किल्ले भूषणगड इतिहास ब्लॉग नंबर भाग 1
किल्ले भूषणगड हा खटाव तालुक्यातील उच किल्ला असून.उंची९०४ मीटर आहे. किल्ले भूषणगड हा गिरिदुर्ग किल्ला आहे.चढाईची श्रेणी सोपी दिसताना दिसते तेवढी सोपी नाही.
जवळचे गाव होळीचागाव, निमसोड, शेनवडी, राहाटणी, वडगाव, पळशी ही गावे किल्या आजूबाजूच्या दिशेने आहेत.
जावळील तालुक्यातील प्रशासकीय नगरपंचायत असणारे व एसटी डेपो असणारा वडूज आहे.
डोंगररांग सह्याद्रीची उपरांग आहे.
सध्याची अवस्था व्यवस्थित दिसताना दिसत असली तरी पडझड चालू आहे.. काही तटबंदीची जीर्णोद्धार करावी लागनार आहे.
जिल्ह्यातील माण तसेच खटाव तालुक्यातील तालुक्याचे गाव वडूज आहे. वडूज हे गावा सातारा, कर्हाड, फलटण, दहिवडी यांच्याशी गाडीमार्गाने जोडले गेले आहे.
वडूजच्या दक्षिणेकडे साधारण 17 कि. मी. वर भूषणगड हा किल्ला आहे. भूषणगडाचा डोंगर एकांड्या असल्यामुळे तो खूप दूरूनही ओळखून येतो. वडूजमधून भूषणगडाला जाण्यासाठी ठरावीक एस.टी. बसेस आहेत. पण कोरोना व St संपा मूळ सध्या काही सोय नाही. त्यामुळे कार किंवा दुचाकी घेऊनच प्रवास करावा.वडूज-पुसेसावळी गाडीरस्त्यावर पळशी गाव आहे. येथून चालतही भूषणगडला जाता येते. हे अंतर पाच किलोमीटर असून रस्ता कच्चा होता. आत्ता डाबरी केला आहे.
किल्ल्याची स्थापना :-
12 शतक ते 9शतक यामध्ये असण्याची दाट शक्यता आहे.पण काही जाणकार तेराव्या शतकात देवगिरीचा सम्राट राजा सिंघण दुसरा याने हा किल्ला बांधून घेतला.असं बोलतात.याला मूळ सदर्भ पाहणे महत्वाचे आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी :-
देवगिरीच्या यादव याच्या पतनानंतर हा किल्ला बहामनी सत्तेत गेला.बहामनी सत्तेचे पाच तुकडे झाले तेव्हा हा किल्ला आदिलशाहीत आला.
१६७६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला.
व त्याची डागडुजी केलीं.मराठ्यांकडून हा किल्ला जिंकून औरंगजेबाने त्याचे नाव इस्लामतारा असे केले.पुढे परत पेशव्यांनी हा गड जिंकून स्वराज्यात आणला. पुढे १८४८ मध्ये सातारा इंग्रजांकडे गेल्यामुळे किल्लाही इंग्रजांकडे गेला.
ऐतिहासिक पार्श्वभूमी :-
आदिलशाही कडून हा किल्ला शिवशाहीत दाखल झाला. पुढे औरंगजेबाच्या ताब्यात हा किल्ला होता. पुढे मराठेशाही मधे हा किल्ला त्यांच्या ताब्यात गेला.
गडावर आपण काय पाहू शकता?
1)भूषणगड किल्ल्याच्या पायथ्याशीच भूषणगड नावाचे छोटेसे गाव आहे. या गावात येण्यासाठी चारही बाजूने रस्ते आहेत.
2) गडाची गडदेवता हरणाईमाता ही अनेकाच्या श्रद्धास्थानी आहे. भूषणगड गावातून किल्ल्याकडे निघाल्यावर आपल्या स्वागताला एक कमान उभी केलेली आहे. येथूनच गडावर जाणाऱ्या पायऱ्यांचा मार्ग नव्यानेच बांधून काढला आहे. भक्तांच्या अर्थसहाय्यातून हा मार्ग व गडाची देवता हरणाई मातेचे मंदिर नव्याने बांधले गेले आहे.
