वढू बुद्रुक येथील शिक्षक संभाजी शिवले यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर साक्ष नोंदवताना शिवले परिवाराने छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार केल्याचा उल्लेख असणारा ब्रिटिश कालीन कागद सादर केला आहे.* या कागदावरील मजकूर असा..

*वढू बुद्रुक येथील शिक्षक संभाजी शिवले यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर साक्ष नोंदवताना शिवले परिवाराने छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार केल्याचा उल्लेख असणारा ब्रिटिश कालीन कागद सादर केला आहे.* या कागदावरील मजकूर असा...

 _श्री_ 
_सीमगच्यापोलीला नारो सिवले यांनी वारता आणली गोरया सरकारनी जमीनजुमल्याचे कागद इनामहुकूम करनेसाठी सरकारात जमा करण्याचे आदेस केला मनून नक्कल केला अवरंग पातसहा सिवाजी राजाचा पोरगा संबाजीराजा तेचा मैतर कबजीबावा तेचा कबिला जाळीत टाकून गावात आला. तेच हाल हाल करिता गुडी पाडव्याला जीव मारविले नागर गावातून बापूजी सिवलेने पदूबाई व बवानीबाईच्या जोडीने सीरका मनोन कड तोडल सिदे व गोतानी काडून दिले तुरकाचया वगलीला_ _संबाजीराजाचा सीर सापाडल ते उचलून गावाचया येसीवर येचनात दडाच तुकड दोतरात ववचल_
_कजालाच सरान चेतावल देहाला मूठमाती दिली अवरंग पातसहाला वारता गेली तेने गावात हायदोस केला मानस परागंदा जाली चिचवडचया गोसायाने जी व राकिले पानकळा गावात काडून अवरंग पातसहा गाव सोडून गेला गावची पार राक जाली गावाची पांढरी ओकीबोकी जाली_

_मोरोजी सिवले नी  (नांगराचे चित्र)_
_(डाव्या बाजूला समासात मजकूर) नक्कल लसुमन सिवले_

यावरून सदर जुना कागद हा इंग्रज सरकारने इनाम कमिशन ची स्थापना केल्यावर सर्व इनामाचे, जमीन मालकीचे कागद मागविले तेंव्हा मोरोजी सिवले (शिवले) यांनी लसुमन सिवले (लक्ष्मण शिवले) यांच्या हस्ताक्षरात नक्कल करून घेतला असे समजते. या कागदात संभाजी राजांच्या व कवीकलशच्या देहावर अंत्यसंस्कार करणारे बापूजी सिवले (शिवले) व पदूबाई (पद्मावती) यांचा उल्लेख आहे. यामुळे शिवले परिवाराने छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार केले या पूर्वजांपासून सांगितल्या जाणाऱ्या जनश्रुतीला पुष्टी मिळते. अधिकारी अथवा जाणकार नेमून या ब्रिटिश काळातील कागदाविषयी शासकीय पुराभिलेख कार्यालयातून अधिक संशोधन करावे अशी विनंती संभाजी शिवले यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगास केली आहे. Sandip Mahalu Shivale 

*Koregaon Bhima inquiry panel hearings: Vadhu Budruk resident submits ‘British Era document’ on ‘Shivale family conducting last rites of Sambhaji Maharaj’*

https://indianexpress.com/article/cities/pune/koregaon-bhima-inquiry-panel-hearings-vadhu-budruk-resident-submits-british-era-document-on-shivale-family-conducting-last-rites-of-sambhaji-maharaj-7540249/

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४