*१० जून १६७६*छत्रपती शिवरायांच्या 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेस सुरुवात. राजाभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमेमागचे सूत्र होते.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० जून १२४६*
अल्लाउद्दीन मसुद्शाहचा खून. नसीरुद्दीन महम्मद शाह दिल्लीचा सुलतान झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० जून १६४०*
सरनौबत नरवीर पिलाजी गोळे जयंती
हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांच्या ३८१ व्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचा जन्म जावळीच्या खोऱ्यातील गणी गावात झाला. चार छत्रपतींच्या सोबत इमानाने राहिलेलं मोजक्या घराण्यातील एक गोळे घराणे, ह्याच गोळे घराण्यातील इतिहासात एकनिष्ठ म्हणून उल्लेख आढळतो. पिरंगुट या गावी त्यांची पवित्र समाधी आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० जून १६६१*
छत्रपती शिवरायांची 'कल्याण-भिवंडी'कडे मोहिम.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० जून १६६४*
विजापूर बादशाहाने सिद्दी अझीजखान यास छत्रपती शिवाजी महाराजांविरूद्ध तळकोकणावर रवाना केले. 
अजीजखान आल्याचे कळताच वाडीकर लखम सावंत त्यांच्या भेटीस गेला. भेटीत ठरल्याप्रमाणे सावंत कुडाळकर चाल करून गेला. शर्थीची झुंज मांडून त्याने मराठ्यांना पराभूत केले. कुडाळ सावंतांच्या ताब्यात गेले. अजीजखान वेंगुर्ला येथे गेला होता. या मुक्कामातच तो एकाएकी मरण पावला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० जून १६७६*
छत्रपती शिवरायांच्या 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेस सुरुवात. राजाभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमेमागचे सूत्र होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० जून १६८०*
राजापूरचे सुरतेला पत्र
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इंग्रजांच्या इस्ट इंडिया कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांकडे बक्षिस चालू ठेवण्यासाठी विनंती केली होती. ह्या गोष्टीचा पाठपुरावाही ते अगदी न चुकता करताना दिसतात. ह्या बाबतीतला पहिला संदर्भ जून १६८० मध्ये, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी पाहायला मिळतो.
आमच्या आधीच्या पत्रातून आम्ही आपल्याला कळवले होते की अचऱ्याहून आम्हाला नारळाची मागणी आली होती पण राज्यातील अकस्मिक घडामोडींमुळे सगळी गडबड झाली आहे. नुकताच संभाजी राजांचा सुभेदार इथे आला होता व त्याने सांगितले की राजांकडून बक्षिसाचे आदेश असल्या शिवाय आम्हाला अपेक्षित सवलत देता येणार नाही. त्यावर आम्ही राजाला कळवले की आम्हाला शिवाजीकडून मिळालेल्या बक्षिसासाठी सुभेदाराकडून अनेकदा अडचण निर्माण केली जाते. आम्ही राजाला विनंती केली की सुभेदाराला आवश्यक आदेश देऊन ह्या अडचणीतून आम्हाला मुक्त करावे. पण राजाने आम्हाला कळवले की सध्या तो इतर बाबींमुळे व्यस्त आहे तरी त्याला थोडी उसंत मिळताच तो ह्यात लक्ष घालेल. आमच्यासाठी हे त्याच्या नकारासमानच आहे.
