*१० जून १६७६*छत्रपती शिवरायांच्या 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेस सुरुवात. राजाभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमेमागचे सूत्र होते.
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१० जून १२४६* अल्लाउद्दीन मसुद्शाहचा खून. नसीरुद्दीन महम्मद शाह दिल्लीचा सुलतान झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१० जून १६४०* सरनौबत नरवीर पिलाजी गोळे जयंती हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांच्या ३८१ व्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचा जन्म जावळीच्या खोऱ्यातील गणी गावात झाला. चार छत्रपतींच्या सोबत इमानाने राहिलेलं मोजक्या घराण्यातील एक गोळे घराणे, ह्याच गोळे घराण्यातील इतिहासात एकनिष्ठ म्हणून उल्लेख आढळतो. पिरंगुट या गावी त्यांची पवित्र समाधी आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१० जून १६६१* छत्रपती शिवरायांची 'कल्याण-भिवंडी'कडे मोहिम. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१० जून १६६४* विजापूर बादशाहाने सिद्दी अझीजखान यास छत्रपती शिवाजी महाराजांविरूद्ध तळकोकणावर रवाना केले. अजीजखान आल्याचे कळताच वाडीकर लखम सावंत त्यांच्या भेटीस गेला. भेटीत ठरल्याप्रमाणे सावंत कुडाळकर चाल करून गेला. शर्थीची झुंज मांडून त्याने मराठ्यांना पराभूत केले. कुडाळ सावंतांच्या ताब्यात गेले. अजीजखान वेंगुर्ला येथे गेला होता. य