८ डिसेंबर १६७३छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून बंकापूर जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ डिसेंबर १६६५
नेतोजी पालकरांनी विजापूरकरांकडून ताथवडा 
उर्फ संतोषगड जिंकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ डिसेंबर १६७३
छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून बंकापूर जिंकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ डिसेंबर १६८०
मुंबईकर इंग्रजांनी सुरतकरांना लिहीलेल्या पत्राची नोंद...!
"राजाच्या हितसंबंधांना विरोध येईल अशा तऱ्हेने सिद्दीला आमच्या कडून मिळणारा आश्रय व मदत ही राष्ट्राच्या कायद्याप्रमाणे समर्थनीय ठरणार नाहीत हे उघड आहे. परंतु हल्लीच्या परिस्थितीत तो नियम आम्हास मोडावा लागणार हे स्पष्ट आहे. दोघांपैकी कोणाचा तरी रोष पत्करल्याशिवाय गत्यंतर नाही. हे अवघड असल्याचे लिहून लंडनला आपल्या गलबतास सुरक्षितता असणे गरजेचे आहे". छत्रपती संभाजीराजेंना समाधान वाटेल अशा काही अटी सिद्दीकडून लेखी मिळतील. तर मिळवाव्या. तरीसुद्धा सिद्दीला फार दुखवू नये. यावरून इंग्रजांचे दुटप्पीपणाचे धोरण किती स्पष्ट होते हे कळून येते. पण ते कात्रीत सापडले होते, हे निश्चित.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ डिसेंबर १६९९
औरंगजेब बादशाह अजिंक्यतारा घेण्यासाठी सरसावला. अजिंक्यताराचे किल्लेदार होते प्रयागजी प्रभू. गड घेण्यासाठी बादशाहचे प्रयत्न सुरु झाले. गडाच्या वाटेवर मोगल गस्त घालू लागले. मराठ्यांचे गडावर येणे जाणे कठीण होऊन बसले. गडावर तोफांचा मारा सुरु झाला, औरंगजेबास जास्तीत जास्त आठवडाभरात गड ताब्यात येईल, असे वाटत होते. पण महीने गेले तरी सुद्धा गडावरचे मराठे काही दाद देईनात. एकदा तर बादशाही सैन्याने गडावर सुलतानढवा सुद्धा केला पण मराठ्यांच्या तिखट प्रतिकारा समोर मोगली सैन्याला माघार घ्यावी लागली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ डिसेंबर १७२०
बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १७६१)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ डिसेंबर १७४०
रेवदंडयाचा किल्ला मराठ्यांनी अखेर दिडवर्षाच्या लढाईनंतर पोर्तुगिझांकडून जिंकला. मानाजी आंग्रे आणि खंडोजी मानकर यांच्या नेतृत्वाखाली लढाई देत मराठी फौजांनी आणि आरमाराने विजय प्रस्थापित केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...