राजापूरचे सुरतेला पत्र, १० जून १६८०, १० जून १६८०
English Records on Shivaji, पृष्ट ३१३

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० जून १६८०*
छत्रपती संभाजी महाराज रायगडावर
मोरोपंत व अण्णाजी आपल्या लोकांनिशी रायगडाहून पन्हाळ्याकडे निघाल्यानंतर लवकरच रायगडावर सरनौबत व नायकवाडी यांनी १६ मे रोजी किल्ला ताब्यात घेऊन फितुरीतील लोकांना कैद केले व आपले चौकी पहारे बसविले. त्यानंतर छत्रपती संभाजीराजांचे सासरे पिलाजीराव शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांची अनुज्ञा मिळवून १५,००० स्वारांसह येऊन रायगडचा बंदोबस्त केला. पन्हाळगडावरून निघून छत्रपती संभाजी महाराज दिनांक १० जूनला रायगडला पोचले. त्याच दिवशी दरबार भरवून राज्यकारभारास प्रत्यक्ष प्रारंभ केला. परत आल्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी सोयराबाई व दुसऱ्या तीन मातांचे सांत्वन केले असे परमानंद स्पष्ट लिहितात. छत्रपती संभाजी महाराज रायगडी आल्यानंतर परत क्रियाकर्म केले व दानही दिले. त्यानंतर २७ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी पुतळाबाई राणीसाहेबांनी अग्निप्रवेश केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० जून १६८१*
औरंगजेबचा मुलगा पाछ्चा उर्फ़ अकबर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरणार्थी आला. त्यास संभाजी राजांनी नेतोजी पालकर आणि हीरोजी फर्जद यांसमवेत पाली येथील सुधागड जवळ ठेवीले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० जून १६८३*
फिरंग्यांनी बिघाड केला व रेवदांडास वेढा घातला म्हणून छत्रपती संभाजीराजे स्वार होऊन राजापुरास गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० जून १६८९*
छत्रपती राजाराम महाराजांची पहिली लढाई
११ मार्च १६८९ क्रूरकर्मा औरंगजेबाने छत्रपती शंभुराजांची हत्या केली आणि मराठ्यांचे स्वराज्य ढवळून निघाले. शिवप्रभूंच्या हस्ते स्थापन झालेली हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगडाला इतिकादखानाचा वेढा पडायला सुरुवात झाली होती. गडावर राजमंडळी होती. येसूबाई, त्यांचा पुत्र शाहू आणि त्यांचा दीर म्हणजे शिवपुत्र राजाराम महाराज अशा खास मंडळींचे वास्तव्य होते त्यावेळी राजाराम महाराज अवघे १९ वर्षांचे होते. प्राप्त परिस्थितीत बेलाग रायगड सोडून राजधानीबाहेर पडून मुघलांशी संघर्ष चालू ठेवण्याचा सल्ला येसूबाईंनी दिला जो योग्य होता, सूत्र त्याप्रमाणे फिरली. राजाराम महाराज व त्यांच्या दोन राण्या ताराबाई व राजसबाई यांच्यासह गुप्तपणे रायगड त्यांनी सोडला.
शत्रूस हुलकावणी देऊन जावळीच्या खोऱ्यातून प्रतापगड गाठला परंतु ही चाल लवकरच झुल्फिकारखानाच्या (इतिकादखान) लक्षात आली आणि त्याने लागलीच पाठलागासाठी फतेहजंगखानास पाठवले. तो पोहचेपर्यंत महाराजांनी लढाईची तयारी केली आणि इतिहासाला अपरिचित अशी मुघल व राजाराम महाराजांची पहिली लढाई दिनांक १० जून १६८९ ला प्रतापगडाच्या पायथ्याला पार ह्या गावी झाली. १९ व्या वर्षी केलेली लढाई महाराजांच्या स्वभावातील धाडस दाखवते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० जून १६९६*
इंग्रजांच्या पत्रातील एक नोंद... 
