२७ सप्टेंबर १६६५*औरंगजेबाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तहाचे फर्मान व शंभूराजेंच्या मनसबदारीचे फर्मान येऊन दाखल.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ सप्टेंबर १६६५*
औरंगजेबाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तहाचे फर्मान व शंभूराजेंच्या मनसबदारीचे फर्मान येऊन दाखल. मिर्झाराजांच्या हुकुमाने छत्रपती शिवाजी महाराज तळकोकणातून येऊन मिर्झाच्या छावणीत दाखल.
ऐतिहासिक किल्ले पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी सुरु.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ सप्टेंबर १७०७*
शंकराजी नारायण पंतसचिवांचे देहावसान २७ सप्टेंबर १७०७ रोजी श्री क्षेत्र आंबवडे येथे झाले. 
रामचंद्र पंतांबरोबर महाराष्ट्रात वावरणारा त्यांचा जोडीदार शंकराजी नारायण हा मावळातील शिरवळपासून वाई-सातारा पर्यंतच्या अवघड प्रदेशाचा माहितगार मोठा युक्तिबाज व हर तऱ्हेने कार्य सिद्धीस नेणारा होता. मावळातील लोकात त्याचे चांगले वजन होते. औरंगजेबाने मावळातील किल्ले घेण्याचा सपाटा लावताच शंकराजीने मावळी फौज उभी करून ते बादशहाच्या कब्जातून परत घेतले. तो अत्यंत धाडसी व उलाढाल्या करण्यात तरबेज होता. हाती घेतलेल्या कमी सबब सांगत तो कधी आला नाही. रामचंद्रपंतांवर त्याची पूर्ण निष्ठा होती. मावळातील किल्ले लगोलग घेण्यात त्याने चांगलीच हुशारी दाखवली. वतने परत दिल्याशिवाय देशमुख, कुलकर्णी समजत नाहीत व मुलुख आबाद होत नाही हे जाणून वतने देण्यास सुरुवात केली. 
मराठेशाही समूळ नष्ट करण्यास आलेल्या औरंगजेबास रामचंद्रपंत - शंकराजी नारायण यांचा मुत्सद्दीपणा व संताजी - धनाजी यांचा गनिमीकावा या दोहोंच्या सुंदर मिलाफामुळे अखेर नमते घ्यावे लागले आणि त्याच्या पश्चात मराठ्यांनी दिल्लीपावेतो धडक मारून मोगलांनाच आपले अंकित बनवले. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ सप्टेंबर १७२९*
सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची पुण्यतिथी.
त्यांची समाधी तळेगाव दाभाडे येथील 'श्रीमंत सरसेनापती दाभाडे श्री बनेश्वर मंदिर' येथे आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२७ सप्टेंबर १८३३*
समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४