आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ ऑक्टोबर १६५७* छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांसह कल्याणकडे रवाना... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ ऑक्टोंबर १७००* महापूरात औरंगजेबाला अपंगत्त्व त्यावेळी १ ऑक्टोंबर १७०० रोजी माण नदीला अचानक पूर येऊन औरंगजेबाच्या छावण्या वाहून गेल्या. यामध्ये शेकडो सैनिक, उंट, हत्ती वाहून गेले. मुघल लष्कराची मोठी हानी या पूरात झाली. यावेळी छावणीत हजर असलेल्या साकी मुस्तैदखान याने माण नदीला आलेल्या या भयंकर पूराचे वर्णन करुन ठेवले आहे. या पूरात पाण्यात बुडण्यापासून जीव वाचवताना औरंगजेबाचा पाय मोडला. त्याला कायमचे अपंगत्त्व आले. माण नदीच्या महापूराने औरंगजेबाला चांगलीच अद्दल घडविली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ ऑक्टोबर १७२४* साखरखेर्डा लढाई - निझामाने मोगलांचा पराभव केला दख्खनमधील आपल्या भावी आव्हानाची पुरेपूर कल्पना निजामाला येऊन चुकली. बादशहाने निजामाचा नि:पात करण्यास धाडलेल्या मुबारिजखानाला सामोरे जाण्यासाठी निजामाने बाजीरावांच्या साह्याची याचना केली आणि ते तातडीने त्याच्या मदतीला धावून गेले. १ ऑक्टोबर १७२४ला साखरखेर्डा लढाईत मुबारिजखानाचा पराभव झाला. नि