२५ फेब्रुवारी १६३७शहाजीराजे आदिलशाहीत दाखल - फर्जद किताब मिळाला
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२५ फेब्रुवारी १५६८
अकबर बादशहाने रजपुतांचा प्रचंड पराभव करुन चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२५ फेब्रुवारी १६३७
शहाजीराजे आदिलशाहीत दाखल - फर्जद किताब मिळाला
इ. स. १६३६ साली शहाजहान बादशहाच्या स्वाधीन पेमगिरी किल्ला शहाजीराजे यांनी केला तेव्हा आदिलशहा व शहाजहान बादशहा यांत तह झाला. त्यात भीमेपलीकडील निजामशहाचा मुलूख मोगलांस द्यावा, अलीकडील आदिलशहास द्यावा ; आदिलशहाने तो शहाजी राजांस जाहगीर द्यावी. बारा हजार स्वारांनिशी महाराजांनी आदिलशहाची चाकरी करावी.’
तहांत सरंजामास जो मुलूख दिला तो भीमानदीच्या दक्षिणेकडील त्यात पुणे समाविष्ट होते. शहाजीराजांनी पुणे हे जहागिरीचे मुख्य ठाणे बनवून तेथे आपल्या तर्फे दादाजी कोंडदेव मलठणकर यास सुभेदार नेमिले. दादाजीपंतांनी पुणे कसब्याची व गावगन्नाची वसती केली.
त्यानंतर फेब्रुवारी १६३७ मध्ये शहाजीराजे आपली पत्नी जिजाबाई, मुलगा संभाजी व बाल शिवाजीसह विजापुरी गेले. शहाजीराजांनी या सर्वास आपला स्वराज्य संपादनाचा मनोदय सांगितला तो असा, ‘संभाजीराजे यांनी कर्नाटकात स्वराज्य कमवावे आणि शिवरायाने मातोश्रीसह पुण्यास राहून महाराष्ट्रात स्वराज्य स्थापावे.’ तिथे ते २५ फेब्रुवारी १६३७ रोजी आदिलशहाच्या चाकरीत दाखल झाले. आदिलशहाच्या संमतीने शहाजीराजांनी विजापूर जवळच्या कंपिली गावी आपणांस राहण्यासाठी एक वाडा बांधला. मोठा बगीचा केला व तेथे ते राहू लागले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२५ फेब्रुवारी १७२८
सरदार रायाजीराव जाधवराव यांना वीरमरण
भारतीय इतिहासातील गनिमी काव्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून ओळखली जाणारी "पालखेडची लढाई". पहिल्या बाजीरावाच्या नेतृत्त्वाखाली मराठा साम्राज्य आणि हैद्राबादच्या निजामात झालेल्या या युद्धात मराठ्यांनी खनखनित विजय मिळवला. या युद्धात सरदार रायाजीराव जाधवराव छत्रपती शाहूंचे विश्वासु म्हणून सहभागी झाले होते.
२५ फेब्रुवारी १७२८ रोजी नाशिकमधिल पालखेड जवळील निपाणी प्रदेशात झालेल्या धुमश्चक्रीत सरदार रायाजीरावांना वीरमरन आले. परिणामतः २८ फेब्रुवारीला निजाम नाक धरून मराठ्यांना शरण आला. जाधवरावांनी गाजवलेल्या मर्दुमकीची साक्ष म्हणून ही प्रशस्त छत्री/समाधी भुईंज(सातारा) गावाच्या मध्यवर्ती चौकात बांधण्यात आली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२५ फेब्रुवारी १८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली . त्यात २५ फेब्रवारीला चाकण उर्फ संग्रामदुर्ग किल्ला ले. कर्नल डिफनने उद्धवस्त केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment