Posts

Showing posts from July, 2024

३० जुलै १६८२छत्रपती संभाजी महाराजांनी "नाशिक" येथील "किल्ले रामशेज" ला १००० मावळ्यांची तुकडी पाठवली.गडाखाली जोरदार लढाई.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० जुलै १६७७ "दक्षिण दीग्विजय मोहीम" छत्रपती शिवरायांनी "नागोजी भोसले" यांस सालाना १२५ होन मंजूर करून "उटकुर" चा हवालदार नेमले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० जुलै १६८२ कारवारच्या इंग्रजांचे सुरतेच्या इंग्रजांना पत्र.  "मोगल बादशाह छत्रपती संभाजी महाराजांविरूध्द इतका चिडला आहे की, त्याने आपल्या डोक्याची पगडी खाली उतरली आणि शपथ घेतली, की त्याला मारल्याशिवाय किंवा राज्यातून हाकलून दिल्याशिवाय मी ती डोक्यावर घालणार नाही." अशी त्याने प्रतिज्ञा केली आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० जुलै १६८२ कारवारकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद ! "छत्रपती संभाजी महाराजांना जोराचा हल्ला करून दंडाराजपुरी घेईन अशी फार आशा होती. दादाजी प्रभू व इतर सेनापती व आपले निधड्या छातीचे ४ हजार लोक घेऊन, त्यांच्याकडे वेढा घालविला. या दुर्घट कामासाठी उत्तेजित व्हावे म्हणून त्यांस अर्धा शेर सोने किंवा चांदीची कडी बक्षिस दिली. परंतु यश आले नाही. बरेच लोक मारले गेले अवघे ५०० लोक वाचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० जुलै

२८ जुलै १६८२छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांची जहाजे पकडली! छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांची जहाजे पकडली. मुजोर पोर्तुगिजांना धाकात ठेवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी ही जहाजे पकडली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २८ जुलै १६०६ राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांच्या पत्रांत सरगुऱ्हों" असा उल्लेख ! धामधुमीचा काळ पराक्रमी पुरुषांस भाग्योदय करून घेण्यासाठी अत्यंत अनुकूल असतो. कारण यावेळी धडाडी दाखविल्यास त्वरित मोबदला मिळण्याची शक्यता असते. राजे मालोजीराजे यावेळी तरुण होते. स्वाभाविकपणेच त्यांच्या महत्वाकांक्षी तरुण मनाला ही राजकीय अस्थिरता भाग्योदयार्थ अनुकूल वाटली व त्यांनी शेती टाकून तरवार हाती धरली. राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांची जी पत्रे उपलब्ध आहेत. त्यांत या दोघा महापराक्रमी बंधूंना "सर" असे म्हटले आहे. सरगुन्हो हे सरगिरोह चे मराठी रुप आहे. गिरोह म्हणजे जमाव. त्यांचा प्रमुख म्हणजे सरगिरोह. उपरोक्त पत्रांमध्ये राजे "मालोजीराजे व राजे विठोजीराजे सरगुन्हो यासी गुन्होथलयास मुकासा दिधले असे असा उल्लेख करून काही गावे दिली आहेत. याचा अर्थ स्वतःचा जमाव किंवा सैन्य तुकडी घेऊन सरकार चाकरी करायची, व त्या मोबदल्यात सरकारकडून काही स्थळे खर्चासाठी मागून घ्यायची अशी पद्धत त्याकाळी रुढ होती. त्यानुसार राजे मालोजीराजे

२३ जुलै १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"छत्रपती शिवराय "तिरूमलवाडी" येथील "वैद्यनाथ स्वामी" मंदीरात पोचले

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ जुलै १६६६ आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांना "विठ्ठलदास"च्या हवेलीत हलविण्याची औरंगजेबाची गुप्त मसलत हेरांमार्फत छत्रपती शिवरायांच्या कानावर आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ जुलै १६७१ छत्रपती शिवाजी महाराजांचे पाटीलकीवरून चाललेल्या तंट्याविषयी पत्र पुणे परगण्याच्या कर्‍हेपठार तरफेतील वणपुरी या गावच्या पाटीलकीवरून चाललेल्या एका तंट्याविषयी त्या तरफेच्या कचेरीतून त्या तरफेतील सासवड वगैरे सहा गावांना पाठविण्यात आलेले २३ जुलै १६७१ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यात या प्रकरणी “मागे… दादाजी कोंडदेव यांचे कारकीर्दीत ऐसे चालिले असेली, राजेश्री साहेबांचे कारकीर्दीस चालिले असेली तेणेप्रमाणे हाली वर्तवणे, जो न वर्ते त्याची ताकीद करणे’‘ असा हुकूम राजश्री साहेबी (म्हणजे शिवाजी महाराजांनी ) केला असल्याचे नमूद केले आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ जुलै १६७७ "दक्षिण दिग्विजय मोहीम" छत्रपती शिवराय "तिरूमलवाडी" येथील "वैद्यनाथ स्वामी" मंदीरात पोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ जुलै १६८३ छत्रपती संभाजी महाराजांचा प

२२ जुलै १६८३पोर्तुगीजांच्या वाढत्या हालचालींना पायबंध घालण्यासाठी मराठ्यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली ८००० सैन्यासह उत्तर कोकणात रेवदंड्यावर पुन्हा स्वारी केली व चौलच्या किल्ल्याला वेढा घातला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ जुलै १६५७ मे महीन्यात मराठे अहमदनगरपर्यंत घुसले आणि लुट करुन परतले. औरंगजेब कमालीचा संतापला. त्याचे सैन्य कल्याणीच्या वेढ्यात गुंतले होते त्याचाच फायदा शिवाजीराजांनी घेतला. आदिलशहाने कल्याणीच्या रक्षणार्थ तीस हजार फौज पाठवली. दोन महिने मुघल - आदिलशहा लढत राहीले. २२ जुलै रोजी महंमद सुलताने व मीर जुम्ल्याने संयुक्त हल्ला करुन आदिलशाही सैन्याला हरवले. २९ जुलै रोजी कल्याणी किल्यात मुघलांना प्रवेश मिळाला पण पुढले ३ दिवस किल्लेदार दिलावरखानाने बालेकिल्यातून निकराचा लढा दिला. अखेर नाईलाजाने त्याने किल्ला सोडला. कल्याणी सारखा भक्कम आधार गेल्यावर आदिलशहाने तह करण्याची तयारी दाखवली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ जुलै १६६६ सत्पुरुष कवींद्र परमानंदांचा सत्कार आग्रा कैदेत असताना थोर सत्पुरुष कवींद्र परमानंद नेवासकर यांचा सत्कार करण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरविले. हा सत्कार समारंभ दिनांक २२ जुलै १६६६ च्या सुमारास झाला असावा, कारण ह्याचा उल्लेख दिनांक २२ जुलैच्या राजस्थानी पत्रात आहे. दिनांक २२ जुलै रविवारी छत्रपती शिवाजीराजे यांनी राहत्या

२१ जुलै १६७२"अब्राहम लेफेबर" हा डच वकील किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांसमोर हजर.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ जुलै १६५८ औरंगजेब दिल्लीमधे तख्तनशीन गेल्याच महिन्यात औरंगजेबाने बाप शहाजहानला आग्र्यात तुरूंगात टाकले होते व त्यानंतर ६ जुलै रोजी औरंगजेब दिल्लीला आला व तेथील व्यवस्था लावुन तो २१ जुलै रोजी तख्तनशीन झाला. याच दिवशी त्याने स्वतःला 'आलमगीर गाझी' अशी पदवी धारण केली. आलमगीर म्हणजे जग जिंकणारा व गाझी म्हणजे धर्मवीर. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ जुलै १६६२ देशबांधवांना सोडवण्यासाठी इंग्रजांचा प्लॅन !  विजापूरची राणी बडी बेगम साहिबा आपल्या मक्केच्या यात्रेवरून हिंदुस्थानला परतायच्या बेतात होती आणि तिच्या आगमनावर इंग्रज लक्ष ठेऊन होते ! पण कशासाठी ? बड्या साहेबीणीचा आणि रायरी वर अडकून पडलेल्या इंग्रजांचा एकमेकांशी काय संबंध होता ? या दोघांचा काहीही संबंध नसला तरी इंग्रजांना असे वाटत होते की बड्या साहेबिणीला जर आपण पकडले तर आदिलशहा तिच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांवर दबाव आणेल आणि त्या बदल्यात आपल्याला रायरीच्या तुरुंगातील आपल्या देशबांधवांना सोडवून घेता येईल ! वास्तविक पाहता शिवाजी महाराजांवर अशा प्रकारे दबाव टाकून आपल्या देशबांधवा

२० जुलै १६६२मराठ्यांनी "नाशिक" आणि आसपासचा प्रदेश जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १६६२ मराठ्यांनी "नाशिक" आणि आसपासचा प्रदेश जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १६८० छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजीराजांचे किल्ले रायगडवर "मंचकारोहण" झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १६८५ गुजरातच्या मार्गाने आग्र्यास प्रयाण करण्याची तयारी शहजादा अकबराने केली आहे अशी बातमी औरंगजेबास कळली तेव्हा त्याने अहमदाबादच्या सुभेदार कारातलबखान यास हुकुम पाठवला कि, "अकबर त्या बाजूस आढळला कि त्यास एकदम पकडून द्यावा बिलकुल हयगय करू नये". 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १६९१ आसदखान व कामबक्ष यास जिंजीवर स्वारी करण्याचा औरंगजेबाचा आदेश. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १७६१ माधवराव यांनी पेशवेपदाची सुत्रे हाती घेतली. पानीपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशवे यांचा मृत्यू झाला. रघुनाथराव यांनी पेशवेपदावर दावा सांगितला पण माधवरावांना पेशवेपद मिळाले. खचलेल्या मराठा साम्राज्याला नवी उभारी देण्यासाठी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी माधवराव पेशवे झाले होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १८३७ नाशिकचा नासक हिरा या दिवशी ल

१९ जुलै १६७६"छत्रपती शिवराय" आणि "आदिलशहा" यांच्यात तह.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ जुलै १६४७ महादभट मुद्गल पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे येऊन सांगितले की, मला पर्वती, पिंपळे सौदागर आणि पिंपरी या प्रत्येक गावात एक एक चावर जमीन याप्रमाणे तीन चावर जमीन आणि पुणे परगण्याच्या जकातखात्यातून दिवाबत्तीकरिता रोज तीन रुके असे इनाम आहे. हे इनाम निजामशाही फर्माने, मलिकअंबराचे खुर्द्खत, वाजीरांनी दिलेली भोगवट्याची पत्रे आणि शहाजीराजांनी दिलेले खुर्दखत यांच्याप्रमाणे शुहूर सन १०४७ पर्यंत चालले आहे. यावर्षी सुभेदार दादाजी कोंडदेव यांना देवाज्ञा झाली म्हणून महालीचे कारकून नवीन खुर्दखत आणा असा आक्षेप घेतात. तरी कृपा करून हे इनाम चालू ठेवण्याची आज्ञा व्हावी. हि सर्व विनंती शिवाजीमहाराजांना या पत्रात उद्धृत केली आहे आणि गतवर्षीपर्यंत ज्याप्रमाणे हे इनाम चालत आले आहे, त्याप्रमाणे पुढे हि चालू ठेवावे असा हुकुम केला आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ जुलै १६५९ गोव्याच्या किल्ल्यातील दालनात वाचले गेलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र- छत्रपती शिवाजीराजांचे दंडयाच्या सिद्दी व त्या बंदरातील हबशी (सिद्दीची प्रजा) यांच्याशी वितुष

जगनाल

Image
🛑 जगनाल हे जगनाल नावाचे शस्त्र आहे. याचा वापर प्रामुख्याने चिलखत भेदण्यासाठी केला जात होता. हे शस्त्र शिवपुर्व काळातील आहे. हे शस्त्र चिलखत भेदण्यासाठी चे असरदार शस्त्रा पैकि एक आहे. हे विशिष्ट पोलादाचे बनवलेले असे.चिलखतवर तलवार चालत नाही.ना भाला,बाण याने ही म्हणावा असा आघात होत नाही. म्हणून खास चीलखत भेदण्यासाठी काही शस्ञांची विशिष्ट बनावट असते त्यापैकी हे एक जगनाल 9146889612

