आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१८ नोव्हेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ नोव्हेंबर १६६७*
पोर्तुगीज स्वराज्याच्या समुद्र किनाऱ्यावर येऊन त्यांचे आरमार उभे करत होते. तसे झाले तर तो स्वराज्यासाठी एक धोका होता. त्यांना शह देण्यासाठी छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीज व्हाॅइसराॅयला वकीलामार्फत पत्र पाठविले व तसे न करण्याचा इशारा दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ नोव्हेंबर १६७५*
नाईक निंबाळकरांचे पत्र
धनकोनाम जयचंदीभाई व जमा माव बाबानभाई मुकाम मलवडी यांस रिणको नाम बजाजी नाईक निंबाळकर व सावित्रीबाई महादजी नाईक निंबाळकर देसमुख प्रो। फलटण सु॥..कारणे लिहून दिला कर्जकतबा ऐसे जे,बदल खान अजम आबदलाखान(अफजलखान) यांसी पातशाहांनी साहेबी सिवाजी राजेवरी मसलत केली. ते वख्ती आबदलाखान कुचावर कुच करुन मलवडीस उतरले ते वख्ती आम्हाबदल सिवाजी राजे यांनी नाईकजी राजेस बहुत प्रकारे कागद लिहिला होता. तो आम्हास दस्त करून गल्यांत तोफ घालून सुनता करून हातीच्या पायाखाले घालून मारावे तो नाईकजीराजे यांनी बहुत काही आडमूड होऊन आबदलाखानास अर्ज केल्यावरी साठी हजारावरी करार करून होन ६०००० साठी हजारावर, दरम्यान नाईकजीराजे पांढरे जमान होऊन सोडविले. त्यास पंचोञा प्रमाणे व्याज करून मुदत दोन वर्षात तुमचे व्याज मुदल देऊ जर न देऊ तर आपले फलटणची देसमुखी तुमची असे काहीएक हरकत करू तरी श्री माहादेवाची व श्री विठोबाची आण असे. हा कतबा सही...
गोही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ नोव्हेंबर १६८१*
संगमनेरचा ठाणेदार "नारोजी" याने मराठ्यांना अडविण्यासाठी "औंढा" पट्ट्यात वाटा रोखून धरल्या.
पण मराठे हुशारीने तिकडे फिरकलेच नाहीत. उलटच्या दिशेने संगमनेरपासून २० कोसावर पुणे जिल्ह्याच्या सीमेलगत भोजपुऱ्यात चौथरा वसूल करत निघून गेले.
तिथे चकमकही झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ नोव्हेंबर १७७२*
श्रीमंत थोरले माधवराव यांचे निधन.
वयाच्या २७ व्या वर्षीच त्यांनि इहलोकची यात्रा संपली . तसेच रमाबाई पण त्यांचे बरोबर सती गेल्या.
श्रीमंत माधवराव पेशवे यांचा १८ नोव्हेंबर १७७२ मध्ये क्षयरोगाने अकाली मृत्यू झाल्याने त्यांचे धाकटे बंधू नारायणराव पेशवे यांना पेशवेपदाची वस्त्रे मिळाली. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ नोव्हेंबर १७७२*
पेशवे पद मिळविण्यासाठी रघुनाथरावांनी सैन्य उभारून आपल्यापरी कसे प्रयत्न चालविले, ते सर्व प्रयत्न उघडकीस येऊन शेवटी दादांस पेशव्यांनी कसे कैदेत ठेविले ह्या हकीगती मॉस्टीन मुंबई गव्हर्नरास कळवित होता. एवंच माधवराव पेशव्यांच्या आजारामुळे आणि दादासाहेबांच्या घरभेदेपणामुळे पुणे दरबारी सर्व मुत्सद्दी अडकून आहेत असे पाहून इंग्रजांनी भडोचवर आपले सैन्य व तोफखाना रवाना केला आणि भडोचचा ताबा इंग्रजांनी १८ नोव्हेंबर १७७२ त घेतला. भडोच इंग्रजांनी बळकाविल्याबरोबर पेशवे दरबारात रागाची लाट उसळली. फत्तेसिंग गायकवाडांनी आपल्या भडोच येथील हक्कासंबंधी सुरतेच्या इंग्रजांशी बोलणी सुरू केली. त्यास पुणे दरबारने पुष्टी दिली. स्वारीचे अरिष्ट नको असा पोक्त विचार करून इंग्रजांनी १७७३ च्या जानेवारीत भडोच शहरावरील गायकवाडांचा वसुलाचा हिस्सा पूर्वीप्रमाणे दिला जाईल असे कबूल केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ नोव्हेंबर १७७३*
