२६ ऑगस्ट १६६४छत्रपती शिवरायांनी मालोंड बंदर जिंकले.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ आॅगस्ट १३०३
अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले - राणी पद्मावतीचा जोहर
शहाबुद्दीन घोरी निघून गेल्यावर सुमारे शंभर सव्वाशे वर्षे पर्यंत चितोडच्या राजांना बरीच विश्रांती मिळाली. गुलामवंशी सुलतानांनी त्यांना फारसा उपद्रव दिला नाही .परंतु अल्ला-उद्दीन खिलजी यांची सर्वव्यापी दृष्टी त्यांना फार दिवस चुकवता आली नाही. राणा लक्ष्मणसिंह चितोड येथे राज्य करीत होते. त्यांचे काका रतन सिंह यांनी रुपवती कन्या पद्मावती यांच्याशी विवाह केला होता.
पद्मावतीच्या सौंदर्याची किर्ती अल्लाऊदिन खिलजी याच्या कानावर पडली. पद्मावतीला मिळवण्यासाठी अल्लाऊदीन खिलजी याने चितोडवर स्वारी केली. लढाईत राजा रतनसिंह यांना वीर मरण आले. शेवटी इलाज चालत नाही असे पाहून, राणी पद्मावतीनेआपल्या शिलाचे रक्षण करण्यासाठी पेटत्या अग्नीकुंडात उड्या टाकून राणी पद्मावतीने १६०० स्रियासह अग्नीत प्रवेश केला तो दिवस होता २६ आॅगस्ट १३०३ पद्मावती जोहार करून अजरामर झाली, आणि अल्लाऊदिन खिलजी राखेचे ढीग तुडवीत किल्ल्यावर फिरत राहिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ ऑगस्ट १४९८
१४८४ साली पोर्तुगालचा राजा जॉन याला भारताबद्दल माहिती (विशेषत: त्यातील संपत्ती विषयी) कळाल्यावर या देशाचा शोध घेण्यासाठी त्याने तीन जहाजे तयार करायची आज्ञा दिली. दुर्दैवाने ती तयार व्हायच्या आतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या नंतर गादीवर आलेल्या डॉम मॅन्युएलने वास्को-द-गामाच्या व त्याचा भाऊ पाउलो यांच्या नेतृत्वाखाली ही तीन जहाजे ८ जूलै १४९७ या दिवशी रवाना केली.
जात्याच दर्यावर्दी असणार्या या खलाशांनी केप ऑफ गूड होपला वळसा घातला व ते २६ ऑगस्ट १४९८ ला कालिकतच्या जवळ पोहोचले. या भेटीदरम्यान त्यांना भारतात शिरकाव करता आला नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ ऑगस्ट १६६४
छत्रपती शिवरायांनी मालोंड बंदर जिंकले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ आगस्ट १६६६
औरंगजेब बादशहाने राय ब्रिंदावनला समोर बोलावून फर्मावले. औरंगजेब बादशहाने फर्मावले शिवाजीराजाची हकिकत सांग' बावचळलेला ब्रिंदावन उत्तरला, "ह्या बंद्यास माहिती असती तर ती त्याने अगोदरच जाहीर केली असती.मिर्झाराजे जयसिंग यांच्याकडून दक्षिणेतून सलीम बेग गुर्जबर्दार औरंगजेब बादशहाकडे आला होता. त्यालाही औरंगजेब बादशहाने विचारले, "शिवाजीराजे बद्दल काही बातमी आणलीस का? त्याने सांगितले, "शिवाजीराजा अलिकडे नर्मदेवर आल्याची खबर समजली होती.पण शिवाजीराजे दिसले नाही." "त्यांच्या लोकांना वाटेत कैद केले जात आहे. औरंगजेब बादशहाने मुहम्मद आकील व रुस्तमबेग गुर्जबर्दार यांना हुकुम केला की, "तुम्ही शिवाजीराजाला ओळखता. नर्मदेपर्यंत जाऊन ठिकठिकाणी चौकशी करावी.औरंगजेब बादशहाच्या अस्वस्थ मनःस्थितीची कल्पना यावरून पुरेपूर येईल.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ ऑगस्ट १६७७
दक्षिण मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याचा प्रत्यय स्थानिकांसोबतच परकीय सत्ताधाऱ्यांनाही आला होता. डच व्यापारीही त्याला अपवाद नव्हते, त्यांच्या तेगेनापट्टणमच्या फॅक्टरीचा प्रमुख हर्बट जागेर याने आपल्या वकिलामार्फत शिवरायांना अर्ज करून आपल्या व्यापारासाठी त्यांच्या कौलाची आवश्यकता असल्याचे व शिवरायांची सदिच्छा भेट घेण्याची इच्छा असल्याचे कळवले होते. त्यामुळे शिवरायांनी त्यांना भेटीस येण्याची व व्यापार करण्याची परावनगी दिली. त्याप्रमाणे डच अधिकाऱ्याची व महाराजांची ६ ऑगस्टच्या दरम्यान भेट झाली होती. भेटीत महाराजानी त्यांना कौल देण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी २६ ऑगस्टला डचाना पत्र देऊन शेरखानाच्यावेळी त्यांना मिळत असलेल्या सोयी चालू ठेवण्याचे आश्वासन दिले. फक्त महाराजांनी त्यात एक महत्वपूर्ण बदल केला तो म्हणजे गुलामांच्या व्यापाराला बंदी. ही माहिती जागेर व क्लेमेंट यांनी देवेनापट्टणमला पत्र पाठवून कळवली होती. या पत्राची तारीख होती २९ ऑगस्ट १६७७
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ ऑगस्ट १६७९
इ. स. १६७९ अखेरपर्यंत विजापूरच्या राज्याच्या उत्कर्षाच्या काळांत त्याचे आजच्या परिभाषेत बोलावयाचे तर चौवीस जिल्हे होते. महाराजांच्या महानिर्वाणाच्या पूर्वी यापैकी बारा जिल्हे मराठी राज्यांत समाविष्ट झाले होते. मुघलांचा एकच जिल्हा, बागलण हा मराठी राज्यात आला होता आणि तेथेच मुघल आणि मराठे यांची अटीतटीची झुंज चालू होती. अशा स्थितीत पुत्र छत्रपती संभाजीराजे मुघल सरदार दिलेरखानाकडे दि. १३ डिसेंबर १६७८ रोजी गेले. त्यामुळे दिलेरखानाचे पारडे जड झाले. आणि महाराजांपुढे फार मोठे संकट उभे राहिले. ह्या आपत्तीसही तिळमात्र न डगमगता महाराजांनी आपली सैन्ये मुघलांच्या व विजापूरकरांच्या अशा दोन्ही मुलुखात स्वैर संचाराकरिता व त्या त्या राज्यातील शहरे लुटून पैसा आणण्याकरिता रवाना केली. विजापूर मुघलांच्या हाती जाऊ नये म्हणून महाराजांनी दिनांक २६ ऑगस्ट १६७९ ला आपला वकील श्यामजी नाईक यांस तह करण्याकरिता पाठविले. तेव्हा उचल खाऊन मुघलांनी सप्टेंबरात मंगळवेढे घेतले आणि ऑक्टोबरात दिलेरखानाने विजापुरास जाऊन वेढा घातला व गोवळकोंडेकरांकडे जबरदस्त खंडणीची मागणी केली. मोगलांचे हे संकट समोर आलेले पाहून आदिलशाही दरबाराने अखेरीस निश्चय करून छत्रपती शिवाजी महाराजांशी प्रकट तह करण्याचा निर्णय घेतला. (इ. स. १६७९ ऑक्टोबर-नोव्हेंबर) तहानंतर विजापूर राज्यात पसरलेले मराठी सैन्य काढून घेऊन ते मुघलांवर रवाना केले. मुघलांच्या मुलूखात जबरदस्त उठावणी झाल्यामुळे मुघल सरदारांत अंतर्गत भांडणांना ऊत आला. त्यानंतर युवराज शंभुराजे पुन्हा स्वराज्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ ऑगस्ट १७८०
दि. २६ ऑगस्ट १७८० रोजी गणेशपंत बेहेरे यांची इंग्रजांशी झटापट झाली. यात इंग्रजांनी पारनेरा, युगनेरा आणि इंद्रगड हे किल्ले जिंकून घेतले. १७८० च्या पावसाळ्यात इंग्रजांनी गोहदच्या जाटांना शिंद्यांविरुद्ध भडकावून ग्वाल्हेरचा किल्ला हस्तगत केला. ग्वाल्हेर पडला. (१७८०). हे पाहताच महादजींनी उज्जैनीत आपली छावणी टाकली. इकडे नाना फडणविसांनी सबंध हिंदुस्थानातील, अगदी नेपाळच्या राजापासून श्रीरंगपट्टणमपर्यंतच्या चेतसिंह जाट, हैदर, भोसले, पोर्तुगीज, फ्रेंच, डच इ. सर्वांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास तयार केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ ऑगस्ट १७८७
गुलाम कादर दिल्लीत आला तो जाबेताखानाचा मुलगा आणि नजीबखान रोहील्याचा नातु होता. आजच्या पेपरमध्ये बादशाहाने त्याची बक्षी- उल ममालिक या जागेवर नेमणूक केली आणि अमीर- उलउमरा, रोशन- उद्दौला, बहादूर अशा मानाच्या पदव्या दिल्या...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment