२० नोव्हेंबर १६६६९ वर्षांचे बाल शंभूराजे आज रोजी आग्राहून सुटल्यानंतर सुखरूप "किल्ले राजगड" वर पोचले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० नोव्हेंबर १६३५
शाहजहान त्याच्या दुसऱ्या दख्खन मोहिमेसाठी निघाला. निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने तो निघाला होता. त्याने हांडियाजवळ ४ जानेवारी १६३६ ला नर्मदा ओलांडली. इथूनच ९ जानेवारीला आदिलशाहला पत्राने तंबी दिली की निजामशाहीमधल्या शाहजी राजा बरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नये. वर हे सुद्धा लिहीले की त्याने देय असलेली वार्षिक खंडणी १० मार्च १६३६ पर्यंत दौलताबादला पाठवावी. ह्यासाठी शाहजहानने सोलापूर, त्याच्या आसपासचा परिसर व वांगीचा भाग निजामशाहिकडील भाग आदिलशाहला देऊ केले. ह्या परिसरातून वर्षाला नऊ लक्ष होनाचे उत्पन्न येत होते. १९ जानेवारी १६३६ ला शेख दबीर व इतर काही आदिलशाही वकील शाहजहानला भेटले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला शाहजहानने खानजमान, खानदौरान व शाहिस्ताखान यांना निजामशाहीचा परिसर जिंकण्यासाठी धाडले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० नोव्हेंबर १६६६
९ वर्षांचे बाल शंभूराजे आज रोजी आग्राहून सुटल्यानंतर सुखरूप "किल्ले राजगड" वर पोचले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० नोव्हेंबर १६७०
छत्रपती शिवरायांची आरमारासह सुरतेकडे कूच.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० नोव्हेंबर १६७९
"छत्रपती संभाजीराजे" दिलेरखानाच्या छावणीतून निसटले आणि त्यांनी "किल्ले पन्हाळा" गाठला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० नोव्हेंबर १६८०
छत्रपती संभाजी महाराजांना सिद्दीचा समाचार घ्यायचा होता त्यापुर्वी इंग्रजांना समज देणे गरजेचे होते म्हणून त्यांनी आपला वकील आवजी पंडित यांना २० नोव्हेंबर १६८० रोजी मुंबाईस पाठवले या वकिलाने इंग्रजांना कडकडीत शब्दात सुनावले ते मुंबईच्या इंग्रजांनी सुरतेस २७ नोव्हेंबर १६८० च्या पत्रात कळवले होते.
"छत्रपती शिवाजी महाराजांशी झालेल्या तहाप्रमाणे मुंबईकरांनी सिद्दीचा बंदोबस्त केला नाही तर छत्रपती संभाजीराजे इंग्रजाविरुध्द युध्द पुकारतील छत्रपती संभाजी राजांचा आलेला वकील पाहताच सिद्दीने आपले आरमार बंदराबाहेर नांगरले. संभाजी राजांच्या आरमाराला तोंड देण्याची तयारी नव्हती. सिद्दीचा कायमचा बंदोबस्त झाला नाही तर त्याच्या अमानुष लुटमारीच्या बंदोबस्तासाठी किनाऱ्यावर सतत दहा हजार माणसे निष्कारण आडवावी लागतील. संभाजीराजे इंग्रजांशी मैत्री ठेवण्यास तयार असले तर ते यापुढे हा उपद्रव सहन करणार नाहीत. सिद्दीची मदत ताबडतोब थांबवून त्याला आरमारासह बाहेर काढले नाही आणि त्याची मदत चालूच राहीली तर छत्रपती संभाजी महाराजांनी मुंबईवर स्वारी करण्याचा निश्चय केला आहे."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० नोव्हेंबर १६९५
धुरंदर मराठा सरसेनापती "संताजी घोरपडे" यांनी "दिंडोरी" येथे झालेल्या लढाईत मुघलांवर प्रचंड मोठा विजय मिळवला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० नोव्हेंबर १७११
शाहू राजांस बातमी समजली की, परशुरामपंत प्रतिनिधीसुद्धा (याआधी चंद्रसेन जाधवरावांच्या अगोदर सावंतवाडी चे सावंत, आंग्रे, खंडेराव दाभाडे ताराबाइंच्या पक्षास मिळाले होते) ताराबाईंच्या पक्षास मिळण्याच्या बेतात आहे, तेव्हा प्रतिनिधींना कैद करून २० नोव्हेंबर १७११ त्यांचा सरंजाम, घर, जिंदगीसुद्धा जप्त केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० नोव्हेंबर १७३९
शंकराजी केशव नामजाद वसई यांना पोर्तुगिजांवरील स्वारीत उध्वस्त झालेला मुलुख पुन्हा वसवायची आज्ञा बाजीरावसाहेबांनी केली असून यात पहिल्या वर्षीच्या "पट्ट्या" अथवा "कर" माफ करून लोकांना घरं वसवण्याकरीता सरकारी मदत देण्याचे कळवले आहे. शिवाय या पत्राच्या पाचव्या कलमात नव्या आरमाराच्या बाबतीतही पेशव्यांनी शंकराजीपंतांना आज्ञा दिल्या आहेत. बाजीरावसाहेबांच्या काळातच कान्होजीराजे आंग्रे मृत्यु पावल्यानंतर त्यांच्या कुटूंबात भाऊबंदकी सुरु झाली होती त्यामूळे या धामधुमीत आंग्‍र्‍यांचे आरमार ऐनवख्तास उपयोगी येईल का नाही असे म्हणून पेशव्यांनी स्वतंत्र आरमार वसईला सुरु केले. सदर दुसर्‍या चौकटीतील पत्र हे २० नोव्हेंबर १७३९ मधील आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० नोव्हेंबर १७४४
चिमजीआप्पांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांनी उत्तररेत चार मोहिमा केल्या. त्यापैकी च तिसऱ्या मोहिमेस म्हणजेस "भेलसा स्वारीस" (मोहीमस) नानासाहेबांनी प्रारंभ केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० नोव्हेंबर १७५०
म्हैसूरचा शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान यांचा जन्म. (मृत्यू: ४ मे १७९९)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० नोव्हेंबर १७८५
अंतर्वेदीत अंमल बसविण्यासाठी सरदार अंबाणी इंगळे व सरकारचे सरजामी कृष्णराय पवार यांची योजना केल केली. ह्या मराठा फौजेने अंतर्वेदीतील बहुतेक ठाणी ताब्यात घेऊन मुख्य ठाणे जे अलिगड, त्यास वेढा दिला. हा वेढा जवळजवळ ८-९ महिने चालला, शेवटी मराठयांनी दिनांक २० नोव्हेंबर १७८५ रोजी अलिगड जींकले व अंतर्वेदीत अंमल बसविला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२० नोव्हेंबर १८०३
गाविलगडाची मालकी भोसल्यांकडे आल्यानंतर या अत्यंत महत्त्वाच्या आणि भक्कम किल्ल्यासाठी योग्य अशा सरदाराची आवश्यकता भोसल्यांना जाणवू लागली. अशातच बंगालवरील एका लढाईत इंग्रज आणि नबाबाशी झालेल्या युद्धात झामसिंग नावाच्या शूर आणि इमानदार राजपूत सरदाराशी भोसल्यांची गाठ पडली, बंगालची लढाई भोसल्यांनी जिंकली आणि त्याचबरोबर झामसिंगचे मनही वळवले. पराभवाने अपमानित झालेला झामसिंग भोसल्यांच्या मोठेपणाने आणि मार्दवाने विरघळला. भोसल्यांच्या दरबारी त्याने सरदारी स्वीकारली आणि गाविलगडाची किल्लेदारी त्यानंतर राजपूत सरदारांकडे आली. गाविलगडाचा पाडाव होईपर्यंत गाविलगडाची किल्लेदारी झामसिंगाच्या वंशजांकडे कायम होती. झामसिंगनंतर त्याचा पुतण्या प्रमोदसिंग, प्रमोदसिंगाचा मुलगा दर्यावसिंग आणि त्याचा मुलगा सरदार बेणिसिंह ही नररत्ने गाविलगडाच्या उज्ज्वल परंपरेची व चिवट झुंजीची खरी साक्ष होत. इंग्रजांनी सारा हिंदुस्थान पादाक्रांत करणे सुरू केल्यानंतर मध्यभारतातील गाविलगडासारख्या अभेद्य किल्ल्याचा पाडाव करणे त्यांना आवश्यक वाटू लागले त्यानुसार गव्हर्नर वेलेस्ली आणि कर्नल स्टिव्हनसन यांच्या नेतृत्वाखाली २० नोव्हेंबर १८०३ मध्ये गाविलगडाची मोहीम इंग्रजांनी सुरू केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४