मच्छिंद्रगड
मच्छिंद्रगड सांगली वरून पलूस कुंडल मार्गे कराडला जाताना वाळवा कराड तालुक्याच्या शिवेवर किल्ले मच्छिंद्र हे ऐतिहासीक वारसा लाभलेलं गांव आहे . क्रांतिसिंह नाना साहेब पाटील यांच हे गाव . काही दिवसांपूर्वी येथील गडाला भेट देण्याचा योग आला . ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा त्यांचा विचार होता. “आपुला आपण करू कारभार “हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी १९४२ साली अंमलात आणली . प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात.क्रांतीविरांनी ईग्रजाना जेरीस आणले होते . या गावीच मच्छिंद्रगड आहे .गडावर काही शिवकालीन स्मृती आहेत व हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला आहे. इ.स. १६७६ च्या सुमारास स्वराज्यास बळ्कटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवरायानी जी दुर्गशृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होता. हा किल्ला कमळभैरवाच्या डोंगराशेजारील एका