१७ नोव्हेंबर १६६७छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीजांकडे आपला वकील पाठवला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१७ नोव्हेंबर १६६७
छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीजांकडे आपला वकील पाठवला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१७ नोव्हेंबर १६७९
मुंबईकर सूरतेला १७ नोव्हेंबर १६७९ ला
लिहितात :
"आमची ' डोव्ह" नावाची गुराब शत्रूच्या हाती सापडली. तीवर ६ रांगा शिपाई, अंमलदार, वगैरे होते. त्यांत २० जण युरोपीय होते. त्यांची भरती होणे अशक्य आहे. शिवाय तीवरील तोफा आता खांदेरीवरुन आमच्यावरच रोखल्या जात आहेत याचा विचार करुन दुसऱ्या गुराबा अशाच हाती लागू नयेत म्हणून मदती करितां दुसरी शिबाडे व एक तिरवटी तारु पाठविले.... ह्या प्रकरणाचा निकाल करण्याबद्दल तुमचे विचार कळले. आम्हीच बोलणे करण्याकरिता इसम पाठविला, तर खांदेरी न सोडतां मध्यंतरीच्या काळांत तो तटबंदी पुरी करुन तेथेच तो जबरदस्त होऊन बसेल. मुंबईच्या व्यापाराला व वसातीला त्रासदायक होईल; आणि मुंबई बेट या त्रासामुळे ओसाड पडेल.... पोर्तुगीजांनी सर्व तर्हेने आपल्याशी मित्रत्त्व दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या मुलुखांतून जाण्यास बंदी करुन स्वतः बंदोबस्त करुन शिवाय आमची शिबाडे मचवा बंदोबस्ताकरितां आपल्या हद्दीत राखून व लागेल ती सामग्री विपुल व स्वस्ताईने देऊन आम्हांला मदत केली आहे.

मुंबईकर केज्विनला १७ नोव्हेंबर १६७९ ला हुकूम करितात:

" आज तोफांचे आवाज ऐकिले. बहुधा ते बेटावरील असावेत. सिद्दीची गलबते किनाऱ्याजवळ जातील तेव्हा त्यांचे काय चालते इकडे लक्ष न देता, प्रसंगी सावध रहावे अशा बेताने आपली गलबते जुटीने ठेवा. कालांतराने सामुग्रीच्या तुटवड्यामूळे त्यांचे हाल चालू झाले म्हणजे सिद्दीच्या ताब्यात जाण्यापेक्षा ते तुमच्याच स्वाधीन होतील."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१७ नोव्हेंबर १७१३
दिनांक १७ नोव्हेंबर सन १७१३ रोजी बाळाजी विश्वनाथ यांची पेशवा पदी नियुक्ती.
पेशवा पद दिनांक १९ जून सन १७१३
ते दिनांक १६ नोव्हेंबर सन १७१३ पर्यंत रिक्त.
दरम्यानच्या काळात बाळाजी विश्वनाथ यांचे फौजेचे वळण चांगले असल्याने बाळाजी विश्वनाथ यांना पेशवा पद देण्याविषयी अंबाजीपंत पुरंदरे आणि प्रतिनिधी यांची छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे शिफारस.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१७ नोव्हेंबर १७९१
१७९१ च्या दरम्यान मेवाडातून पुण्यात येत असता, उदेपुरकर राणाजीच्या राज्यात बंदोबस्त नसल्याचे महादजी शिंदे यांना आढळले, उमराव लोक आपापला जमाव करून इथे राहतात, रयतेची पिळवणूक करतात हा प्रकार सर्रास घडत असे. यावेळी चित्तोडगढचा किल्ला भीमसिंगाकडे होता. आपल्याच मोठेपणाची मग्रुरी चढलेला भीमसिंग राणाजी यांच्या मर्जीत राहिला नव्हता. तेव्हा राणाजी महादजींच्या भेटीला आले, चित्तोडगढचा बंदोबस्त करावा यासंदर्भातील बोलणी केली.

पुढे राणाजींसोबत महादजी चित्तोडगढ नजीक येऊन छावणी देऊन राहिले, यावेळी किल्ल्यावरून भीमसिंगाकडून मराठा छावणीवर तोफगोळे चालविण्यात आले, त्यामुळे भीमसिंगाचा समाचार घेण्यासाठी सज्ज होऊन महादजी यांनी किल्ल्याला तोफा लावल्या. तोफांच्या माऱ्याने घाबरा झालेला भीमसिंग तहासाठी लगेचच शरण आला आणि 
"गड मे गड चितौड गड बाकी सब गढीया" अशी ख्याती असणारा हा गड महादजी शिंदे यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी अवघ्या १२ दिवसात हा गड १७ नोव्हेंबर १७९१ रोजी किल्ला घेतला...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१७ नोव्हेंबर १८१७
हिंदवी स्वराज्याचे निशाण शनिवारवाड्यावरून
हटवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकला. आणि तेथेच
लहुजींनी इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्याची शपथ
घेतली. लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या
वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘जगेन तर देशासाठी
आणि मरेन तर देशासाठी ’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा
करून आपल्या वडिलांची समाधी (थडगे) उभारली. ही
समाधी अजूनही ‘वाकडेवाडी’ येथे आहे

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१७ नोव्हेंबर १९२८
’पंजाब केसरी’ लाला लजपतराय स्वातंत्र्यसेनानी यांचा मृत्यू. (जन्म: २८ जानेवारी १८६५)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४