२५ आॅगस्ट १६७६"किल्ले जंजिरा" च्या तटबंदीला शिड्या लावलेल्या लायजी पाटलांचा छत्रपती शिवरायांनी सन्मान केला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ आॅगस्ट १६७४
गोव्यातील "किल्ले फोंडा" वर मराठ्यांचा हल्ला. पण काही चुकीच्या धोरणामुळे हा प्रयत्न फसला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ आॅगस्ट १६७६
"किल्ले जंजिरा" च्या तटबंदीला शिड्या लावलेल्या लायजी पाटलांचा छत्रपती शिवरायांनी सन्मान केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ ऑगस्ट १८०५
यशवंतराव होळकर इंग्रजांच्या लष्करी हालचालींच्या बातम्या काढीत होते. इंग्रजानाही भरतपूरच्या लढाईनंतर आपल्या फौजेची जुळवाजुळव करण्यास सवड हवी होती. पण त्यांना यशवंतरावांचा पिच्छा सोडावयाचा नव्हता. यशवंतराव त्यांचा सदर हेतू ओळखून होते. पंजाब हा त्यानी दौडीचा प्रदेश ठरवून पंजाबातील शीख व त्यांच्या पलिकडील अफगाण यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार सुरु होता. दिनांक २५ ऑगस्ट १८०५ रोजी यशवंतराव राजस्थानच्या बाजूस, दिल्लीच्या अलिकडे असलेल्या रेवाडी नांवाच्या गांवाहून निघाले. मीरखान तीन चार दिवस मागे राहिला होता. शिंद्यांना सामील करून घ्यावे या उद्देशाने तो रेवाडीहून हालला नाही. यशवंतरावानी शिखांशी संधान बांधून त्यांना अनुकूल करून घेतले होते. त्यांचे फ्रेंच व पोर्तुगिज गोवेकर यांची मदत मिळविण्याचे प्रयत्न चालले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...