आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१४ जुलै १६५९
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ जुलै १६५९*
सोनोपंत डबीर दिल्लीहुन स्वराज्यात परत
त्यासुमारास स्वराज्यावर अफजलखानाचे संकट घोंघावत होते. महाराज नुकतेच जावळीला आले होते. इस १६५७ मधे शिवाजीराजांनी मुघलांच्या ताब्यातील जुन्नरवर अचानक हल्ला करून औरंगजेबाला धक्का दिला होता खरा मात्र, त्याविरुद्ध काही तोडगा काढण्याआधीच औरंगजेबाला सत्तासंघर्षासाठी दिल्लीच्या दिशेने जावे लागले.
भाऊ आणि इतर प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढुन व बाप शहाजहानला कैदेत टाकुन निश्चिंत होऊन औरंगजेब ५ जून १६५९ रोजी थाटामाटात दिल्लीच्या गादीवर बसला. त्याप्रसंगी राजकारणाचा भाग म्हणून महाराजांतर्फे नजराणा घेऊन सोनोपंत दिल्ली दरबारात उपस्थित होते. त्यांनी तो औरंगजेबाला पेश केला त्याबदल्यात औरंगजेबानेही महाराजांना देण्यासाठी पोशाख व फर्मान सोनोपंतांना दिले. फर्मानात 'इकडील लोभ आपणावर पूर्ण आहे असे जाणून असावे' असे नमूद होते.
अफजलखानाचे प्रचंड संकट आले असताना किमान मुघलांच्या आघाडीवर शांतता होती हे तस बरच झाल मात्र, ही केवळ तात्पुरती व वरवरची गोडीगुलाबी होती हे पुढच्या काही महिन्यांतच सिद्ध झाल जेव्हा औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखानाला ७७००० फौज सोबत देऊन स्वराज्यावर जय मिळवण्यासाठी धाडले!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ जुलै १६६०*
बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू यांचे विशाळगडावर अंत्यसंस्कार!
बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, नरवीर शिवा काशीद यांच्या बलिदानामुळे राजे विशाळगडावर सुखरूप पोहोचले यात काही शंकाच नाही. अखेर आज शिवरायांच्या उपस्थितीत बाजी व फुलाजी प्रभू यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ जुलै १६७४*
"बहादूरखान कोकलताश" याच्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. राजाभिषेकानंतर प्रथमच १ कोटींची एवढी प्रचंड लूट मराठ्यांनी रायगडावर जमा केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment