श्री खंडोबा आणि बाणाई विवाहस्थळ श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून खंडोबाची महाराष्ट्रात ८ प्रमुख ठिकाणे आहेत, पैकी अणदूर-मैलारपूर (नळदुर्ग) महत्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते
श्री खंडोबा आणि बाणाई विवाहस्थळ श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून खंडोबाची महाराष्ट्रात ८ प्रमुख ठिकाणे आहेत, पैकी अणदूर-मैलारपूर (नळदुर्ग) महत्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते. दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्ग येथे प्रकट झाले, अशी आख्यायिका आहे. श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग जि. उस्मानाबाद येथे झाला होता म्हणून या स्थानाला अन्यन्यसाधारण महत्व आहे.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अणदूर व मैलारपूर (नळदुर्ग) या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे असून दोन्ही ठिकाणचे अंतर चार कि.मी. आहे. खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने व मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते.
मंदिरे दोन आणि मूर्ती एक अशी परंपरा शेकडो वर्षांपासून सुरु आहे. तसेच अणदूरहुन नळदुर्गला आणि नळदुर्गहुन अणदूरला देवाची मूर्ती नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यामध्ये आजही लेखी करार केला जातो.
Comments
Post a Comment