६ जून १६७४*शिवराज्याभिषेक दिन...६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले. तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून 'करणकौस्तुभ' नामक ग्रंथही लिहवून घेतला.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*६ जून १६६०*
व्याघ्रगड उर्फ वासोटा मराठ्यांनी जिंकला
शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून १६६० रोजी घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*६ जून १६७४*
शिवराज्याभिषेक दिन...

६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले. तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून 'करणकौस्तुभ' नामक ग्रंथही लिहवून घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*६ जून १६९६*
कासिमखानाच्या जागी बादशाहने पुढे झुल्फिकारखानाची निवड कर्नाटकच्या सुभेदारीवर केली. चित्रदुर्गाच्या ब्रम्हप्पा नायकाने संताजी घोरपडेची मदत केल्याबद्दल बादशहाने त्याची जहागिरी खालसा करून नायकाची खोड मोडली. नायकाने अपराधाची क्षमा मागून मोठा दंड भरून आपला जीव मात्र वाचवला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*६ जून १७००*
२१ एप्रिल १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून १७०० ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे ‘नौरससातारा’ म्हणून नामकरण झाले. इ.स. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. इ.स. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*

*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...