२६ फेब्रुवारी १६४७थोरले महाराज फर्जद "शहाजीराजे भोसले" यांनी छत्रपती शिवरायांकडे पुणे जहागिरीची जबाबदारी दिली.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ फेब्रुवारी १६४७ थोरले महाराज फर्जद "शहाजीराजे भोसले" यांनी छत्रपती शिवरायांकडे पुणे जहागिरीची जबाबदारी दिली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ फेब्रुवारी १७०४ किल्ले तोरणा/प्रचंडगड औरंगजेबने राजगड जिंकल्यानंतर मुघलांनी हा किल्ला सन १७०४ साली जिंकला २३ फेब्रुवारी १७०४ ला त्याने तोरण्याकडे कूच केले व २६ फेब्रुवारी १७०४ ला तो त्याच्या पायथ्याशी पोहोचला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ फेब्रुवारी १७३७ चिमाजी आप्पानी अटेर व भदावर लुटले 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ फेब्रुवारी १७३९ खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे प