२३ ऑगस्ट १६६३छत्रपती शिवरायांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील "आचरे" ताब्यात घेतले

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ ऑगस्ट १६६३
छत्रपती शिवरायांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील "आचरे" ताब्यात घेतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ आॅगस्ट १६६६
छत्रपती शिवरायांच्या आग्रा सुटकेनंतर मुघल सैनिकांनी "कवी परमानंद" यांना "दौसा" येथून ताब्यात घेतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ आॅगस्ट १६६६
आग्र्याहून सुटकेनंतर छत्रपती शिवरायांनी खोटे शाही दस्तक दाखवून "चंबळ" नदीचा परीसर नावेने पार केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ ऑगस्ट १६६६
आग्य्रात असताना प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारातील बातम्या महाराजांना कशा ज्ञात असत, याविषयी २३ ऑगस्ट १६६६ ला आग्य्राहून लिहिलेल्या पत्रात परकलदास लिहितो, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज येथून निसटण्यापूर्वी चार दिवस त्याच्या भोवतालचा पहारा अधिकच कडक केला होता. पुन्हा एकदा बादशहाचा हुकूम आला होता की, छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारा, परंतु थोडय़ाच वेळाने त्याने आपले मन बदलले व महाराजांना विठ्ठलदासचे हवेलीत नेऊन ठेवण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांना दरबारांतील असल्या सर्व हालचालींची बित्तंबातमी असते. तेव्हा या बाबतींत सत्यता अजमावण्यासाठी तो कुमाराच्या छावणीत आला..’’

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ आॅगस्ट १६८०
शिवछत्रपतींच्या अकाली मृत्यूनंतर शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले. जुन १६८० ला रायगडी गेल्यावर आणि थोडी स्थिरता आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडच्या भवानी आईला १० हजार होणांची सनद करून दिली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ ऑगस्ट १७०९
१७१० मध्ये शाहू महाराजांचा सहाय्यक परसोजी भोसले निवर्तले व त्यांचा पुत्र कान्होजी कारभारावर दाखल झाले. छत्रपती शाहू महाराजांचा मुख्य सरदार रायभानजी भोसले हे २३ ऑगस्ट १७०९ रोजी मरण पावल्यावर शाहू महाराजांची मोठी हानी झाली. यावेळी चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, सिधोजी, हिंदुराव घोरपडे वगैरे सरदारांची मने द्विधा होऊन शाहू राजास आपला जम बसण्याची विवंचना निर्माण झाली. ह्या सरदारांची समजूत काढण्याचा शाहू राजांनी फार प्रयत्न केला. पण ते शाहूस महाराजांस सोडून गेलेच. चंद्ररावाचा व रावरंभा निंबाळकर यांचा पंडावा मोडून आपली बाजू सावरण्यासाठी शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांची पेशवेपदी नेमणूक केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ ऑगस्ट १७७०
माधवरावांचे धाकटे बंधू नारायणराव मोठे झाले होते. नुकत्याच झालेल्या कर्नाटक मोहिमेत नारायणरावांना सहभागी करून त्यांना लढाईचे प्रत्यक्ष मैदानावरील डावपेच शिकवायला माधवरावांनी सुरुवात केली होतीच. दि. २३ ऑगस्ट सन १७७० रोजी माधवरावांनी सखारामबापू बोकील यांची दिवाणगिरी नारायणरावांना बहाल केली आणि बापूंना मुतालकीची वस्त्रे दिली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४