आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१४ जुलै १६५९
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ जुलै १६५९* सोनोपंत डबीर दिल्लीहुन स्वराज्यात परत त्यासुमारास स्वराज्यावर अफजलखानाचे संकट घोंघावत होते. महाराज नुकतेच जावळीला आले होते. इस १६५७ मधे शिवाजीराजांनी मुघलांच्या ताब्यातील जुन्नरवर अचानक हल्ला करून औरंगजेबाला धक्का दिला होता खरा मात्र, त्याविरुद्ध काही तोडगा काढण्याआधीच औरंगजेबाला सत्तासंघर्षासाठी दिल्लीच्या दिशेने जावे लागले. भाऊ आणि इतर प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढुन व बाप शहाजहानला कैदेत टाकुन निश्चिंत होऊन औरंगजेब ५ जून १६५९ रोजी थाटामाटात दिल्लीच्या गादीवर बसला. त्याप्रसंगी राजकारणाचा भाग म्हणून महाराजांतर्फे नजराणा घेऊन सोनोपंत दिल्ली दरबारात उपस्थित होते. त्यांनी तो औरंगजेबाला पेश केला त्याबदल्यात औरंगजेबानेही महाराजांना देण्यासाठी पोशाख व फर्मान सोनोपंतांना दिले. फर्मानात 'इकडील लोभ आपणावर पूर्ण आहे असे जाणून असावे' असे नमूद होते. अफजलखानाचे प्रचंड संकट आले असताना किमान मुघलांच्या आघाडीवर शांतता होती हे तस बरच झाल मात्र, ही केवळ तात्पुरती व वरवरची गोडीगुलाबी होती हे पुढच्या काही महिन्यांतच सिद्ध