१७ फेब्रुवारी १६६३छत्रपती शिवरायांनी केळशी जिंकले.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१७ फेब्रुवारी १६६३
छत्रपती शिवरायांनी केळशी जिंकले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१७ फेब्रुवारी १६७९
सुरतचे मुंबई इंग्रजकरांना पत्र
युवराज शंभुराजे दिलेरखानाच्या छावणीत...
सुरतेचे इंग्रज अधिकारी मुंबईच्या इंग्रज अधिकाऱ्यांना कळवितात, "दख्खनमध्ये बादशाही सेनापतींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठा विजय मिळविला आहे. सर्वात छत्रपती शिवाजी महाराजांची मनःशांती अधिक ढवळणारी गोष्ट घडली ती म्हणजे त्यांचा ज्येष्ठ पुत्र युवराज शंभुराजे बादशाही सरदार दिलेरखान यांच्याकडे गेले." 'याची नोंद मल्हार रामराव चिटणीस, बुसातिनुस्सलातीन, विजापुरची अदिलशाही, इंग्रज, भीमसेन सक्सेना, जेधे शकावली, या सर्वांनी घेतली असली तरी महाराजांचा अभ्यास करताना असे निदर्शनास येते की, "युवराज शंभुराजे दिलेरखानाच्या गटात जाणे म्हणजे महाराजांचेच राजकारण होय". युवराज संभाजीराजे दिलेरखानापासी गेले. दिलेरखानाने त्यांसी ७,०००, हप्त (सप्त) सात हजारी मनसब दिली व सन्मान केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१७ फेब्रुवारी १६८९
छत्रपती शंभूराजे व कवी कलश यांचे हालहाल करण्यास सुरुवात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१७ फेब्रुवारी १७३८
पोर्तुगीजांनी धारावी जिंकला
१५ फेब्रुवारी रोजी कडदीन आणि पेद्रु द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे ३०० ग्रेनेडियर्स आणि १४४० एतद्देशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली. पारसीककडे जाण्याचा देखावा करून ते दिनांक १७ फेब्रुवारी सन १७३८ रोजी धारावीवर आदळले. तुफान रणकंदन झाले. मराठ्यांनी, नाईकमंडळींनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. ठाण्याहून येऊन खंडोजी माणकर यांचे सैन्याने निकराचा लढा दिला परंतु अखेर पोर्तुगीजांनी धारावी घेतली.
"यावेळी मराठ्यांची पाचसातशे माणसे मेली. पाचशे कैद झाली. पोर्तुगीजांकडील बारा सैनिक व सरदार मॅसेडो ठार झाले." अशी नोंद आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१७ फेब्रुवारी १७३९
मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१७ फेब्रुवारी १७७३
कोल्हापूर गादीच्या कर्तबगार महाराणी "जिजाबाई (करवीर)" यांचे पन्हाळा किल्ल्यावर निधन झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१७ फेब्रुवारी १७७३
नारायणराव पेशव्यांच्या वधानंतर रघुनाथराव हे पेशवे झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१७ फेब्रुवारी १८८१
सामाजिक क्रान्तिचे प्रणेते क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचा मृत्यू. (वाकडेवाडी, संगमपूल, पुणे)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१७ फेब्रुवारी १८८३
क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू, एडन,येमेन
(जन्म : शिरढोण, महाराष्ट्र, ४ नोव्हेंबर १८४५)
त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment