ही पहिली बातमी आहे.
'We have certaine news that Savajee Rajah is dead. It is now 23 days since he deceased. It's said of bloody flux being sick 12 days.'
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२८ एप्रिल १७३१*
बेलापूरची लढाई
मराठ्यांनी नारायण जोशी या पेशव्यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर किल्ल्यावर साहसी चढाई केली तेव्हा घनघोर लढाई झाली. ३१ मार्च १७३१ रोजी झालेल्या या लढाईत मराठ्यांनी चिवट पोर्तुगीजांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा बंद केल्यामुळे मराठ्यांपुढे हतबल झालेला पोर्तुगीज किल्लेदार २८ एप्रिल रोजी कुटुंबासह गलबतात बसून निघून गेला आणि मराठ्यांनी या किल्ल्यावर जरीपटक्याचे निशाण फडकवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२८ एप्रिल १७४०*
थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी या ठिकाणी निधन झाले. (जन्म: १८ ऑगस्ट १७००)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment