२२ ऑगस्ट १७३३ पर्यंत जंजिरा आणि अंजनवेल हे वगळता सिद्दीची बाकीची सर्व ठाणी मराठ्यांच्या ताब्यात आली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२२ आॅगस्ट १६३९
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२२ ऑगस्ट १६८२
औरंगाबाद ही मुघलांची दक्षिणेतील राजधानी.औरंगजेब दख्खन मोहिमेवर आल्यापासून म्हणजे १६८१ पासून ते १६८३ पर्यंत मराठे मुघलांच्या आक्रमणाला तोंड देण्यासोबतच मुघल प्रदेशात हल्ले करून त्या भागाची लुटही करत असत. १६८१ च्या मे महिन्यात मराठ्यांनी औरंगाबाद परिसरात लूट करून तो प्रदेश उध्वस्त केला होता. त्यासोबतच १६८२ च्या एप्रिल महिन्यात मराठ्यांनी औरंगाबाद पासून जवळच असणारे जालना शहर लुटले होते. २२ ऑगस्ट १६८२ च्या अश्याच एका हल्ल्यात औरंगाबाद पासून जवळच असणाऱ्या कन्नडचा ठाणेदार शहा अलीलनरा जखमी होऊन मराठ्यांच्या हाती लागला. मराठ्यांनी त्याला कैद करून ताब्यात घेतले. आणि मुघल सरदार खानजहान बहाद्दूरला जाऊन मिळाला. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२२ ऑगस्ट १६८७
मोगलांच्या सोबत सुरू असलेल्या जीवनमरणाच्या संघर्षातही संभाजीराजे राज्यकारभारात किती तत्पर होते ते त्याच्या पत्रावरून लक्षात येते. शिवाजी महाराजांनी वाई प्रांतातील कसबे निंब येथील श्री सदानंद गोसावी यांना मठातील अन्नछत्रासाठी दरसाल रकमेची तरतूद करून दिली होती. पण तेथील कारकून ही रक्कम देण्यास हयगय करत असल्याचे तक्रार राजश्री आनंदगिरी गोसावी यांनी संभाजीराजेच्याकडे केली.त्यामुळे राजेंनी तेथील कारकुनाला जरबेचे पत्र लिहिले, "पहिले पासून अन्नछत्र चालिले असता मध्ये ऐवजाबाबे कुसुर करावया गरज काय? या उपरी ऐवज पाववावया बाबे सुस्ती न करणे. पाहिले पासून द्यावयाचा मोईन असेल तेंण्हे प्रमाणे पाववीत जाऊन अन्नछत्र चालो देणे. धर्मकार्यास खलेल न करणे.जाणिजे. अन्नछत्राचा मामला पूर्वीपासून सालगुदस्ता चालिला असेल ते मनास आणून त्याप्रमाणे चालवणे. उजूर न करणे.लेखनालंकार."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२२ ऑगस्ट १७३३
समुद्री मोहीम म्हटल्यावर आंग्रे घराण्याशिवाय मोहीम पुढे हालणारचं कशी तेव्हा जानेवारी १७३२ मध्ये खुद्द बाजीराव सेखोजींना भेटण्यासाठी कुलाबा येथे आले त्यांच्या भेटीचा उपयोग झाला, आणि सेखोजींनी ही मोहीम अंगावर घ्यायचे असे ठरवले शिवाय जंजिरेकरा विषयी पूर्ण माहिती असलेला आणि आरमारी लढाईत कुशल असा बांकाजी नाईक महाडिक नावाचा आपला एक प्रसिध्द सरदार सैन्यासह बाजीरावाचे स्वाधीन केला तसेच आपला भाऊ मानाजी यासही या मोहिमेवर जाण्यास सांगितले. इ.स १७३३ एप्रिलमध्ये श्रीनिवासराव प्रतिनिधी बाजीराव आणी फत्तेसिंग भोसले ही मोहीम चालू करण्यासाठी कोकणात आले आंग्ऱ्यांचा सरदार महाडिक आणि सिद्दीसात यांचे चिपळूणजवळ युद्ध झाले त्यात सिद्दी सातची दाणादाण उडाली. या मोहिमेची सुरवात झाल्यावर सिद्दी रसूल याकूतखान मृत्यू पावला व त्याच्या सात मुलांमध्ये यादवी सुरु झाली यात त्याचा ज्येष्ठ मुलगा मारला गेला सिद्दी अब्दुल रहिमान गादीवर बसला तो सेखोजींच्या मताप्रमाणे वागत होता त्यामुळे बाजीरावाविरुद्ध लढू नये, असे त्याचे मत होते परंतु त्याचा सरदार मंडळाला हे मान्य नव्हते त्यांनी सिद्दी रसूल याकूतखानच्या सिद्दी हसन या मुलाला गादी वर बसविले आणि ही मोहीम लढण्यास त्यांनी सुरवात केली.२२ ऑगस्ट १७३३ पर्यंत जंजिरा आणि अंजनवेल हे वगळता सिद्दीची बाकीची सर्व ठाणी मराठ्यांच्या ताब्यात आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४