Posts

Showing posts from August, 2026

श्री शके १६७६ वैशाख शुद्ध ३.अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य

२९५ ] श्री शके १६७६ वैशाख शुद्ध ३. अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री दादो महादेव गोसावी यांसिः- सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु॥ अर्बा खमसैन मया व अलफ. कान्होजी मोहिते यांणी वसंतगडास राहून मुलकांत नानाप्रकारें लूट धामधूम केली. कितेक ब्राह्मण नागविले. ती त्याची वर्तणूक जगप्रसिद्ध आहे. प्रस्तुत वसंतगड राजश्री यमाजीपंत यांनी घेतला. तुमचा आश्रा कान्होजी मोहिते यांनी केला. त्याजवरून तुह्मी यमाजीपंतासी विरुद्धास्पद वर्तता. ह्मणोन कळलें. तरी हे गोष्ट काय कामाची ? कान्होजी मोहिते बदफैली होते. त्याचें पारपत्य यमाजीपंतांनी केलें. ते तुह्मी संतोषच मानोन, ते व तुह्मी एके विचारे चालोन, आज्ञेप्रमाणें वर्तणूक करावी, युक्त असतां, तुह्मीच आपल्यांत आपण वाईट दाखवूं लागल्यास पुढें योजिलें कार्य आज्ञेप्रमाणें सिद्धीस जाणें कळतच आहे ! ऐसी गोष्ट नसावी. सहसा तुह्मी न करणें. कदाचित् कारभार संमंधे यमाजीपंताकडे अंतर असिलें तर अंतराचे कलमाची याद हुजूर पाठवून द्यावी. येविशीची आज्ञा करणें ते त्यास करून, अंतरें दूर केली जातील. ते गोष्ट तुह्मीं एकीकडे ठेऊन, तेथील तेथें विरुद्ध दाखवितां, ते एकंदर न दाखवणें. आ...

घाडगे

घाटगे  घाटगे घराण्याचा मूळ पुरुष कामराज घाटगे हा सोळाव्या वर्षीच हसन गंगू जाफरखान याच्या लष्करात मनसबदार झाला. त्याला मलवडी व ललगुण या दोन महालांची देशगत म्हणजे जहागीर होती. घाटगे घराण्यात अनेक शूर पराक्रमी पुरुष झाले. निजामशाहीचा दिवाण मलिकंबर याने विजापूरवर चढाई केली असताना घाटगे घराण्यातील वावजी व मिटोजी यांनी शर्थ करून आदिलशाहीचे रक्षण केले. त्या वेळी निजामशाहीत भोसले व जाधव ही घराणी व आदिलशाहीत घाटगे व घोरपडे ही घराणी फार पराक्रमी असून ती परस्परात लढाया करून आपापल्या सुलतानांची सेवा करीत असत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी असे त्यांना कधी वाटलेच नाही. ब्राह्मण गुरू  घाटग्यांचे मूळ पुरुष कामराज यांचे रामेश्वरभट काळे म्हणून एक गुरू होते. ते महा ईश्वरभक्त व मोठे सत्पुरुष होते. त्यांना योगविद्या व मंत्रविद्या वश होती. गंधाक्षता व तीर्थ यांनी ते कामराजांची सर्व संकटे नाहीशी करीत. पुढे काही काळाने घाटगे घराणे जरा खालावले होते. पण लवकरच बावजी झुंजारराव हा शूर पुरुष त्या काळात उदयास आला. ह्यास उदयास आणण्यास परशुराम भट हा तपस्वी ब्राह्मण कारणीभूत झाला. वावजीच्या विनंतीवरून त्यान...

