२६ नोव्हेंबर १६७०बागलाणची मोहिमदुसऱ्या सुरत मोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज बागलाण प्रांतावर निघाले.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ नोव्हेंबर १६२९
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजी, जिजाबाई यांच्या सासूबाई उमाबाईसाहेब या बहुधा यावेळी येथे असाव्यात असे वाटते त्यांनी फक्त ३ महिनेपूर्वी वेरुळच्या घृष्नेश्वराची अभिषेकपूजा तिमनभट शेडगे यांस सांगून त्याबद्दल नेमणूक करून दिली त्यावरून आजीने येथे आपल्या नातवाचे आपल्या मांडीवर कौतुक केले असावे असे मानतात, तर्क आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ नोव्हेंबर १६६४
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये कल्याण भिवंडी जिंकून कल्याणच्या खाडीत आपल्या आरमाराची स्थापना केली. पुढच्या काळात या आरमाराने परकीय सत्ताना समर्थपणे टक्कर देऊ शकेल अशी प्रगती केली होती. महाराजांच्या वाढत्या आरमारी सामर्थ्याने त्याकाळी अनेक अफवा पसरत होत्या. फेब्रुवारी १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथमच आरमारी जहाजातून प्रवास करत बसरूर वर स्वारी केली होती. पण त्यापूर्वीच इंग्रजांच्या पत्रातून महाराजांच्या आरमारी सामर्थ्याचे दर्शन घडत होते. ते असे,
"शिवाजी विजयी आणि अनिर्बंध असून त्याचे सामर्थ्य रोज वाढत असल्याने सभोवतालीच्या राजांना त्याची मोठी दहशत वाटते.त्याने आता ८० जहाजे सुसज्ज करून भटकळकडे पाठवली आहेत आणि स्वतः खुष्कीच्या मार्गाने जाऊन त्यांना मिळावे असा त्याचा बेत आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ नोव्हेंबर १६७०
बागलाणची मोहिम
दुसऱ्या सुरत मोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज बागलाण प्रांतावर निघाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ नोव्हेंबर १६७९
मराठ्यांचा खांदेरी बेटावरील एक मुसलमान सैनिक सिद्द्याने फितवून नेला व त्याकडून सिद्दीने बरीचशी माहिती मिळवली. सिद्द्याने ही माहिती केग्वीनला दिली व हल्ल्याची तयारी करण्याविषयी सांगितले. याबाबत केग्विनने मुंबईला कळवलेला वृत्तांत असा होता. -
“सिद्दी आपले पठाण घेवून उतरल्यास आपले बेट जाईल असे म्हटल्यामुळे मराठे त्यावर चिडले आणि मराठ्यांनी त्याला कडक शिक्षा देवू असे सांगितल्यामुळे तो घाबरला आणि सिद्दीला जाऊन मिळाला असे त्या इसमाने सांगितले. त्याने दिलेल्या माहितीनुसार मराठ्यांकडे सुमारे ६ खंडी (१३६० किलो) बंदुकीची दारू, १००० तोफगोळे, १२ तोफा, ३०० तलवारबाज व २०० बंदुकधारी आहेत. खांदेरीवर ४ विहिरी असून त्यावरील पाणी अत्यंत कमी आहे, इतके की ते पाण्यात उतरून ओंजळीने पाणी भरतात. शिबंदी बेट सोडायला तयार आहे परंतु मायनाकने त्यांना दम भरला आहे की ‘हे छत्रपती शिवाजी महाराजांचे काम आहे आणि किल्ला पूर्ण होण्या आधी जर कुणी बेट सोडेल तर मायनाक बायका-मुलांसह सर्वांची डोकी मारीन’ आणि त्यामुळे सर्व लोक भयभीत आहेत. शिबंदी बरीचशी आजारी आहे तसेच दौलतखान ८ गलबत भरून रसद तयार ठेवून असुन तो लवकरच ते सामान बेटावर पुरवणार आहे”
मराठ्यांची माहिती मिळाल्यावर सिद्दीने स्वतःचा डाव आखला आणि त्याने इंग्रजांना सांगितले की माझ्या आरमारातील बरीच गलबते अजून सुरतेहून येत असून त्यात बरीचशी लहान गलबते आहेत. मराठे खाडीतून निघून ज्यावेळी बेटाला पुरवठा करतील तेव्हा त्यांना न अडवता जाऊ द्यावे व इंग्रजांनी मोठी गलबते घेवून त्यांचा पाठलाग करावा त्यावेळी मी माझी लहान गलबते माणसांनी भरून त्वरेने दुसऱ्या बाजूने येईन आणि माणसे बेटावर उतरविन. त्यानंतर तुम्ही देखील शक्य तेवढे सैन्य बेटावर आणण्याचा प्रयत्न करा आणि दरम्यान मराठ्यांच्या नौकांना थोपवून धरा. माझे सैन्य बेटावरील शिबंदी कापून काढेल आणि बेटावर झेंडा लावेल मग आपण आपले सर्व सैन्य बेटावर आणावे. हा डाव इंग्रजांना नकोसा होता कारण याने बेट आयतेच सिद्दीला मिळणार होते आणि इंग्रजांना ज्याप्रमाणे मराठे मुंबईच्या जवळ नको होते त्याप्रमाणे त्यांना हा जंगली सिद्दी देखील नको होता. म्हणून केग्विनने मुंबईला अनुकूल तह करावा असा पाठपुरावा मुंबईला केला. यादरम्यान सिद्दीने आपली जवळ जवळ १००० माणसे उंदेरी बेटावर उतरविली आणि तिथे किल्ला बांधण्यास सुरुवात केली. २६ जानेवारी च्या पहाटे दौलतखान आपले संपूर्ण आरमार घेवून उन्देरीवर चालून आला व मोठे युद्ध सुरु झाले याच दरम्यान रसदेने भरलेल्या २० होड्या खांदेरीला गेल्या. इंग्रज आणि मराठे यांचे वकील तहासाठी बराच कथला करीत होते आणि उभाय्पाक्षांना मान्य होईल अशी तहाची कलमे करण्यात ते व्यस्त होते. छत्रपती शिवाजीराजांच्या वतीने चौलचा सुभेदार हे प्रकरण सांभाळीत होता. त्याच्या सोबत सुरनवीस अण्णाजी दत्तो यांना पाठवण्यात आले होते. इंग्रजातर्फे राम शेणवी दुभाषी व मध्यस्थीचे काम करीत होता व निर्णय मुंबई व सुरत दोन्हीकडील अधिकारी मिळून घेत होते. दिनांक २८ जानेवारीला उभय पक्षांना यश आले आणि तहाची कलमे ठरली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ नोव्हेंबर १६८३
छत्रपती संभाजी महाराज व पोर्तुगीज यांचे युद्ध चालू होते पोर्तुगीजांपाशी सैन्य कमी होते अशा परिस्तिथीत दरवर्षी पोर्तुगालला गलबत पाठवायचे की नाही नाही, त्यासंबंधी ठराव आजच्या दिवशी व्हाइसरॉय ने आज राज्य सल्लागारकडे मांडला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ नोव्हेंबर १६८३
छत्रपती संभाजी महाराजांनी गोवा मोहीम आवरती घेतली
पुन्हा मोठा पराभव पत्करून, पळ काढीत, व्हाईसरॉय गोव्यात आला, त्यासमयी राजधानीची परिस्थिती अशी झाली होती, ह्याचे सुरेख वर्णन, पोर्तुगीज कागदपत्रांच्या आधारे सरदेसाई यांनी केले आहे, सरदेसाई म्हणतात, "इकडे व्हाईसरॉयने जुवे बेटातून पळून शहरात प्रवेश केला, तेव्हा शहरात सर्वत्र घबराट माजल्याचे त्याला आढळून आले, सैनिकांचा धीर प्रचंड खचला होता, ते मराठ्यांशी लढण्याच्या मनस्थितीत नव्हते, ते पाहताच व्हाईसरॉयही गर्भगळीत
झाला.
खाडीला पाणी खूप प्रमाणात वाढले होते, पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी तेथूनच दि.२६ नोव्हेंबर १६८३ ला परत फिरले. पुढे खरतर गोवा घेण्याचा बेत होता, परंतु शहा आलम कोकणातून गोव्याच्या दिशेने चालून येत होता , त्यामूळे राजांना मोहीम आवरून येणे बंधनकारक होते , आणि पुढे मराठा - पोर्तुगीज यांमध्ये तह झाला
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२६ नोव्हेंबर १७३८
चिमाजी अप्पा वसई मोहिमेवर निघाले
वसईचा किल्ला म्हणजे स्थानिक तथा आसपासच्या परिसरातील हिंदूंचे धर्मांतरण करण्याचा अड्डा बनला होता. येथील पोर्तुगीज ख्रिश्चन मिशनरी वेगळीच खेळी खेळत होते. प्रत्यक्ष युध्द न करता वसई प्रांतातील हिंदू समाजातील कोळी, भंडारी, आगरी, कुणबी, ब्राह्मण, महार, मांग आदी लोकांना पकडून वसईच्या किल्यात आणून त्यांचे धर्मांतरण करण्यासाठी अनन्वित छळ करीत. धर्मांतरण झाले ख्रिश्चन धर्म स्विकारला की सोडून देत. अशाप्रकारे जबरदस्तीने धर्मप्रसार करून राज्य विस्तार करण्याचा पोर्तुगीजांचा डाव होता. ह्या सर्व गोष्टींनी परिसीमा गाठली होती. यासंबधी अणजूरकर नाईक मंडळींनी पेशवे दरबारात वारंवार पोर्तुगीजांबद्दल तक्रार केली होती. परंतु उत्तरेकडील राजकारणाच्या धामधुमीत वसई मोहीम लांबत होती.
उत्तरेकडील राजकारणातून किंचित उसंत मिळताच चिमाजीअप्पांनी पोर्तुगीज गव्हर्नरला जबरदस्त दम देणारा खरमरीत निरोप पाठवला. तो असा - "जर तुमचे हे धर्मांतराचे प्रकार थांबले नाहीत, तर मराठे थेट किल्यात घुसतील. मग तुमच्या चर्चच्या घंटानादाचे ध्वनी आमच्या देवळात गुंजतील."
हा निरोपवजा दम सत्तेच्या मदमस्त माजात पोर्तुगीज गव्हर्नरने दुर्लक्षित केला. परिणामी अवघ्या काही काळात मराठ्यांनी फिरंग्यांना असा काही मराठी हिसका दिला की वसईच काय जवळपास संपूर्ण उत्तर फिरंगाणातून पोर्तुगीजांना अल्पावधीतच गाशा गुंडाळून गोव्यास पळावे लागले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment