२३ फेब्रुवारी १६६५ रोजी कारवार सोडले आणि भिमगडाच्या मोहिमेसाठी छत्रपती शिवाजी महाराज काळी नदी (गोवा) ओलांडून रवाना झाले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ फेब्रुवारी १६२३
२३ फेब्रुवारी रोजी राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठपुत्र राजे दत्ताजीराव यांचा स्मृती दिवस.
राजे दत्ताजीराव जाधवराव यांचा मृत्यु २३ फेब्रुवारी १६२३ रोजी खंडागळे हत्तीप्रकरणात देवगिरीवर झाला.त्यांच्या सिंदखेडराजा परिसरात मुख्य व स्वतंत्र विद्यमान वंशजशाखा जवळखेड व उमरद रुसुमचे या असुन सिंदखेडराजा परिसराव्यतिरिक्त यांच्या विद्यमान वंशजशाखा भुईंज (सातारा), करवंड,करणखेड,वडाळी व सारवडी या होत....

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ फेब्रुवारी १६६५
शिवाजी महाराजांचा कारवारच्या बाहेर खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता येथे त्या शेरखानाने इंग्रज व तेथील सर्व व्यापार्‍यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवाजी महाराजांकडे रूजू केली...
छत्रपती शिवाजी महाराजांना काळी नदीच्या जवळच इंग्रजांची व कंगोदेशाची अशी दोन गलबते नांगरून पडलेली दिसली, ही गलबते आपल्या ताब्यात द्यावीत असा निरोप महाराजांनी शेरखान यास पाठवला. शेरखानाने महाराजांचा गलबत ताब्यात देण्याचा निरोप इंग्रजांकडे पाठवला असता इंग्रजांनी उद्दामपणे निरोप पाठवुन गलबते देण्यास नकार कळवला. इंग्रजांचा उर्मट निरोप पोहचात, त्यांनी कारवार भाग सोडण्यापूर्वी या इंग्रजांची गुर्मी उतरवण्याची ठरवले, महाराज आपले पुढे गेलेले आरमार बोलवतात की काय अशी भीती इंग्रज आणि शेरखानास वाटू लागली. शेरखानाने इंग्रजांची समजुत घातली आणि कारवारच्या व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नजराणा अर्पण करत १२२ पौंड खर्च म्हणून महाराजांकडे पाठवण्यात आला. या सगळ्या घटना घडलेल्या इतिहासात नोंद असलेल्या तारीख आहेत २१ आणि २२ फेब्रुवारी १६६५...
स्वराज्यावर मिर्जाराजे जयसिंग हा चालून येत आहे हे समजतास छत्रपती शिवाजी महाराजांनी २३ फेब्रुवारी १६६५ रोजी कारवार सोडले आणि भिमगडाच्या मोहिमेसाठी छत्रपती शिवाजी महाराज काळी नदी (गोवा) ओलांडून रवाना झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३फेब्रुवारी १७३९
चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंडयावर हल्ला चढवला.
चिमाजी आप्पा यांनी १७३९ साली फिरंगणाच उच्चाटन केल. ४ वर्षे सुरु असलेल्या मोहिमेचा शेवट वसई जिंकून साजरा केला गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ फेब्रुवारी १८७६
संत गाडगे महाराजांचा जन्म
गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे लहानाचे मोठे झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ फेब्रुवारी १८७९
हुतात्मा हरी मकाजी नाईक म्हणजे इतिहासातील एक दडलेलं कर्तत्ववान व्यक्तीमत्व, क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जीवन चरित्रावरून प्रेरणा घेऊन अनेक शूर लढवय्ये स्वातंत्र्य सेनानी तयार झाले, त्यापैकी एक वासुदेव बळवंत फडके. त्यांनी १८५७ च्या उठवानंतर इंग्रजांविरुद्ध गनिमी काव्याने लढण्याचा निश्चय करून बंड उभे केले. ब्रिटीश प्रशासनाला मदत करणाऱ्या धनदांडग्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये फौज निर्माण करण्याचा मनसुबा आखला आणि सर्व जाती धर्म समावेशक अशी फौज निर्माण करण्यासाठी त्यांनी रामोशी महार, मातंग, कोळी, कुणबी, मराठा, चांभार न्हावी आणि मुसलमान अशा विविध जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून बंड उभे केले. यातील सर्वात मोठा सिंहाचा वाटा होता तो रामोशी समाजाचा.
इसवी सन १८७७ च्या सुमारास फडकेंनी पुणे, सातारा, सांगली. सोलापूर परिसरातील रामोशी समाजाची चाचपणी करण्यास सुरवात केली व एक बंड उभे केले. या बंडाची दिशा क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रमाणेच होती. ब्रिटीश प्रशासनाला हादरविण्यासाठी धनदांडग्यांच्या घरावर दरोडे घालायचे आणि त्या पैशाचा उपयोग स्वातंत्र्यासाठी करायचा. या कार्यातील त्यांचे प्रमुख शिलेदार होते दौलतराव नाईक आणि हरि मकाजी नाईक.
त्याच्यातील धाडसी वृत्ती आणि नेतृत्व गुण लक्षात घेऊन वासुदेव बळवंत फडकेंनी त्याचे कर्तुत्व सन्मार्गी लावण्यासाठी त्याला प्रवृत्त केले. क्रांतिवीर उमाजी नाईकांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणे किती मोलाचे आहे याचे महत्व पटवून देण्यासाठी फडकेंनी वारंवार हरीच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्याला स्वातंत्र्य संग्रामासाठी कार्य करण्याची गळ घातली. काम दरोडा घालण्याचेच होते परंतु ते देशसेवेसाठी करावयाचे होते व त्याची झळ गोरगरीब जनतेला बसू द्यायची नाही हे उद्दिष्ट समोर ठेऊन फडकेंनी उभ्या केलेल्या बंडात तो सहभागी झाला. बंडाचे पहिले निशाण उभे केले ते २३ फेब्रुवारी १८७९ शिरूर जवळील धामरी गावातील ब्रिटीश प्रशासनासाठी काम करणाऱ्या मारवाड्यांच्या घरावर दरोडा टाकून तेथील कर्ज वचनचिठ्ठी आणि खतावण्या जाळून टाकल्या आणि गोरगरीब जनतेला सावकारी जोखडातून मुक्त केले. 
त्यानंतर दावडी निमगाव, पानमळा असे करीत करीत जेजुरी जवळील वाल्हे गावामध्ये ५ मार्च १८७९ रोजी मारवाड्यांच्या घरावर दरोडा टाकला. या सर्व प्रकाराने भयभीत झालेल्या इंग्रज सरकार कडून  हरीला पकडून देणाऱ्यास अथवा त्याची माहिती माहिती कळविणाऱ्यास एक हजार रुपयाचे इनाम जाहीर करण्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४