यादव

उत्तरकालीन यादव  जाधव आणि भोसले या दोन घराण्यांतील कर्त्या पुरुषांची माहिती देऊन सरदार घराण्यांचा हा विचार संपवू. देवगिरीच्या यादवांनाच पुढे जाधव म्हणू लागले. यादवांचा शेवटचा राजा शंकरदेव याचा मुलगा गोविंददेव हा, हसनगंगू दक्षिणेत आला तेव्हा, चांगला प्रौढ झाला होता. महंमद तबलखाच्या क्रूर, जुलमी कारभारा मुळे सर्वत्र बेदिली माजली होती. त्या वेळी प्रत्येक प्रांतात अराजक माजून ठायी ठायी स्वतंत्र राज्ये निर्माण होत होती. हरिहर आणि बुक्क यांनी याच वेळी विजयनगरला स्वराज्यस्थापना केली. तोच पराक्रम शंकरदेवाचा मुलगा गोविंददेव याने करावयास हवा होता. पण तसे काही न करता, त्याने बहामनी राज्य स्थापन करण्याच्या कामी, हसनगंगू यास साह्यच केले. गोविंददेव याने, बहामनी राज्यस्थापना होण्याच्या आधी, खानदेशात स्वतंत्र राज्य स्थापिले होते. पण हसनगंगू येताच ती आकांक्षा सोडून देऊन, अनेक हिंदू राजांबरोबर, त्यानेही त्याला साह्य केले. पुढे बहामनी राजे कृतघ्न होऊन हिंदूंवर जुलूम करू लागले. तेव्हा पश्चात्ताप पावून गोविंददेव याने त्यांच्याविरुद्ध उटावणी केली. पण त्याचा पराभव होऊन त्यास गुजराथेत पळून जावे लागले. पु...

२४ आॅगस्ट १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी आज "उत्तर कर्नाटक" जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ आॅगस्ट १६०८ ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ आॅगस्ट १६५७ औरंगजेबने जर संपूर्ण आदिलशाही बुडवली तर तो अधिक प्रबळ बनेल व "शाहजहान" नंतर आपला प्रतिस्पर्धी म्हणून "दारा शुकोह"ने शाहजहानच्या संमतीने आदिलशहाशी तह केला. त्यात कल्याणी, परिंडा व त्याभोवतालचा भाग, निजामशाही कोकणातील किल्ले, वांगणी परगणा व खंडणीदाखल दीड कोटी रुपये द्यावेत अशा तहातील मुख्य अटी होत्या.  दिल्लीला बादशहा शहाजहान आजारी पडल्याची बातमी औरंगजेबास समजली म्हणून औरंगजेबाने आपली दक्षिणेकडील मोहीम आटोपती घेतली व त्याने सरळ दिल्लीची वाट धरली. इकडे बड्या साहेबिणीने विजापूर दरबार भरविला आणि त्यांत छत्रपती शिवाजीराजांच्या पारिपत्याचा विचार केला. छत्रपती शिवाजी राजांना शासन करावे हे दरबारांत ठरले व ही कामगिरी धिप्पाड अफगाण सरदार अफझलखान याजवर सोपविण्यात आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ आॅगस्ट १६६१ छत्रपती शिवरायांच्या राणीसाहेब "सकवारबाई" यांना कमळाबाई नावाचे कन्यारत्न प्राप्त झाले. 🏇🚩🏇🚩🏇...

महाराणी चिमणीबाई सयाजीराव गायकवाड यांना स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏⛳

घोड नदीच्या काठावर वसलेले इनामगाव ऐतिहासिक प्राचीन मध्ययुगीन वारसा लाभलेलं गाव.               बडोद्याचे लोकहितवादी लोकराजा महाराजा सर सयाजीराव गायकवाड यांची सासुरवाडी. अनेकांना हे अपरिचित असेल पण हे सत्य आहे.महाराणी चिमणाबाई गायकवाड यांच्या वर्गणीतून इनामगावात त्यांनी प्राथमिक शाळा बांधली तसेच आजही देवासचे सरदार राजे घाटगे परिवाराचा वाडा इनामगाव मध्ये वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभा आहे.         The position of women in indian life ह्या इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका. ज्या काळात स्त्री शिक्षणाच्या बाबतीत संघर्ष करावा लागत होता त्या काळात भारतीय स्त्रीयांच्या जीवनावर राणी साहेबांनी पुस्तक लिहिले.हे विशेष गौरवास्पद आहे.बडोदा संस्थानिकांच्या लोकहितवादी कार्याचा आजही गुजरात तसेच भारतात गौरव केला जातो. महाराणी चिमणीबाई सयाजीराव गायकवाड यांना स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏⛳ 

२३ ऑगस्ट १६६३छत्रपती शिवरायांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील "आचरे" ताब्यात घेतले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ ऑगस्ट १६६३ छत्रपती शिवरायांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील "आचरे" ताब्यात घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ आॅगस्ट १६६६ छत्रपती शिवरायांच्या आग्रा सुटकेनंतर मुघल सैनिकांनी "कवी परमानंद" यांना "दौसा" येथून ताब्यात घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ आॅगस्ट १६६६ आग्र्याहून सुटकेनंतर छत्रपती शिवरायांनी खोटे शाही दस्तक दाखवून "चंबळ" नदीचा परीसर नावेने पार केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ ऑगस्ट १६६६ आग्य्रात असताना प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारातील बातम्या महाराजांना कशा ज्ञात असत, याविषयी २३ ऑगस्ट १६६६ ला आग्य्राहून लिहिलेल्या पत्रात परकलदास लिहितो, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज येथून निसटण्यापूर्वी चार दिवस त्याच्या भोवतालचा पहारा अधिकच कडक केला होता. पुन्हा एकदा बादशहाचा हुकूम आला होता की, छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारा, परंतु थोडय़ाच वेळाने त्याने आपले मन बदलले व महाराजांना विठ्ठलदासचे हवेलीत नेऊन ठेवण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांना दरबारांतील असल्या सर्व हालचालींची बित्त...

घाटगे

घाटे अंबाजीराजे - १०६ घाटगे अंबाजी राजे - ८,९,९५ घाटगे पिराजी - ३१३ घाटगे महादाजी बाजी - २१९ घाटगे साबाजी राजे - १४४, २८२, ३४७ घाटिगे माकोजी - ९

धोंडेवाडी घाडगे

अताजी जगनाथ जोसी कुलकर्णी कसबे पारनेर १ केशो लक्षुमण देसपाडे पा। सिरवल कोडापा बिन सिवपा कुलकर्णी मौजे गोटखिडी प्रा। वालवे व भडकबे प्रा। हुकेरी पत्र प्रा। साक्ष खडो श्रीधर बुचके देशपाडे प्रा। सुपे सिदोजी बिन मुधोजी घारगे देसमुख का। निंबसोड बावाजी बिन जानोजी पाटील यादव मौजे कडेगाव का। मजकूर अगनोजी बिन लखमोजी पाटील मौजे बेलिचागाव का। मा। साबजी बिन चदजी पाटील गणेश जगनाथ क्षीरसागर कुलकर्णी मौजे सेलगाव व पाचुद व बेलवडे बवाजी आबजी खीरसागर कुलकरणी जोतिसी मौजे हिंगणगाव बु॥ का। आउध मौजे येडे का। वागी रामभट्ट बि।। नरसिभट्ट ढेकणे नि।। मोरो सामराज महिपतराउ लक्षुमण खलदकर कुलकर्णी मौजे खलद प्रा। पुणेंदेस ता। क-हेपठार १ जानो रघुनाथ कुलकरणी मौजे खेडीवतडिवले व चचली व धु- मालवाडी कोरेगाव प्रा। वाई अनाजी कासी कुलकरणी मौजे माजी व मौजे खोजवडी ता। सातारा १ कीर्यात निबसोडमाइणी सिदोजी बिन बहिराजी घारगे देसमुख को। माइणी हैबतराव बेनाजी सहश्रभोजने देसपाडे का। निंबसोड व माइणी ह्मसाजी बिन कुमाजी बिन खेलोजी पाटील ईगल मौजे सिरसवाडी का। मजकूर बेनाजी बिन बहिरोजी पाटील माने मौजे माहुली का। मा। सिदोजी घाटगे मौजे धोडेवाड ...

