२६ ऑगस्ट १६६४छत्रपती शिवरायांनी मालोंड बंदर जिंकले.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ आॅगस्ट १३०३ अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले - राणी पद्मावतीचा जोहर शहाबुद्दीन घोरी निघून गेल्यावर सुमारे शंभर सव्वाशे वर्षे पर्यंत चितोडच्या राजांना बरीच विश्रांती मिळाली. गुलामवंशी सुलतानांनी त्यांना फारसा उपद्रव दिला नाही .परंतु अल्ला-उद्दीन खिलजी यांची सर्वव्यापी दृष्टी त्यांना फार दिवस चुकवता आली नाही. राणा लक्ष्मणसिंह चितोड येथे राज्य करीत होते. त्यांचे काका रतन सिंह यांनी रुपवती कन्या पद्मावती यांच्याशी विवाह केला होता. पद्मावतीच्या सौंदर्याची किर्ती अल्लाऊदिन खिलजी याच्या कानावर पडली. पद्मावतीला मिळवण्यासाठी अल्लाऊदीन खिलजी याने चितोडवर स्वारी केली. लढाईत राजा रतनसिंह यांना वीर मरण आले. शेवटी इलाज चालत नाही असे पाहून, राणी पद्मावतीनेआपल्या शिलाचे रक्षण करण्यासाठी पेटत्या अग्नीकुंडात उड्या टाकून राणी पद्मावतीने १६०० स्रियासह अग्नीत प्रवेश केला तो दिवस होता २६ आॅगस्ट १३०३ पद्मावती जोहार करून अजरामर झाली, आणि अल्लाऊदिन खिलजी राखेचे ढीग तुडवीत किल्ल्यावर फिरत राहिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ ऑगस्ट १४९८ १४८४ साली पोर्