१४ जुलै १६७४"बहादूरखान कोकलताश" याच्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. राजाभिषेकानंतर प्रथमच १ कोटींची एवढी प्रचंड लूट मराठ्यांनी रायगडावर जमा केली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १४ जुलै १६५९ सोनोपंत डबीर दिल्लीहुन स्वराज्यात परत त्यासुमारास स्वराज्यावर अफजलखानाचे संकट घोंघावत होते. महाराज नुकतेच जावळीला आले होते. इस १६५७ मधे शिवाजीराजांनी मुघलांच्या ताब्यातील जुन्नरवर अचानक हल्ला करून औरंगजेबाला धक्का दिला होता खरा मात्र, त्याविरुद्ध काही तोडगा काढण्याआधीच औरंगजेबाला सत्तासंघर्षासाठी दिल्लीच्या दिशेने जावे लागले.  भाऊ आणि इतर प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढुन व बाप शहाजहानला कैदेत टाकुन निश्चिंत होऊन औरंगजेब ५ जून १६५९ रोजी थाटामाटात दिल्लीच्या गादीवर बसला. त्याप्रसंगी राजकारणाचा भाग म्हणून महाराजांतर्फे नजराणा घेऊन सोनोपंत दिल्ली दरबारात उपस्थित होते. त्यांनी तो औरंगजेबाला पेश केला त्याबदल्यात औरंगजेबानेही महाराजांना देण्यासाठी पोशाख व फर्मान सोनोपंतांना दिले. फर्मानात 'इकडील लोभ आपणावर पूर्ण आहे असे जाणून असावे' असे नमूद होते.  अफजलखानाचे प्रचंड संकट आले असताना किमान मुघलांच्या आघाडीवर शांतता होती हे तस बरच झाल मात्र, ही केवळ तात्पुरती व वरवरची गोडीगुलाबी होती हे पुढच्या काही महिन्यांतच सिद्ध झाल

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳१२ जुलै १६६०छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडच्या वेढ्यातून निसटलेछत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाहून निघाले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ जुलै १६५९ स्वराज्यावर चालून आलेला "अफझलखान" हा मलवडीहून "वाई" येथे दाखल झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ जुलै १६६० छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडच्या वेढ्यातून निसटले छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाहून निघाले. रात्री दहाचा सुमार होता. आषाढी पौर्णिमेची ही रात्र होती. (दि.१२ जुलै १६६०) पण चंद्र काळ्याकुट्ट ढगांच्या आड लोपला होता. महाराज पालखीत बसलेले होते. पालखी मावळ्यांनी उचलली. महाराजांसोबत होते "हिरडस मावळ" मधील "बांदल सेना". त्या बांदल सेनेचे नेतृत्व करत होते "बाजी बांदल" आणि "रायाजी बांदल" सोबत बाजीप्रभू, शंभुसिंह जाधवराव होते. ६०० मावळेही निघाले. आणी एक रिकामी पालखीही निघाली. पाऊस, वादळ, विजा अखंड चालू होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. सिद्दी जौहरची छावणी पूर्णपणे गाफील बनलेली होती. शिवाजी उद्यांच शरण येणार आहे ! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा ? करा उबदार आराम ! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेव

१० जुलै १६५९महाराज जावळी येथे आले.महाराज आपल्या खास रक्षक दलासह व प्रमुख अधिकाऱ्यांसह जावळी येथे आले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० जुलै १६५९ महाराज जावळी येथे आले. अफजलखानाने स्वराज्यात धुमाकूळ मांडला होता. मावळ खोऱ्यातील निष्पाप प्रजा अफजलखानाच्या सैनिकांच्या टापाखाली भरडली जात होती. कुठेतरी महाराज प्रजेवरच्या अन्यायाची देवदेवतांच्या विटंबनेची चीड येऊन, उघड्या मैदानात येतील यासाठी अफजलखान हे सर्व जाणिवपूर्वक घडवून आणत होता. अफजलखानाच्या करतुदींची इत्यंभूत माहिती हेरांकरवी महाराजांना रोज कळत होती. महाराज आपल्या खास रक्षक दलासह व प्रमुख अधिकाऱ्यांसह जावळी येथे आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १० जुलै १६८३ छत्रपती संभाजी महाराज राजापुरास!  चौल किंवा चेऊल म्हणजे सध्याच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात असून रेवदंडा त्यांचाच एक भाग आहे. रेवदंडा कोटास आगरकोट असेही म्हणतात. या प्रदेशावर पोर्तुगीज सत्ता होती. धर्माच्या बाबतीत अत्यंत कडवे असलेल्या या पोर्तुगिजांचा जाच हा होताच त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी या भागावर हल्ला करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज राजापुरास आले. छत्रपती संभाजी महाराज स्वार होऊन राजापुरास गेले. फिरंग्यांशीही बिघाड केला.