घाटगे

घाटगे  घाटगे घराण्याचा मूळ पुरुष कामराज घाटगे हा सोळाव्या वर्षीच हसन गंगू जाफरखान याच्या लष्करात मनसबदार झाला. त्याला मलवडी व ललगुण या दोन महालांची देशगत म्हणजे जहागीर होती. घाटगे घराण्यात अनेक शूर पराक्रमी पुरुष झाले. निजामशाहीचा दिवाण मलिकंबर याने विजापूरवर चढाई केली असताना घाटगे घराण्यातील वावजी व मिटोजी यांनी शर्थ करून आदिलशाहीचे रक्षण केले. त्या वेळी निजामशाहीत भोसले व जाधव ही घराणी व आदिलशाहीत घाटगे व घोरपडे ही घराणी फार पराक्रमी असून ती परस्परात लढाया करून आपापल्या सुलतानांची सेवा करीत असत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी असे त्यांना कधी वाटलेच नाही. ब्राह्मण गुरू  घाटग्यांचे मूळ पुरुष कामराज यांचे रामेश्वरभट काळे म्हणून एक गुरू होते. ते महा ईश्वरभक्त व मोठे सत्पुरुष होते. त्यांना योगविद्या व मंत्रविद्या वश होती. गंधाक्षता व तीर्थ यांनी ते कामराजांची सर्व संकटे नाहीशी करीत. पुढे काही काळाने घाटगे घराणे जरा खालावले होते. पण लवकरच बावजी झुंजारराव हा शूर पुरुष त्या काळात उदयास आला. ह्यास उदयास आणण्यास परशुराम भट हा तपस्वी ब्राह्मण कारणीभूत झाला. वावजीच्या विनंतीवरून त्यान...

१९ऑगस्ट इ. स. १६८०*संत तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव महाराज यांना वर्षासन!छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताचे देशाधिकारी विनायक उमाजी यांना आजच्या दिवशी, एक खास पत्र लिहिले आणि या पत्रानुसार संत तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव महाराज यांना वर्षासन इनाम करून दिले.

*आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष* *१९ ऑगस्ट इ.स.१६००* बु-हाण निजामशहाच्या मृत्युनंतर मुघल सम्राट अकबर याने अहमदनगर पर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली त्यावेळी चांदबिबीने पराक्रमाची शर्थ करून अहमदनगरचा बचाव केला तरीपण तिच्या मृत्युनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून आजच्या दिवशी अहमदनगरचा ताबा मिळवला. *१९ ऑगस्ट इ.स.१६६६* शिवाजीराजे निसटल्याची बातमी संपूर्ण आग्रा शहरात!       "फौलादखानी" चौकशीत गुन्हेगाराचा साथीदार सापडला होता. पण शिवाजीराजे हजार शाही सैनिकांच्या डोळ्यादेखत काय हुन्नर करून निघून गेले हे गूढ मात्र औरंगजेब बादशहाला व त्यांच्या बुद्धिमान वजिरांना काही केल्या उलगडेना. महाराज निसटल्याची बातमी कळल्यापासून या रहस्याचाही शोध घेणे सुरुच होते. अखेर बरेच डोके खाजविल्यानंतर शाही आधिकारी अचूक निर्णयावर येऊन पोहोचले की, "शिवाजीराजेंच्या डेऱ्यातून जे मोठमोठे मिठाईचे पेटारे जात होते त्यातच बसूनच वार रविवार दि. १९ ऑगस्ट इ.स.१६६६ शिवाजीराजे पळून गेले. प्रत्येक जण आपापल्या परीने "काहीही बोलु लागले. होते.‌ "नेतोजी पालकर यांना पकडण्याचे फर्मान निघाले. *१९ ऑगस्ट १६७५* शिवरा...

चऱ्होलीकर सरदार दाभाडे घराणे पूर्वज सोमाजीराव दाभाडे हे मूळ पुरुष होय सोमाजी दाभाडे यांना दोन मुले होती थोरले कृष्णाजी व धाकटे बाबुराव होय कृष्णाजी दाभाडे यांचा अनेक ऐतिहासिक पत्रांमध्ये उल्लेख आढळतो.काही पत्रे मिळाली ती या ठिकाणी एकत्र करत आहे.

चऱ्होलीकर सरदार दाभाडे बजाजी दाभाडे पाटील तळेगाव दाभाडे यांना दोन मुले होती पहिले येसाजीराव व दुसरे सोमाजीराव होय सोमाजी बिन बजाजी दाभाडे च-होली गावच्या वतनावर आले च-होली सरदार दाभाडे घराण्यातील सोमाजीराव दाभाडे हे  मूळ पुरुष होय सोमाजी दाभाडे यांना दोन मुले होती थोरले कृष्णाजी व धाकटे बाबुराव होय कृष्णाजी दाभाडे यांचा अनेक ऐतिहासिक पत्रांमध्ये उल्लेख आढळतो. राजवाडे यांच्या पत्र संग्रहामध्ये असणारी काही पत्रे. जशी जशी तशी मराठी अनुवादित पुढे देत आहे. श्रीमोरया.                                                            वंशावळ : दाभाडे मोकद्दम, मौजे तळेगाव, त॥ चाकण, प्र॥ जुन्नर, सुभे खुजस्तेबुनियाद, मोकद्दमी तक्षीम चवथी मौजे मजकूरची, यांचा मूळ पुरुष बजाजी पाटील दाभाडे. त्यास पुत्र दोन, (१) येस पाटील दाभाडे, (२) सोमाजी दाभाडे. वडील येस पाटिल दाभाडे हे मोकद्दमी करीत होते. यांणीं राजाराम महाराज यांची सेवा केली. चंदीचे मुक्कामीं महाराजास प...

सरदार बाबाजी घाडगे

Image
Vrds

१७ ऑगस्ट इ.स.१६६६(श्रावण वद्य द्वादशी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शुक्रवार)छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्राच्या कैदेतून सुटका करून घेतली!

⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 १७ ऑगस्ट इ.स.१६५३ चाकणचे सिद्धेश्वर भट ब्रम्हे यांना महाराजांनी वर्षासन नेमून दिले. चाकणचे सिद्धेश्वर भट ब्रम्हे हे दुसरे सत्पुरुष "त्यांच्या अनुष्ठानबळे आपण राज्यास आधिकारी झालो व सकल मनोरथ चिंतिले ते पावलो" अशी महाराजांची धारणा होती. महाराजांना औरंगजेब बादशहाचा कावा समजला आणि महाराजांनी भराभर पावले उचलायला सुरुवात केली.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/uRoN9-0r0lY?feature=share 📜 १७ ऑगस्ट इ.स.१६६२ जेधे शकावलीतील नोंदीनुसार भाद्रपदशुक्ल द्वादशी शके १५८४ म्हणजे १७ ऑगस्ट १६६२ रोजी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अण्णाजीपंतास सूरनिसी दिली. सुरनीस या फारसी शब्दाचा अर्थ “सुद सुद बार“ असा शेरा मारणारा . सनदा , हुकूमनामे , राजपत्र , महत्वाच्या निर्णयांची शासकीय कागदपत्रे तपासणे, त्यातील त्रुटि शोधून त्यातील चुकीचा मजकूर दुरुस्त करणे . महाल , परगणे यांचे हिशोब जमाखर्च तपासणारा कारकून . वित्त व लेखा अधिकारी . प्रस...

७ आॅगस्ट १६७५छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी "कोल्हापूर" जिंकले.आजच्या दिसशी कोल्हापुर स्वराज्यात दाखल झाले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ७ आॅगस्ट १६४८ महाराज किल्ले पुरंदर पाहण्यासाठी गडावर !  किल्ले पुरंदराची अभेद्यता व भव्यता पाहून महाराज बहोत खूष झाले. भविष्यात हा गड फार उपयोगी व महत्वाचा आहे. हे जाणून महाराजांनी अनेक डागडुजी आणि शिबंदीसाठी योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ७ आॅगस्ट १६७५ छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी "कोल्हापूर" जिंकले. आजच्या दिसशी कोल्हापुर स्वराज्यात दाखल झाले. कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च १६७३ मध्ये पन्हाळा जिंकून स्वराज्यात आणला, तसेच १६७५ मध्ये कोल्हापूर परिसर खऱ्या अर्थाने जिंकून आपल्या अखत्यारीत आणला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ७ आॅगस्ट १६७९ छत्रपती शिवरायांच्या सूचनेवरून "खांदेरी-उंदेरी" किल्ल्यावर गोड्या पाण्याचे झरे खोदून तिथे विहीरी बांधण्याचे काम चालू झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ७ आॅगस्ट १६८८ स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी औरंगजेब बादशहाने आपले मातब्बर मोहरे पाठविले. छत्रपती संभाजी महाराजांचा मुलुख जिंकण्यासाठी औरंगजेब बादशह...

