१० जुलै १६५९महाराज जावळी येथे आले.महाराज आपल्या खास रक्षक दलासह व प्रमुख अधिकाऱ्यांसह जावळी येथे आले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१० जुलै १६५९
महाराज जावळी येथे आले.
अफजलखानाने स्वराज्यात धुमाकूळ मांडला होता. मावळ खोऱ्यातील निष्पाप प्रजा अफजलखानाच्या सैनिकांच्या टापाखाली भरडली जात होती. कुठेतरी महाराज प्रजेवरच्या अन्यायाची देवदेवतांच्या विटंबनेची चीड येऊन, उघड्या मैदानात येतील यासाठी अफजलखान हे सर्व जाणिवपूर्वक घडवून आणत होता. अफजलखानाच्या करतुदींची इत्यंभूत माहिती हेरांकरवी महाराजांना रोज कळत होती. महाराज आपल्या खास रक्षक दलासह व प्रमुख अधिकाऱ्यांसह जावळी येथे आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१० जुलै १६८३
छत्रपती संभाजी महाराज राजापुरास! 
चौल किंवा चेऊल म्हणजे सध्याच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात असून रेवदंडा त्यांचाच एक भाग आहे. रेवदंडा कोटास आगरकोट असेही म्हणतात. या प्रदेशावर पोर्तुगीज सत्ता होती. धर्माच्या बाबतीत अत्यंत कडवे असलेल्या या पोर्तुगिजांचा जाच हा होताच त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी या भागावर हल्ला करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज राजापुरास आले. छत्रपती संभाजी महाराज स्वार होऊन राजापुरास गेले. फिरंग्यांशीही बिघाड केला. रेवदंडा कोट यांसी वेढा घातला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१० जुलै १६८७
चिक्कदेवरायने हरजीराजे महाडिक यास कासीमखान विरुध्द आपल्या मदतीस बोलावून खानास पळवून लावले. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१० जुलै सन १७०३
दिनांक १० जुलै सन १७०३ रोजी बादशहाने दिवाणे खास भरविला होता. त्या वृत्तांतात  शाहूराजांची ची मनसबदारी काय दर्जाची होती हे अखबरीतील खालील नोंदीवरुन दिसून येते.
बादशहाने आज दिवाणे खास भरवला आणि
दिवाणे खासचा दारोगा {व्यवस्थापक } हमीदोद्दीनखान बहादूर यास बादशहाने आपल्यासमोर यादी ठेवण्यास सांगितली.

ती यादी पुढीलप्रमाणे -
१} उम्दतुलमुतक - अमीर उलूउमरा असदखान {मुख्य प्रधान} 
२} बक्षीउलुमुतक - रुहुल्लाखान 
३} बक्षीउलुमुतक - सदरुद्दीन मुहंमदखान 
४} मतलबखान 
५} हाजी मुहंमद अलिखान 
६} मन्सूरखान 
७} राजा शाहू 
८} हमीदोद्दीन खान बहादुर 
९} इनायत उल्लाखान 
१०} अब्दुल रहीमखान
११} रशीदखान 
१२} शादी खान 
१३}वाकर खान 
१४ ) मुजीम खान 
चौदा जणांचा समावेश असलेल्या या दिवाणे खास च्या यादी मध्ये शाहू राजांचा क्रमांक बराच वरचा दिसून येतो. यातील महत्वपूर्ण बाब म्हणजे शाहूराजे यासमयी बादशहाच्या कैदेत होते.
याचाच अर्थ शाहू राजांशिवाय दख्खनेतील राज्यविस्तार, अंमल किंवा जे काही असेल ते करणे औरंगजेबास शक्य नसावे. अन्यथा त्या क्रुर धर्मांधाने शाहू राजांना इतका मोठा सन्मान दिलाच नसता.
