*३० सप्टेंबर १६६५*औरंगजेबने पाठवलेले आग्रा भेटीचे फर्मान छत्रपती शिवरायांनी स्विकारले.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० सप्टेंबर १६५९*
स्वराज्यावर चालून आलेला आदीलशाही सरदार "अफझलखान" याने १२ मावळ मधील रोहीड खोरेचे वतनदार आणि स्वराज्याशी कायम एकनिष्ठ असणारे "कान्होजी जेधे" त्यांचे सुपुत्र व छत्रपती शिवरायांचे बालमित्र "बाजी जेधे" यांना स्वराज्यविरोधी जाण्यासाठी पत्र पाठविले. पण "बाजी जेधे" यांनी ते धुडकावून लावले आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मुजरा करावयास हजर झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० सप्टेंबर १६६४*
१६६४-६५ वर्षाच्या मध्यान्हात औरंगजेबाचा अनेक वर्षाचा स्वराज्यावरील क्रोध चालून आला. हा क्रोध, कधीकाळचे जयपुरचे राजे मिर्झाराजे जयसिंग ह्या सरदाराच्या रूपाने चालून आला.
धूर्त राजकारणी, चाणाक्ष मुत्सद्दी, महापराक्रमी आणि बुद्धिने तल्लख असलेल्या मिर्झाराजांचे हे गुणविशेष मात्र परकियांच्या पुढे झुकत होते, आणि हेच शल्य इतिहासात त्यांच्यावर दिसते. अर्थात त्यांना यात कसलाही कमीपणा वाटत नसे.
तर असे हे मिर्झाराजे दख्खन मोहिमेकरीता ३० सप्टेंबर १६६४ रोजी मुक्रर झाले.

दिल्ली दरबारातील मोठ्या-मोठ्या सरदारांसह दिलेरखान याच्या उपसेनापतीत्वात सेनापती  मिर्झाराजांची विशाल फौज निघाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० सप्टेंबर १६६५*
औरंगजेबने पाठवलेले आग्रा भेटीचे फर्मान छत्रपती शिवरायांनी स्विकारले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० सप्टेंबर १६७७*
छत्रपती शिवरायांनी  मद्रास इंग्रज गव्हर्नरकडे तोफा व इंजिनिअर्सची मागणी केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० सप्टेंबर १६८८*
हरजीराजे व इतर सर्व मराठ्यांनी मुघलांचा प्रतिकार चालूच ठेवला. पूर्वीच्या गोवळकोंडा राज्यांतील अनेक शहरे मराठ्यांनी घेतली.  हरजीराजेंनी,विठ्ठल पिलाजी, नेमाजी गायकवाड, गोपाळ दादाजी यांच्याबरोबर अर्काटला वेढा देण्यासाठी सैन्य रवाना केले. त्यांनी मुघलांकडून अर्काट जिंकून घेतले. ३० सप्टेंबर १६८८ च्या लंडनला लिहिलेल्या कर्नाटकातील मद्रासकर इंग्रज मुगली परिस्थितीचे वर्णन करतात ते असे, “कुत्बशाहीच्या मुलूखात सर्वत्र जुलूम जबरदस्ती व अस्थिरता चालू आहे. संभाजी राजांच्या सैन्याकडे जंजिऱ्यापासून पोर्टोनोव्होपर्यंत प्रदेश ताब्यात आहे. त्यांनी सेंट थॉमसचा मुलूख लुटून फस्त केला आहे.” इंग्रज वखारवाले आपल्या इंग्लंडमधील अधिकाऱ्यास कर्नाटकातील परिस्थितीची वारंवार बातमीपत्रे पाठवीत असत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० सप्टेंबर १७४२*
जून १७४२ रोजी पेशव्यांनी ओकुँवर छावणी केली. जुलैमध्ये यशवंतराव पवार यांची धार येथे स्थापना केली.
ह्याच वेळी पेशव्यांस आपल्या वकिलाकडून बादशहाचा अलीवर्दीखानास मदत करण्याचा निरोप कळून आला. पेशव्यांनी बादशहास उलट निरोप पाठविला की, बादशहा जर आपणास
माळवा. बुंदेलखंड व अलाहाबादचे चौथाई वसुलाचे हक्क देत असेल तर आपण अलीवर्दीखानास मदत करण्यास तयार आहोत. ह्या पत्रव्यवहाराची चाहूल रघूजी भोसले यास लागताच त्यांनी तारीख ३० सप्टेंबर १७४२ रोजी पेशव्यांना पत्र पाठवून त्यांच्या मनात कोणता मनसबा आहे ह्यासंबंधी विचारले. शिवाय स्वतः भास्करपंतास मदत करण्यासाठी आपण देवगड बारिया मार्ग बंगालास जात आहोत असेही सांगितले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० सप्टेंबर १७६४*
आनंदराव धुळप - यांच्या घराण्याचें मूळचें उपनाम मोरे असून शिवरायांनी  जावळी येथें ज्या मोरे घराळ्याची धूळधाण केली तें हेंच होय. जावळीच्या झटापटींत ज्या त्रिवर्गांच शेवट झाला. त्यांपैकीं हणमंतराव हा आनंदरावाचा पूर्वज होता. जावळीहून हाकालपट्टी झाल्यावर याचे पूर्वज स्वसंरक्षणार्थ विजापूर दरबारीं येऊन राहिले व तेथें त्यांनीं समशेर गाजविल्यामुळें त्यांस धुळप हा बहुमानाचा किताब मिळाला. पुढें शिवरायांच्या भीतीनें हणंतरावाचे वंशज धवडे बंदरीं जाऊन राहिले. इ.स. १७६४ मध्ये आनंदराव ह्या दर्यायुद्धांत नाणावलेल्या गृहस्थाकडे मराठ्यांच्या आरमाराचें आधिपत्य आलें. आनंदराव हा इ.स. १७९४ पर्यंत सुभे आरमाराचा प्रामुख्यानें कारभार आटपीत असे. पेशवाई नष्ट झाल्यावर त्याच्या वंशजास इंग्रजांनीं पोलिटिकल पेनशन करून दिली (भा.इ.सं.मं. आहवाल शके १८३३ पृ. ११५). पेशव्यांच्या डायरींत आनंदराव यांच्या नांवचा आरमाराकडील सरदार म्हणून पहिला हुकूम आढळतो. त्याची तारीख ३० सप्टेंबर इसवी सन १७६४ ( रविलाखर ४ खमस सितैन मया व अलफ) ही आहे. त्याच्या हाताखालीं बाळाजी हरि यास आरमाराकडील अमीन म्हणून व जगन्नाथ नारायण यास आरमाराचा कारभारी म्हणून नेमलें होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० सप्टेंबर १९२९*
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना पुणे येथे अटक
ब्रिटिश पोलीस अधिकारी साँडर्स याच्यावर लाहोरला १७ डिसेंबर १९२८ रोजी हल्ला झाला, तेव्हा पहिल्या दोन गोळ्या राजगुरूंनी झाडल्या. पंजाबी नेते पुढे कौन्सिल हॉलमधल्या बाँ बफेकीनंतर पकडले गेले; पण आझाद व राजगुरू सुमारे दोन वर्षे अज्ञात स्थळी भूमिगत होते. साँडर्स वधानंतर २२ महिन्यांची म्हणजे ३० सप्टेंबर १९२९ रोजी राजगुरूंना पुण्यात अटक झाली. त्यांना भगतसिंग, सुखदेव यांच्याबरोबर लाहोरच्या कारावासात फासावर चढविण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या जन्मगावाचे 'राजगुरूनगर' असे नामांतर करण्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...