मुधोजी भोसले आपल्या सैन्यासह दादास आळेगांवी येऊन मिळाले. तिथून दोघेही नळदुर्गास आले. नळदुर्गास पाच नोव्हेंबर रोजी निजामअल्लीचा वकील दादास भेटला. त्याच्या मार्फत निजामअल्लीची फौज जी साबाजी भोसलेस साथ देत होती आणि जिच्या सहाय्याने साबाजी भोसले पुण्यावर चाल करून येत होते त्या फौजेस परत बोलवा असे बोलणे दादांनी निजामअल्लीकडे लाविले. निजामअल्लीने ही गोष्ट मानली नाही. त्रिंबकराव पेठे ह्यावेळी फौजेचे मुख्य होते. दादांनी त्रिंबकरावास दहा हजार सैन्य देऊन पुण्यावर घाला घालण्याच्या बेतात असलेल्या साबाजी भोसल्यावर रवाना केले. आणि स्वतः निजामअल्लीस भेटण्यास बिदरकडे कूच केले. दादा निजामअल्ली यांच्या भेटी १८ नोव्हेंबर १७७३ रोजी होऊन तहाची बोलणी झाली आणि मित्रत्वाचा तह केला दादांनी आपला एक महिना फुकट घालविला. २३ डिसेंबरला दादांनी बिदर सोडले आणि अर्काटच्या दिशेने कूच केले. हेतू हा की, तंजावर राजाचे तंजावर स्थळ जे नबाब
महंमदअल्लीने इंग्रजांच्या सहाय्याने बळकाविले होते ते त्याजकडून जिंकून घेऊन तंजोर राजास परत करणे. पण इथून पुढे जाणार तोच आपल्या विरुद्ध बारभाईची कारस्थाने सुरू झाली ही बातमी त्यास कळली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ नोव्हेंबर १९१०*
बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९१०
क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त ह्यांचा आज स्मृतिदिन ! (२० जुलै १९६५)

बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९१० मध्ये बंगाल मधील ओरी गावात झाला होता. कानपूरच्या पी.पी.एन. महाविद्यालयात शिकत असताना त्यांची ओळख भगतसिंहांशी झाली व त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन‘ या क्रांतिकारी संघटनेत कार्य करू लागले.याच दरम्यान त्यांनी बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक गुप्त बॉम्ब बनवण्याचा कारखाना चालू केला होता.
बटुकेश्वर दत्त यांना मुख्यत्वे ओळखलं जातं ते म्हणजे ब्रिटीशांच्या केंद्रीय विधानसभेत (आजच्या संसदेत) त्यांनी भगतसिंहांना सोबत करत केलेल्या बॉम्बस्फोटामुळे. तत्कालीन ब्रिटीश सरकारने ‘पब्लिक सेफ्टी बिल और ट्रेड डिस्प्यूट बिल‘ नावाने दोन बिलं संसदेत मंडळी होती ज्यामुळे मजुरांच्या उपोषण करण्यावर सरकार निर्बंध घालून आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध पोलिसांना अनावश्यक अधिकार मिळवून द्यायचा प्रयत्न सरकार करत होतं. याचा निषेध म्हणून भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल १९२९ रोजी कुणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या प्रेक्षक दिर्घेतून बॉम्ब फेकून गोंधळ उडवला.या गोंधळात आपल्या विचारांची पत्रके उधळून त्यांनी बॉम्बस्फोटाचा उद्देश सर्वाना कळवण्याचा प्रयत्न केला.अन तिथून पळून न जाता स्वतःला अटक करून घेतली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४