२२ नोव्हेंबर १६५६छत्रपती शिवरायांचा मसुरवर हल्ला२२ नोव्हेंबर १६५६ च्या एका फर्मानात शिवरायांच्या मसूरवरील छाप्याचा उल्लेख सापडतो
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ नोव्हेंबर १६५६ छत्रपती शिवरायांचा मसुरवर हल्ला २२ नोव्हेंबर १६५६ च्या एका फर्मानात शिवरायांच्या मसूरवरील छाप्याचा उल्लेख सापडतो. आदिलशाही सरदार मुहम्मद इखलासखानला हे फर्मान मिळाले होते. त्याला कर्नाटकाचा सुभेदार नेमले होते व शिवरायांच्या त्या भागातील हलचालींवर पायबंद घालायचा आदेश त्याला दिला होता. आदिलशाहीतील घडामोडींच्यावेळेचा शिवरायांच्या हलचालींबाबतचा हा सगळ्यात जुना संदर्भ आहे. मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या आदिलशाहीतील कलहाबद्दल शिवरायांना बहुतेक कल्पना होती. वरील फर्मान मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर आठरा दिवसांनी लिहीले आहे. त्यामुळे आदिलशाहीतील अस्थिरतेचा लाभ घेऊन शिवरायांनी मसूरवरील छापा घातला असावा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ नोव्हेंबर १६६५ किल्ले पुरंदरच्या ऐतिहासिक तहामध्ये ठरल्याप्रमाणे विजापूरच्या मोहीमेसाठी छत्रपती शिवराय मुघलांकडून लढण्यासाठी "मिर्झाराजे जयसिंग" यांच्या छावणीत दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ नोव्हेंबर १६८७ गोवळकोंड्याची कुतुबशाही जिंकून घेतल्यावर औरंगजेबाने त्या राज्यातील जो भाग