आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१ ऑक्टोबर १६५७*
छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांसह कल्याणकडे रवाना...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१ ऑक्टोंबर १७००*
महापूरात औरंगजेबाला अपंगत्त्व
त्यावेळी १ ऑक्टोंबर १७०० रोजी माण नदीला अचानक पूर येऊन औरंगजेबाच्या छावण्या वाहून गेल्या. यामध्ये शेकडो सैनिक, उंट, हत्ती वाहून गेले. मुघल लष्कराची मोठी हानी या पूरात झाली. यावेळी छावणीत हजर असलेल्या साकी मुस्तैदखान याने माण नदीला आलेल्या या भयंकर पूराचे वर्णन करुन ठेवले आहे. या पूरात पाण्यात बुडण्यापासून जीव वाचवताना औरंगजेबाचा पाय मोडला. त्याला कायमचे अपंगत्त्व आले. माण नदीच्या महापूराने औरंगजेबाला चांगलीच अद्दल घडविली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१ ऑक्टोबर १७२४*
साखरखेर्डा लढाई - निझामाने मोगलांचा पराभव केला
दख्खनमधील आपल्या भावी आव्हानाची पुरेपूर कल्पना निजामाला येऊन चुकली. बादशहाने निजामाचा नि:पात करण्यास धाडलेल्या मुबारिजखानाला सामोरे जाण्यासाठी निजामाने बाजीरावांच्या साह्याची याचना केली आणि ते तातडीने त्याच्या मदतीला धावून गेले. १ ऑक्टोबर १७२४ला साखरखेर्डा लढाईत मुबारिजखानाचा पराभव झाला. निजामाने मराठय़ांना चौथ देण्याचे आश्वासन दिले. याशिवाय, या लढाईदरम्यान निजामानिकट वावरल्याने त्याच्या डावपेच आणि विचारसरणीमध्ये जवळून डोकावून पाहण्याची संधी बाजीरावांना मिळाली. या अमूल्य उपहाराचा बाजीरावांनी निजामाबरोबरील भावी लढायांत पुरेपूर उपयोग केला.
या विजयामुळेच निजामाच्या दक्षिणेच्या स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब झाले. निजामाने मोगल बादशाह मोहम्मद शाह याला सविस्तर पत्र लिहून माफी मागितली. त्यामुळे बादशाहने त्याला परत दक्षिणेची सुभेदारी बहाल केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१ ऑक्टोबर १७४९*
'आपले खावंद' म्हणून नानासाहेबांना शाहूमहाराजांबद्दल खूप आदर वाटत असे. इ. स. १७४९ च्या मध्यापासून शाहूमहाराजांच्या तब्येतीत बिघाड होऊ लागला. शाहूमहाराज सत्तरीच्या आसपास पोहोचले होते. आपले आता फार काळ जगणे नाही म्हणून महाराजांनी ऑगस्ट १७४९ मध्ये नानासाहेबांना साताऱ्यात बोलावून घेतले. दि. १ ऑक्टोबर १७४९ या दिवशी शाहूमहाराजांनी गोविंद खंडेराव चिटणीस (खंडो बल्लाळ चिटणीसांचा पुत्र) यांना बोलावून आपल्या माघारी राज्याच्या कारभाराची यादी म्हणजे एकप्रकारे एक मृत्युपत्रच तयार करून घेतले. आजार बरा होईल असे वाटत नव्हते. यातच चिंतेची बाब म्हणजे शाहू महाराजांना मुलगा नव्हता. नानांनाच ते आपल्या मुलासारखा मानत असत. आपल्या माघारी राज्य आणि प्रजा सांभाळू शकेल असा अन्य कोणीही सरदार वा विश्वासू व्यक्ती न दिसल्याने शाहूमहाराजांनी नानासाहेबांपासून पुढे 'पेशवाई' ही भट घराण्याकडे कायम वंशपरंपरागत करून दिली व साऱ्या कारभाराची सूत्रे पेशव्यांकडे सोपवली आणि अखेरची निरवानिरव करून दि. १५ डिसेंबर १७४९ रोजी शाहूमहाराज साताऱ्यात मृत्यू पावले. योद्धा शिवछत्रपती महाराजांपासूनचे भोसल्यांचे जनक राजपद संपले. आता साताऱ्याच्या गादीवर भोसले कुळातीलच कोणालातरी दत्तक घ्यावे लागणार होते. म्हणूनच कोल्हापूरकर, ताराबाई आणि राजारामांचा नातू, शिवाजीपुत्र राजाराम (दुसरे) यांना नानासाहेबांनी दि. ४ जानेवारी १७५० या दिवशी साताऱ्याच्या गादीवर अभिषेक केला. वास्तविक शाहूमहाराजांच्या मृत्यूनंतर सातारा आणि कोल्हापूरची गादी एक करून, पुन्हा 'एकच' अखंड स्वराज्य निर्माण करण्याची नानासाहेबांची इच्छा होती. त्याकरता या नव्या राज्याचा अधिकारी म्हणून कोल्हापूरकर संभाजीराजालाच नेमण्याचा नानासाहेबांचा विचार होता. परंतु आपल्याला गादीवर बसले तरी सारा कारभार मात्र पेशवे नानासाहेबच बघणार, मग आपण नाममात्रच राहणार या चिंतेने संभाजीरावांनी नानासाहेबांच्या या प्रस्तावाला विरोध दर्शवला. त्यामुळे संभाजीराजांशी जास्त वाद न घालता नानासाहेबांनी त्यांचे सावत्र पुतणे, राजाराम यांना सातारा गादीवर बसवले. अभिषेकानंतर महादजीपंत पुरंदऱ्यांच्या मदतीने आणि मोरोबादादा फडणिसांच्या सल्ल्याने नानासाहेबांनी दरबारातील सर्व सरदारांची पुनर्व्यवस्था लावून दिली आणि आपली विश्वासू माणसे सातारा दरबारात ठेवून दि. २२ एप्रिल सन १७५० रोजी नानासाहेब पुण्याला आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१ ऑक्टोबर १७५९*
नानासाहेब पेशव्यांनी समशेरबहाद्दरांना साहेबनौबतीचा मान दिला. समशेरबहाद्दरांनी याआधी कितीतरी वेळा तलवार गाजवली होती. तुळाजी आंग्र्यांच्या मोहिमेत समशेरबहाद्दरांनी १८ फेब्रुवारी १७५६ रोजी रत्नागिरीचा किल्ला जिंकला. रघुनाथरावांच्या 'अटकेवरील' स्वारीत यांनी दिल्लीची आघाडी सांभाळली. यानंतर बुंदेलखंडात राजा छत्रसालांचे नातू म्हणजे समशेरबहाद्दरांचे मामेभाऊ जगतराय पुत्र हिंदुपताचा मृत्यू झाला. हिंदुपतांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुत्रांमधली भाऊबंदकी मिटवून न्याय देण्यात समशेरबहाद्दरांचा महत्त्वाचा वाटा होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१ ऑक्टोबर १८१२*
महाराणी ताराबाई भोसलेंची गादी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली
संभाजीनंतर कोल्हापूरच्या गादीवर शिवाजी द्वितीय (कोल्हापूर) या दत्तक पुत्राची कारकीर्द इ.स. १७६२ ते १८१३ अशी झाली. याच्या कारकीर्दीत १ ऑक्टोबर १८१२ रोजी कोल्हापूर संस्थानाचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारबरोबर संरक्षणात्मक करार होऊन ते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. त्यानंतर १८१३ मध्ये शिवाजी महाराज द्वितीय (कोल्हापूर) यांचे निधन झाले.
कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.
दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment