किल्ले महिमान गड ब्लॉग नंबर 5
महिमानगडची उंची 3200फूट असून प्रकार गिरीदुर्ग आहे चढाईची श्रेणी सोपी आहे. ठिकाण सातारा, महाराष्ट्र जवळचे गाव महिमानगड येते किल्ला आहे. जवळील गावे गाव,दहिवडी,शिद्रिबुद्रुक,पुसेगाव. डोंगररांग सातारा - फलटण आहे. सध्याची अवस्था व्यवस्थितआहे. महिमानगड किल्ला सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आहे. माण तालुका हा सातार्याच्या पुर्व भागातील तालुका आहे. सातारा पुसेगाव म्हसवड असा गाडीमार्ग आहे. या गाडीमार्गावर सातार्यापासून ५० कि.मी. अंतरावर महिमानगड हा किल्ला एका लहानशा टेकडीवर बांधलेला आहे. महिमानगडाच्या दक्षिण पायथ्याला उकीर्डे नावाचे गाव आहे. तर उत्तर पायथ्याला महिमानगड वाडी आहे. उकीर्डेकडूनही गडावर जाता येते. अर्थात ही वाट नेहमीची चढाईची नाही. काहीशी अवघड असून ती तुटक्या तटबंदीमधून गडात शिरते. महिमानगडाच्या फाट्यापासून गडाचा पायथा असलेल्या वाडीपर्यंत गाडीमार्ग आहे. या मार्गाने जाताना महिमानगडाची पश्चिम अंगाची तटबंदी सुरेख दिसते. महिमानगडवाडी किल्ल्याच्या उतारावरच वसलेली आहे. इतिहासाला माहीत नाही हा किल्ला किती जुना आहे पण राष्ट्रकुट,चालुक्य,यादव,इस्लामी राजवटी, मान देश ज्यांना आ