९ जुलै १६५५छत्रपती शिवरायांनी पुरंदर किल्ल्याची जबाबदारी सरसेनापती नेताजी पालकर यांना सोपवली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ९ जुलै १५८३ पोर्तुगीज सैन्य कुकल्ली गावच्या हद्दीत शिरले. १५८२ कॅप्टन फिगेरे दों हा पोर्तुगीज आधिकारी तहाचा प्रस्ताव घेऊन कुकल्लीकरांकडे आला. ते एकून ५ जण होते आणि निःशस्त्र होते. कॅप्टन फिगेरेदला मोडकीतोडकी कोकणी भाषा अवगत होती. आपल्या लाघवी बोलण्याने कुकल्लीकर हिंदू पुढाऱ्यांची मने काबीज करण्यात तो यशस्वी झाला. ठरलेल्या दिवशी कुकल्लीकर हिंदुंचे १६ पुढारी पोर्तुगिजांशी सलोख्याच्या पुढील वाटाघाटी असोळण्याच्या कोटांत करण्याचे ठरवून, मात्र पोर्तुगिजांनी विश्वासघाताने या सर्वांना हालहाल करून ठार मारले. त्यातील कानू नाईक या पुढाऱ्याच्या अंगात विरश्री संचारून त्याने तटावर चढून साळ नदीत उडी टाकून अदृश्य झाला. काळू नायकाने असोळणेच्या कोटात घडलेला प्रसंग आपल्या भाऊबंधूंना विदीत केला. पाद्री यांची तुकडी आणि पोर्तुगीज सैन्य कुकल्ली गावच्या हद्दीत शिरले. त्यांनी "भिवसा" येथील शंभु महादेव मंदिर आणि "असणी कट्टा" येथील श्रीरामाच्या देवळा समोरील तलाव भ्रष्ट केले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ९ जुलै १६५५ छत्रपती शिवरायांनी

४ जुलै १६७२"छत्रपती शिवराय" आणि "छत्रसाल बुंदेला" यांची भेट.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ जुलै १६५० ४ जुलै १६५० च्या चौलच्या पोर्तुगीज टपालपत्रात अफजलखानाला चौलचा मोकासा मिळाला असून त्याने तिथली सर्व हिंदू मंदिरे पाडल्याचा उल्लेख आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ जुलै १६६९ महाराजांनी सर्जेराव जेधे (बाजी) यांस फटकारले. आवश्यक तिथे जिजाऊसाहेब व महाराज फटकारायलाही मागे पुढे पाहत नव्हते. कान्होजी नाईक जेधे यांच्या महानिर्वाणानंतर त्यांचे पुत्र वाटणीसाठी आपसांत भांडू लागले. कान्होजींनी करून ठेवलेल्या मृत्यु- पत्रानुसार वर्तावे असे महाराजांनी सर्वांना समजावून सांगितले. पण बाजी जेधे यांचे समाधान होईना. त्यामुळे त्यांचे भावांशी मधून मधून खटके उडत. इ.स.१६६९ पावसाळ्यात पेरणीच्या ऐनवेळी बाजी जेधे यांनी सिवजी जेधे यांच्या विरुद्ध महाराजांकडे तक्रार केली. तेव्हा त्याचा कांगावा लक्षात घेऊन महाराजांनी बाजी सर्जेराव जेधे याला चांगलेच फटकारले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ जुलै १६७२ "छत्रपती शिवराय" आणि "छत्रसाल बुंदेला" यांची भेट. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ जुलै १७१९ श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई राजधानीत दाखल... तब्बल २९ वर