"मराठ्यांचा एकूण कालखंड १५० वर्षे साधारण, या कालखंडात एकाही राजाचा खून किंवा राजाला कैद करून स्वघोषित राजा झालेल्याचे उदाहरण जवळपास नाही " .. एक वेगळीच घटना हे दर्शवते .. अशी संधी त्या नामांकित सेनापतीस चालून आलेली असून सुद्धा असे घडलेले नाही जे मुघलकाळात सय्यदबंधूंनी केले. सेनापती संताजी घोरपड्यांना ही संधी होती. १६९६ मेअखेर - जूनप्रारंभी जिंजी दरबारात सेनापती व छत्रपती मध्ये वितुष्ट आले, बिघाड झाला. इतका की इंग्रजांच्या १० जून १६९६ च्या पत्रातील एक वाक्य असे "मराठा सरदार संताजी व बहिर्जी घोरपड्यांच्या मागून न जाता राजाराम महाराजांशी एकनिष्ठ राहतील"
संताजी जिंजीबाहेर पडले आणि त्यांच्यावर स्वतः राजाराम महाराज धनाजी, अमृतराव, हणमंतराव या मराठा सरदारांसह चालून गेले. आयेवारकुटी येथे लढाई होऊन संताजी विजयी झाले आणि छत्रपती त्यांच्या कैदेत पडले !! वास्तविक संताजींकडे २० हजाराच्यावर फौज होती. महाराष्ट्र-कर्नाटक प्रांतात त्यांचा चांगलाच दरारा होता. प्रत्यक्ष छत्रपती कैदेत सापडला होता. स्वघोषित राजा व्हायची अथवा आपल्या नियंत्रणाखाली कोणाला तरी करायची आयती संधी होती. पण या धामधुमीच्या काळात जिथे काही मराठ्यांकडून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी फितुरीसह कोणतेही पाऊल उचलले जात होते तिथे संताजी सारखा बलाढ्य सेनापती लढाईनंतर अटकेत असलेल्या छत्रपतींची हात बांधून क्षमा मागतो आणि त्यांना मुक्त करून जिंजीत व्यवस्थित पोहोचवण्याची व्यवस्था करतो. याचवेळी सुरतकर इंग्रज लढाईसंदर्भात लिहितायत (१८ जुलै १६९६ - ज्युलिअन दि) " Zulphikar offered him (संताजी घोरपडे) a vast reward in the King's (औरंगजेब) name to surrender him (राजाराम महाराज) up; and the King himself promised to make him (संताजी घोरपडे) a Barra Hazari Umrao". झुल्फिकार खानाने बादशहाच्या वतीने राजाराम महाराज यांच्या बदल्यात इनाम देऊ केले तसेच बादशहाने बारा हजारी उमराव करतो असे आश्वासन दिले असा याचा अर्थ निघतो. तत्कालिन परिस्थिती मध्ये अनुकलता असूनही असे काहीही घडले नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० जून १७६८*
पेशवे माधवराव आणि राघोबादादा यांमध्ये धोडोपची लढाई. माधवरावने लढाई जिंकून राघोबास पराभूत केले.
कर्नाटकांतील पहिलें युद्ध संपवून परत येतांच राघोबादादांनी 'निम्में राज्य वाटून द्यावें !' अशी मागणी माधवरावांकडे केली, पण ती मोडून काढून माधवरावांनी त्यांना उत्तरेकडे मोहिमेवर पाठविलें. तिकडे राघोबादादांनी अपयश घेऊन परत येऊन पुन्हां माधवरावांशी युद्धाची तयारी केली, पण पेशव्यांची फौज भारी हें पाहून आनंदवल्‍लांस पेशव्यांच्या अटी कबूल करून राघोबा राहिले. तेथून भोंसले, इंग्रज, गायकवाड, निजाम यांच्याशीं कारस्थान करून त्यांनी युद्धाची तयारी पुन्हां चालविली. अखेर घोडप येथें माधवराव पेशव्यांनीं राघोबांचा पराजय करून त्यांना शनिवारवाड्यात कैदेंत ठेविलें (१० जून १७६८); त्यानंतर अखेरपर्यंत माधवरावांना राघोबांचा फारसा त्रास झाला नाहीं.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० जून १९४८*
जव्हार संस्थान (रामनगर)
जव्हार संस्थान इसवी सन १३१६ पासून १० जून १९४८ पर्यंत अस्तित्वात होते...
मुकणे गावातील जयबारा हे कोळी समाजाचे राजे होते.. जयबा जमीनदार होते त्यांचे उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे, बुद्धिचातुर्याने आणि पराक्रमामुळे त्यांनी २१ लहान किल्ले जिंकले वर भूपतग हा मोठा किल्लाही जिंकला...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*

*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...