2)समुद्रसपाटीपासून ९०४ मीटर उंच असलेला भूषणगड चढण्यासाठी पायथ्यापासून २० मिनिटे लागतात. दरवाजाच्या २५ फूट खाली एक वाट तटबंदीच्या खालून उजवीकडे जाते.
3)गडाच्या पश्चिम बुरुजाला वळसा मारुन ती मागच्या बाजूच्या मंदिरापर्यंत जाते. तेथे घुमटीवजा मंदिर आहे. घुमटीमधे देवीची मूर्ती असून तिचे नाव भुयारी देवी आहे. येथून पुन्हा फिरुन दरवाजाकडे यावे लागते. दाराजवळ म्हसोबा मंदिर आहे.येथून दरवाजाची बांधणी दिसते.
4) पायऱ्यांच्या बाजूला संरक्षक भिंत बांधून दरवाजाची सुरक्षितता वाढवली आहे. पायऱ्यांच्या वर दोन्ही बाजुंना भक्कम बुरुज बांधून आतल्या बाजूला दरवाजा घेवून दोन्ही बुरुजांच्या कह्यात तो ठेवला आहे. वळणदार मार्गावरच्या या दरवाजावर खालून तोफांचा मारा करणे अशक्य होते.
5)दरवाजाची कमान पडलेली आहे. येथून पुढे गेल्यावर सरळ वाट पश्चिम कड्यावर जाते. तर डावीकडील वाट माथ्याकडे जाते. भूषणगडाचा एकूणच विस्तार लहान आहे.
6)माथा चारही अंगाने तटबंदीने सुरक्षीत केलेला असून जागोजागी पहार्यासाठी बुरुज बांधले आहेत. गडावर सुशोभिकरणासाठी लावलेल्या झुडूपांनी आता तटबंदी व घरांची जोती आच्छादली गेली आहेत. भूषणगडाचा आकार साधारण त्रिकोणी आहे. या तिन्ही टोकावर टेहाळणीसाठी बुरुज आहेत.
7)या तिन्ही टोकांच्या मध्यभागी उंचवटा असून त्यावर हरणाई मातेचे मंदिर आहे. पुर्वी हे मंदिर जमिनीच्या पातळीखाली होते. ते आता उचलून पातळीवर नव्याने बांधले आहे. दिपमाळ आहे. मंदिराच्या बाजूलाच धर्मशाळा असून येथे मुक्काम करणार्यांची सोय होवू शकते.
8)भूषणगडाला लागून एकही डोंगर नाही त्यामुळे गडावरून चारही बाजूला दूरपर्यंत शत्रूवर नजर ठेवणे शक्य होते. येथून औंधची यमाई, महिमानगड, शिखर शिंगणापूर ही दृष्टीस पडतात.
9)मंदिराच्या मागील बाजूने पश्चिम बाजूने पाण्याच्या लोखंडी पाईप लागत खाली जाणारा रस्ता आपल्यला गुहेकडे घेऊन जातो.. ही गुहेत पाणी कायम असते. त्यामुळे हे पाणी गडवर मोटरने नेलं आहे.
राहाण्याची सोय गडावरील हरणाई देवीच्या मंदिरासमोरील शेडमध्ये रहाण्याची व्यवस्था आहे पूजऱ्या कडून परमिशन घेऊन राहता येऊ शकतं.
जेवणाची सोय गडावर जेवणाची व्यवस्था नाही.आपण स्वत: करावी डबा आणावा.
पाण्याची सोय गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ साधारण भूषणगडवाडीतून गडावर जाण्यास 40 मिनीटे लागतात.
©®
लेखक :-नितीन घाडगे
अतिशय सुंदर माहिती दिली आहे.
ReplyDeleteधन्यवाद.