२६ फेब्रुवारी १६४७थोरले महाराज फर्जद "शहाजीराजे भोसले" यांनी छत्रपती शिवरायांकडे पुणे जहागिरीची जबाबदारी दिली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२६ फेब्रुवारी १६४७
थोरले महाराज फर्जद "शहाजीराजे भोसले" यांनी छत्रपती शिवरायांकडे पुणे जहागिरीची जबाबदारी दिली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२६ फेब्रुवारी १७०४
किल्ले तोरणा/प्रचंडगड
औरंगजेबने राजगड जिंकल्यानंतर मुघलांनी हा किल्ला सन १७०४ साली जिंकला २३ फेब्रुवारी १७०४ ला त्याने तोरण्याकडे कूच केले व २६ फेब्रुवारी १७०४ ला तो त्याच्या पायथ्याशी पोहोचला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२६ फेब्रुवारी १७३७
चिमाजी आप्पानी अटेर व भदावर लुटले

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२६ फेब्रुवारी १७३९ 
खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२६ फेब्रुवारी १७८४
महादजी शिंदेंनी ग्वाल्हेर-गोहाद किल्ले जिंकले
पानिपत युद्धानंतर नजीबखान रोहिला मोगली राज्यकारभारात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करत असे. त्याच्या नंतर नजफ्खान झुल्फिकार उद्धौला दिल्लीच्या राजकारणात प्रमुख झाला. तो १७८२ मध्ये मरण पावला व बादशाहीत पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण झाली. पुण्याहून उत्तरेकडे आल्यावर महादजींनी १७८२ पर्यंत लहानमोठ्या बंडखोर संस्थानिक, राजे,जहागीरदार ह्यांचा बंदोबस्त केला. तसेच २६ फेब्रुवारी १७८४ रोजी ग्वाल्हेर व गोहाद किल्ले जिंकून दिल्लीकडे कूच केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२६ फेब्रुवारी १९६६
महान क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन (जन्म: २८ मे १८८३)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४