यावरूनच स्वराज्याच्या महाराणी येसूबाईसाहेब व शाहू माहाराज यांची अनन्यसाधारण योग्यता व महत्व अधोरेखित होते. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१० जुलै १७३५
जनार्दन बाजीराव पेशवेचा जन्म
थोरल्या बाजीरावसाहेबांना एकूण चार मुलं झाली. नानासाहेब, रामचंद्र, राघोबा, जनार्दन. रामचंद्र व जनार्दन अल्प वयातच वारले. रामचंद्राचा जन्म १७२३ साली झाला व दहा वर्षांचा होऊन तो १७३३ साली वारला. जनार्दनाचा जन्म १० जुलै १७३५ रोजी झाला व तो ३१ सप्टेंबर १७४९ रोजी वारला. म्हणजे मृत्यूसमयी तो चौदा वर्षांचा होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१० जुलै १७६३
मीर जाफर आणि ईस्ट इंडिया कंपनी ह्यांच्यामध्ये तह
प्लासीची लढाई ज्या मीर जाफरने जिंकवून दिली त्याला रॉबर्ट क्लाईव्हने १७५७ मध्ये बंगालचा नवाब बनवले. पुढे १७६० मध्ये त्याच्याशी वितुष्ट आल्याने त्याचा जावई मीर कासीमला नवाबपद दिले. हा मीर कासीम आधी इंग्रजांच्या मर्जीतला होता पण पुढे त्याच्या महत्त्वाकांक्षा वाढू लागल्या. त्यामुळे इंग्रजांनी १७६३ मध्ये त्याला पदच्युत केले आणि पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिले. १० जुलै १७६३ ला मीर जाफर आणि ईस्ट इंडिया कंपनी ह्यांच्यामध्ये एक तह झाला ज्याद्वारे त्याने बुर्दवान, मिदनापूर, आणि चितगावचे परगणे त्याने इंग्रजांना खर्चासाठी तोडून दिले, फक्त मीठावरचा २.५ टक्के कर सोडून त्यांना सगळा कर माफ करून टाकला, फ्रेंचांना कोणत्याही प्रकारची जमीनदारी देणार नाही हे लिहून दिले आणि हे सर्व कमी की काय म्हणून ३० लाख रुपयांचा युद्धखर्च इंग्रजांना द्यायचे कबूल केले. 
ईस्ट इंडिया कंपनीचे वार्षिक ऑडीट होत असे आणि त्यात त्यांना ह्या सगळ्या रुपयांची पौंडात किंमत सांगावी लागत असे. ह्या Annual Register मध्ये एक लाख रुपये म्हणजे साधारण साडेबारा हजार पौंड हा दर दिलेला आहे. म्हणजे १७६३ मध्ये एका ब्रिटिश पौंडाची किंमत साधारणपणे ८ भारतीय रुपये मानली जात होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१० जुलै १७७८
पुणे दरबारने फ्रेंचांशी संगनमत केलेले इंग्रजास आवडले नाही. इंग्रजास असे वाटू लागले की, फ्रेंचांच्या मदतीने पुणे दरबारने आपणास हुसकून लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. तेव्हा राजकारण सिद्धीस जाण्यापूर्वीच श्रीमंत दादासाहेबास पुण्याच्या गादीवर आणून स्थापावे. आपल्या पसंतीचे कारभारी मंडळ आणवावे व फ्रेंचांचे पाऊल मराठी दौलतीत कधीही न शिरकेल असा पक्का बंदोबस्त करावा असा मुंबई कौन्सिलने विचार केला व तो हेस्टींग्ज यास कळविला. गव्हर्नर जनरल हेस्टिंग्जला हा बेत पसंत पडून त्याने मुंबईकरांच्या कुमकेस बुंदेलखंड, माळवा व नेमाड
मार्गाने ६ पलटणे रवाना केली. फ्रेंचांचे पाय मलबार किनाऱ्यावरून ओढावे व त्यांचे मराठे दरबारी असलेले
महत्त्व पार नाहीसे करावे हा हेतू मनात धरून त्याने फ्रेंच वसाहती व मराठे याजविरुद्ध युद्ध पुकारले. फ्रेंचांचे चंद्रनगर १० जुलै १७७८ ला काबीज केले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

१० जुलै १८१५
इ. स. १८१५ च्या आषाढ महिन्यात विठ्ठलाच्या दर्शनासाठी बाजीराव (दुसरे) पेशवे पंढरपूरला गेले. त्यांनी गंगाधरशास्त्री पटवर्धनांनाही आग्रह केल्यामुळे त्रिंबकजी डेंगळे आणि शास्त्रीबुवा पंढरपूरला गेले. यावेळेस पंढरपुरात प्रचंड गर्दी होती. दि. १० जुलै १८१५ या दिवशी रात्रीच्या वेळेस मंदिरात कीर्तन ऐकून पुन्हा मुक्कामावर जात असतानाच मंदिराजवळच्या एका बोळात काही अज्ञात मारेकरी घालून शास्त्रीबुवांचा खून करण्यात आला. शास्रीबुवांच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी ही इंग्रजांची, पर्यायाने एलफिन्स्टनची असल्यानेच त्याने ताबडतोब पेशव्यांकडे चौकशी अन् तपास करण्याची मागणी केली आणि पेशव्यांचा तपास पूर्ण व्हायच्या आतच 'शास्त्रीबुवांच्या खुनाच्या वेळी त्रिंबकजी तिथे होता' असा आरोप करून एलफिन्स्टनने त्रिंबकजी डेंगळ्यांच्याच अटकेची मागणी केली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

१० जुलै १८२६
सरदार हणमंतराव निंबाळकर यांना छत्रपती बुवासाहेब महाराजांनी "सरलष्कर" पद देण्याचे ठरविले. यासाठी महाराजांनी १० जुलै १८२६ रोजी एक खास समारंभ घडवून आणला. या समारंभावेळी भरलेल्या छत्रपतींच्या दरबाराचे तपशीलवार वर्णन इतिहासात आढळते, ते पुढीलप्रमाणे,

"कचेरी जाहली. त्यास हुजूरचे स्वारीची (छत्रपती महाराजांची) गादी उत्तराभिमुख समोर घातली होती. दुघई सोपा लांबी उत्तर - दक्षिण आहे. त्यात पूर्वेच्या बाजूने सोप्यात सदर होती. तेथे दोन्ही बाजूंस भले लोक, मानकरी बसले होते. पश्चिमेचे बाजूस पूर्वेकडे तोंड करुन मानकरी, भले लोक बसले होते. सदरचे पूर्वेस दुघई सोपा आहे. त्यात कारकून मंडळी होती. उत्तरेचे बाजूचे सोप्यात मानकरी होते. छत्रपतींची स्वारी सर्व मानकरी कचेरीत येऊन बसल्यावर मागाहून येऊन सदरेवर बसली. यानंतर भालदाराला आज्ञा करण्यात आली. हणमंतराव निंबाळकर बहाद्दर यांस घेऊन या. भालदाराने निंबाळकरांना बोलावून आणले. निंबाळकर जोहार करुन उजव्या बाजूस जागा राखून ठेवली होती तेथे जाऊन बसले. निंबाळकर आपल्या जागी बसल्यावर महाराजांच्या आज्ञेवरुन राजश्री हैबतराव गायकवाड विश्वासराव हे सणगाचा सरपोस व तरवार पडदाने घेऊन आले. राजश्री सदाशिवराव जोती दिवाण हे जवाहिराचे तबक शिक्केकटारीचा ताम्हण घेऊन सरपोस घेऊन झाकून आले. नंतर सरकारांची आज्ञा निंबाळकर यांस येण्याविषयी झाली. त्याप्रमाणे ते पुढे आले आणि जोहार करुन उभे राहिले. नंतर सरपोसातील तिवट काढून गायकवाड विश्वासराव यांनी सरकारचे हातात दिले. छत्रपतीने ते निंबाळकर बहाद्दर यास देऊन बसण्याविषयी आज्ञा केली. त्याप्रमाणे ते बसले आणि तिवट बांधिले. त्यावेळी त्यांना सरलष्करीची वस्त्रे जवाहीर जरीपटका हत्तीसुद्धा आणि शिक्केकट्यार वगैरे देणग्या देण्यात आल्या."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१० जुलै १९२९
भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांच्यावर चालविल्या जाणाऱ्या खटल्याला 'लाहोर कट खटला' असे संबोधण्यात येऊ लागले. १० जुलै १९२९ पासून बॅरिस्टल तुरूंगातच खटल्याचे कामकाज सुरू झाले. तत्पूर्वी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांचे कैदेतले जीवन अतिशय घाणेरडे होते आणि कैद्यांना दिली जाणारी प्राण्यांसारखी वागणूक भगतसिंगला सहन होण्यासारखी नव्हती यासाठी त्यांनी हे प्रकरण हातात घ्यायचं ठरवलं. याच्यावर उपाय म्हणून भगतसिंग यांनी मियाँवाली तुरूंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी बोस्टल तुरूंगात १५ मार्च १९२९ पासून उपोषणाला सुरवात केली. हे उपोषण तब्बल ११६ दिवस चालले. यापूर्वीचा आयरिश क्रांतीकारकांचा ९७ दिवसांचा उपोषणाचा विक्रमहि या दोघांनी मोडला होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४