६ आॅगस्ट १६४८छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी "किल्ले पुरंदर" वर हल्ला केला. किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ आॅगस्ट १६४८ छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी "किल्ले पुरंदर" वर हल्ला केला. किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ आॅगस्ट १६५७ छत्रपती शिवरायांनी अहमदनगरच्या मुघल छावणीवर हल्ला केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ आॅगस्ट १६५९ ठाण्याच्या पोर्तुगीज गव्हर्नर ने गोव्याच्या प्रमुख गव्हर्नर ला मराठ्यांच्या आरमारापासून सावध राहण्याबाबतचे पत्र पाठवले. सदर पत्राचा मराठी अनुवाद- "शहाजीचा मुलगा (शिवाजी) याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसई ते चौल मधला बराच भूभाग जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे. त्याने कल्याण, भिवंडी, पनवेल ह्या वसईच्या आसपासच्या बंदरांमध्ये काही लढाऊ जहाजे बनवली आहेत. आम्हाला आता सतर्क रहायला हवे. ही जहाजे बंदरामधून खुल्या समुद्रात बाहेर येणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगिझ कप्तानाला दिले आहेत." 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड, सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र. "जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष...

३ आॅगस्ट १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांचा "वृद्धाचलम" येथे मुक्काम.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३ ऑगस्ट १३४७ दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलख याच्या कारकिर्दीत दक्षिणेत जाफरखान उर्फ अल्लाउद्दीन हसन याने बंड करून गुलबर्गा इथे ३ ऑगस्ट १३४७ ला बहामनी राज्याची स्थापना केली. या बहामनी राज्यात १३४७ ते १५३८ या काळात एकूण १८ सुलतान होऊन गेले. बहामनी राज्यातील १४ वा सुलतान शिहाबुद्दीन महमूद याच्या कारकिर्दीच्या दरम्यान बहामनी सत्तेचा कर्तबगार वजीर महंमद गवान याची हत्या झाल्यानंतर बहामनी सत्तेचे  वेगवेगळे सुभेदार जसे युसुफ आदिलखान (आदिलशाही), फतहुल्लाह इमाद (इमादशाही), कुत्ब उल्मुख (कुतुबशाही), अमीर कासीम बरीद (बरीदशाही) व मलिक अहमद बहिरी (निजामशाही) यांनी बहामनी सत्तेतून बाहेर पडत आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामी महत्वाचा अडसर राहिला तो विजापूरच्या आदिलशाहीचा. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ३ आगस्ट १६६४ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराच्या हेरांनी आणलेल्या माहितीवरून पोर्तुगीज व मोगली आरमाराचा समाचार घेण्यासाठी दहा दहा गलबतांचा ताफा रवाना झाला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻?...

फक्त दीड दिवस शाळेत गेलेल्या या व्यक्तीने स्वकर्तुत्वावर मराठी भाषेमध्ये 35 कादंबऱ्या 14 लोकसंग्रह 19 लोकनाट्य अकरा पोवाडे शेकडो लावणी आणि गाणी लिहिली.लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या 106 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Image
फक्त दीड दिवस शाळेत गेलेल्या या व्यक्तीने स्वकर्तुत्वावर मराठी भाषेमध्ये 35 कादंबऱ्या 14 लोकसंग्रह 19 लोकनाट्य अकरा पोवाडे शेकडो लावणी आणि गाणी लिहिली.  असे एकमेव मराठी साहित्यिक ज्यांचा एकमेव स्टॅच्यू रशिया मध्ये बसवण्यात आलेला आहे. तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांचे योगदान भरपूर मोठे आहे. माझी मैना गावावर राहिली ही लावणी त्यांची खूप गाजली ते कम्युनिस्ट विचारसरणीचे होते.  दुसऱ्या महायुद्ध वर आधारित रशियाच्या अस्तित्वाच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर लढ्याच्या आधारित एक पोहाडा लिहला. त्यामुळेच अण्णाभाऊची लोकप्रियता रशियामध्ये सुद्धा वाढली होती.